एक ना जरा हाक त्या मनाची
कुजबुज माझ्या शब्दांची
मावळत्या सूर्याने सजवलेली
नदी काठी सांज वेळी
शांतता त्या ओढ्याची ..........
एक ना जरा पडताना
अबोलीचे पुष्प तुझ्या अंगणी
सलतील काटे वेच धीर धरुनी
आणि सल उरलेली माझ्या मनी ...
एक ना जरा ते गाणे हृदयाचे
हसणाऱ्या डोळ्यांचे
मुक्या शब्दांचे
आणि भाव या मनाचे ....
एक ना जरा त्या सरीचे गाऱ्हाणे
त्यांना हि आवडते मेघाच्या कुशीत राहणे
पण ओढ धरणी ला भेटायची काही सुटेना
तसेच जसे प्रीतीचे धागे तुझ्या पासून तुटेना...
कुजबुज माझ्या शब्दांची
मावळत्या सूर्याने सजवलेली
नदी काठी सांज वेळी
शांतता त्या ओढ्याची ..........
एक ना जरा पडताना
अबोलीचे पुष्प तुझ्या अंगणी
सलतील काटे वेच धीर धरुनी
आणि सल उरलेली माझ्या मनी ...
एक ना जरा ते गाणे हृदयाचे
हसणाऱ्या डोळ्यांचे
मुक्या शब्दांचे
आणि भाव या मनाचे ....
एक ना जरा त्या सरीचे गाऱ्हाणे
त्यांना हि आवडते मेघाच्या कुशीत राहणे
पण ओढ धरणी ला भेटायची काही सुटेना
तसेच जसे प्रीतीचे धागे तुझ्या पासून तुटेना...
No comments:
Post a Comment