तू चंद्रापरी आहेस ..चांदण्यांच्या पाशात
किती तरी तुझ्या साठी पण त्यांच्या साठी तू एकटाच...
तू भृंगा फुलांवर बागडणारा .. मधुरसाच्या मोहात
तू भृंगा फुलांवर बागडणारा .. मधुरसाच्या मोहात
किती तरी कळ्या उमलल्या बागेत पण त्यांच्या साठी तू ऐकतच ...
तू सागर उफानलेला .... तरंगाचा खेळ तुझ्या उरावर ..
पण त्या तीरासाठी तूच एकटा लाटांच्या भेटीस्तव...
पण त्या तीरासाठी तूच एकटा लाटांच्या भेटीस्तव...
तू शरदाचा पाउस .. उन्माद मनी रचणारा
पण तहानलेल्या चकोरासाठी तूच एकटा रिझवणारा
तू ब्रह्मांडातील तेजपुंज .. विखुरला किरणांनी भू मंडळ
पण जीवना साठी सूर्याचा अस्तित्व एकटा ....
तू स्वप्नांच्या कवडस्यात लपलेली एक इच्छा
पण पापण्याखाली सजलेलेल्या बागेत तूच एकटा ..
पण पापण्याखाली सजलेलेल्या बागेत तूच एकटा ..
वेदनेचे कारण हजार आहेत पण
वर्णाच्या डागत दिसतोस तूच एकटा ..
हसण्याचे कारण कोण विचारते इथे
पण गालावरची खळी बघणारा तूच एकटा ..
अश्रू पाहून नाना रित्या प्रश केले त्यांनी
पण त्यांना विसावा देणारा तूच एकटा
गडद सर्वत्र ...काजवेही घरी परतले आज
पण अश्या तिमिरातही साथ देणारा तूच एकटा ..