expression

 किती सुंदर आहे हे जीवन,
स्वप्ना पलीकडे सगळे घडते,
कधी तरी विचारात असलेले क्षण मी आज जगते.

तू असताना मी हे जग विसरते,
फक्त तुझ्या सोबत ते क्षण सावरते,
कितीदा तरी माझ्यातच मी हरवते,
तुझ्या नजरेला नजर मिळताच मी नजर झुकवत,
मी अवस्थ, गोंधळलेली असते,
तू माझ्या विचारांची गती भापण्याच्या प्रयत्नात असतो,
तुला जसेच माझ्या मनातले गोंधळ कळते,
त्या क्षणी माझी मीच लाजते.


तू  नसताना  खूप काही बोलायचे असते,
पण मनातली गोष्ट मनातच राहते....

********************************************************************************


हसतो मी मात्र मन रडत असत,
प्रेमाचा भूखेला पैशाच्या बाजारात फिरतो,
माणूस पाहून प्रेम होतो कि,
प्रेम पाहून माणूस आवडतो,
एकांतात हे प्रश्न नेहमीच मला पडत,
रात्र  आधी येते  कि आधी दिवस उगवतो,
स्वप्नातले जग सोडून का कधी  सत्यात वावरतो ?
गरज म्हणून आयुष्यात साधनांची किती गर्दी असते,
जगण्या साठी माणूस जन्माला कि,
जन्माला आला म्हणून जगतो,
एकांतात हे प्रश्न नेहमीच मला पडत....
*************************************************************************