Saturday, January 7, 2012

charolya...

ओळख ते अश्रू सख्या हसण्या मागे दळलेले
अबोल शब्द माझे तुझ्या विरहात रळलेले
 हात हात घेण्यापूर्वी माझ मन मला विचारतो
काय ग तो खरच तुझ्यावर जीव ओवाळतो.. ????


मी निवडुंग सम होते त्याच्या नजरेने नाकारलेली
माझे अस्तित्व हि मलाच कधी कळले नाही
मी होते बाभळी रानातली
प्रेमा पुढे गुलाबाचे काटे हि सलले नाही

तू भृंगा आहेस स्वच्छंद वावरणारा
 मी तो फुल तुझ्या प्रतीक्षेत झुरणारा

विरहात सख्या गोडवा किती
गारवा हि मग हुरहूर घालतो
गोड गोड तुझ्या आठवणीत
तो श्रावण मज भिजवून पाहतो...   

परतीची वाट सख्या मी बघणे नाकारले
तू गेलास सोडून मला जेव्हा ते स्वप्न तिथेच ताडले...

गुंता हा शब्दांचा मला हि सुटेना
तुझ्या प्रीतीचा धागा तोडता तुटेना

का तुला तुझ्या काव्यात फासतोस
शब्दात माझे रूप मोडतोस
मी आहे उन्मुक्त पवन सखी
घे भरारी माझ्या छावेत अशी
पुन्हा भासे कधी हि कुणाची
तुला जरा अधिक प्रीती   

काळी जरी मी सख्या
पण तुझ्या साठीच उमलले
तू फिरून पहिले नाहीस
आणि माझे निर्माल्य झाले

मनाला का कारावास
ती सागरावरची तरंग आहे
भिर भिरणाऱ्या वार्याचा पंख आहे
 श्वास कोंडून इथे कुणी कधी का जगले ??
शिस्तीचे आयुष्य कुणास उमजले ??

कवितेच्या कवेत मला जरा रुजू दे
तुझ्या भावनेत मला बसू दे
लेखणीच्या नाकावारचे राग थोडे कमी होईल
तिच्या कुशीत मला आज निजू दे..........  

किती लटका नखरा हिचा
तुझ्या नावावर थबकते
जणू काही माझ्या पेक्षा
ही चं तुझ्यावर जीव ओवाळते  

No comments:

Post a Comment