Sunday, March 25, 2012

ashch manatl 1

मनाचा थैमान ,
बेफाम लगाम ,
पळत सुटला कुठे ,
गतीचा हि ना भान ....

श्वास हि दमला ,
कसा शिवाशिवीचा खेळ हा,
लपंडाव क्षणाचा ,
मांडला खेळ आयुष्याचा ...

रेसकोर्स नाही जीवन,
इथे नात्यांची आहे गुंफण ,
हरून जिंकतो तो ,
ज्या साठी रडणारे शेकडो ..

रोज चं रात्र मनाला ,
स्वप्नांच्या गावी घेऊन जाते ,
उद्याचा सूर्य कुणास ठाऊक ,
तरी नव्या आशेत काळोख हि निजते ...

परी उत्तर नाही प्रश्नांचे काही
तरी प्रश्नांचे सम्राज जिंकता येत नाही
प्रश्नांच्या वाटा मांडे राखेत हि थाट
जिथे नुसताच देह पुरलेला असतो ..

गरगर फिरतो भोवरा जसा,
आपल्याच धुळीवर,
तसाच जीव गुदमरतो aata,
तुझ्या पायरीवर ....

मी कोण काय कशी ,
नुसताच मनात तंटा झाला,
पुन्हा पुन्हा शोधले मला,
कुठे क्षणात हा गुंता झाला ...

विचात आता वाहू लागले,
शब्द माझे नाहू लागले,
काव्य बनून सजले ते ,
वाह - वाही ही लुटू लागले ...

गूढ काव्याचा कळेना कुणा.
आर्त मनाची एक ना मना
माझेच शोध माझ्या भोवती
श्वास जात्या सारखे दळू लागले ..
========================================================

शब्द आहे फुल सुगंधी ..
शब्द कट्या सम बोचणारे..
शब्द कातर तेज ती ..
शब्दच घाव भरणारे ...

शब्द आहे सरिते सम
डोळ्यातून झरणारे ..
शब्द कधी शीला विशाल ती
अटळ  शेवट पाहणारे ..

शब्द जणू कातरवेळ ..
प्रेम गीत गाणारे.
कधी मेघ वेदनेचे होऊन
मनसोक्त बरसणारे ..

शब्द मोहक रुप आहे
काव्य चे बीज ते
भवनाचा आधार जरी
शब्दाचेच खेळ सारे ...

शब्द कधी साखर पाक..
कधी रस कडू कारल्याचा..
तिखट तुरट आंबट जरी ..
स्वाद जीवनास यांचा चं  ..

शब्द ढाल माझी
शब्द कधी तलवार माझी
लेखणी मध्यम आहे
ओढण्यास लगाम मनाची

शब्द अर्पण करते आज
शब्द्फुलांच्या चरणी ..
जगणे हि माझे शब्दच जणू
काव्य माझी संगिनी  ...
=======================================================================

आपलेच कर्म ना  ते,  मग भोग कोण भोगायचे..
दुसर्यावर आरोप मांडून , कां स्वतः अश्रू गळायचे ...

लाम्बवतच  चालली आहे ..सावली माझी ..
हा सूर्य उगवता कि... निजणारी ज्योती  ...
काय लिहलय कुणास ठाऊक ..अर्धवट रेश्या हाती .
अडकते आयुष्य .. ना तिमिराची साथ हि ....

काय वाईट आहे इथे.. पाषाणा सम जिने..
शीलाचे साम्राज्य हे .. कोण ऐकेल मनाचे गाणे..
मोल नाही इथे ...रक्ताच्या नात्यांचा ..
कसे निभावतील ते ..प्रेमानुबंध  हे ....

Wednesday, February 29, 2012

वेदना

माझी वेदना इतकीच कि
मनाचे तार जुडत नाही ..
मेंदू बोलतो त्याच्या कडे
मान माझे वळत नाही ..

माझी वेदना इतकीच कि
वर्णाचे डाग दिसत नाही  ..
सल उठते उरी पण...
जख्मेची जागा कळत नाही ..

माझी वेदना इतकीच कि
गाण्याचे सूर जुडत नाही ..
धून असते मधुर पण..
ताल काही मिळत नाही ...

माझी वेदना इतकीच कि
हसतांना ओठ बोलत नाही ..
डोळ्यात असत सागर पण..
सागरातली भरती कळत नाही ...

माझी वेदना इतकीच कि
तुझी सावली आता बघवत नाही
असेन आयुष्यभर तुझ्या सोबत
पण तू माझा कधीच नाही ..

मी शब्दात गुंतवते तिला ..


मी च घडवते , मी च मोडते ...
संसार तिचा माझी कल्पना ..
हव तसं रूप देते तिला ...
मी शब्दात गुंतवते तिला ..

कधी वृत्त बद्ध ती ..
कधी यमक जुडणारी फक्त .. 
हव तसं वळण घालते तिला ..
मी शब्दात गुंतवते तिला ..

कधी भावांचा पसारा इथे ..
कधी काट्यांचा आधार तिला ..
मात्रांच्या पाशात कधी अडकवते तिला ..
मी शब्दात गुंतवते तिला ..

कधी थंड गार वारा..
कधी उकळणारा उन्हाळा .. 
कधी ओलीचिंब भिजवते तिला
मी शब्दात गुंतवते तिला ..

कधी गळलेला पान ती ..
कधी ती  स्वप्न तुटलेला ..
उमीद बनून मी जागवते तिला
मी शब्दात गुंतवते तिला ..

कधी क्षणातल क्षण ती ..
कधी उडालेला पाखरू ..
रंग बनून कॅनवासवर रंगले तिला
मी शब्दात गुंतवते तिला ..

कधी शब्दात बांधले ..
कधी अर्थात बोधले..
प्रत्येक ओळीत शृंगार दिले तिला
मी शब्दात गुंतवते तिला ..


  


Wednesday, February 22, 2012

अतृप्त ...

अतृप्त ...


घन बरसले ..
पाणी रिझले ..
माती भिजली ..
तरी पावसाळा अतृप्तच..

वसंत आला..
बागा बहरल्या ..
चोहीकडे आनंद ..
तरी उन्हाळा अतृप्तच ...

काव्य केले..
शब्द रंगविले ..
ख्याती मिळाली ..
तरी लेखणी अतृप्तच ..

ध्येय गाठले ..
महती मिरवली ..
 माया  जमवली ..
तरी मन अतृप्तच ....

    
सांग ना माझ्या वर किती प्रेम करतोस ...

मला नेहमीच प्रश्न पडतो
खरच का मी तुला आवडते ??
रातराणी च्या फुला सारखे तर नाही
प्रेम तुझे माझ्या वर हे ..

==============================================================
 तळमळ मनाची
इवल्या इवल्या कळ्यांचे जेव्हा फुल होते
नजरेच्या कारावासात देह बंदिस्त होते
कसे लपवणार ते फुल तो माळी
तोडण्यास त्याला हात किती तरी पुढे
कधी कधी वाटत का इतक गोजिर रूप तुझ आलं

रंग सुर्ख ओठांवर असा का निखारून आलं
नाजूक कोमल देहास ह्या काटेरी कुंपण तरी
 स्पर्श खट्याळ वाऱ्याचा होऊनच गेल ..

कसा जपू तुला मी माझ्या फुला
काळी होण्या आधीच हा भय मनी होता
जागच्या जालीम पिंजऱ्यात अडकणार जीव तुझा....
========================================================
नियती

सर्वाना हिची वाटते भीती ती नियती ...
नकोस वाटत तरी जागाव लागत
इच्छांच्या बाजारात मनाचा लिलाव कराव लागत
नको असणारे सर्व खेळ ती खेळून जाते
नको असणारे सर्व उपहार देऊन जाते
नियती पुढे कोण वदे....
 


तुझ्या माझ्यात फक्त एकच डाव तिने खेलना
स्वप्नांचा संसार क्षणात मोडला
रिक्त झाले मान.. भास न उरलेले
कसे गहिरे घाव ते नियतीने दिले
कसे नियती पुढे कोण वदे 

भोवळ आल्यावर जसे गडद नजरे पुढे
न सुटणारे चक्रव्यूह ते  ..
खोलात अजून ओढून  नेते
काळातच नाही कुठे मार्ग भरकट जाते
असे च खेळ खेळते नियती..
=======================================
पाखराचे थवे आतुर उडण्यास
त्या पंखाना फक्त क्षितीज हवा...
डोळ्यात स्वप्नांचा डोह
स्वप्नांत आशेचा मोह
आशा पूर्ण करण्यास
मनाचा ध्यास हवा...
 जीवनास श्वास
श्वासास स्पंदने
स्पन्दानास तू
जिंकायला  तुझा
सहवास हवा .. ...
============================

ती : अरेय कुठे आहेस ??
तो : अगं  आलोच , खूप ट्राफिक आहे अडकलो ग इथे.
ती : ओक . सावकाश ये .मी वाट बघत आहे .
तो : हो दिसतेस मला तू ....
ती : काय ??
तो : हो , किती आतुर आहे भेटण्या साठी. एक क्षण पण सुखाने बसली नाहीस . कधी या विचारत कधी त्या विचारात. सर्वाना नाहालताना परत आपल्या दोघांच्या विचारात. मग मध्ये मला शिव्या घातलेस .. "अजून कसा आला नाही , किती उशीर करतोय.. जा मी आता अजून थांबणार नाही " .. काय बरोबर न ??
(अस तिच्याशी बोलत बोलत तू तिच्या पुढे येतो.)
ती : म्हणजे तू इथेच होतास तर ..
तो : हो , तुला बघत होतो ..
ती  : मग का असा लपून बसलास .. ??
तो : तुझ्या मनाचे खेळ दुरून ऐकायचे होते... तुझा आतुरतेने वाट पाहणारा चेहरा माझ्या डोळ्यात टिपायचा होता.. तुझ्या लटक्या रागाला प्रेमाने ऐकायचं होत म्हणून
ती : जा , मी नाही बोलणार तुझ्याशी .. किती वेळ पासून मी इथे एकटीच बसली आहे..आणि तू माझी माझी गम्मत बघत बसलास.
तो : किती वेळ झाल ग .सांगशील का ??
ती : तास भर तरी झाला असणार ..
तो : (हसतो आणि तिचा हातात हात घेऊन म्हणतो ).. अरे , तू इथे येऊन फक्त १० मीनत झालीत .. आणि तू ते १० मिनिट १० वर्ष सारखी घालवली .. हेच मला बघायचं होत ग .. तुझ माझ्या वरच प्रेम.
ती : पुरे आता..:)
तुला भांडताना मी उगाच रुसावे
शब्द माझे तुज्या ओठांवर हसावे
त्या शब्दाना गुंफून तू  काव्य करावे
कव्यातच मी हरवून जावे ..

शब्द शब्दात तुला शोधावे
लेखनितुन तुजे रूप पजरावे
तुला वर्णित कविते मधे
कव्यातच मी हरवून जावे ...

असह्य होतात त्या भावना सुचेना कसे बालू त्याना
मग चालू होते विचारांची धडपड
गोंधळलेल्या मनाला तुझी ओढ़ ...

तुझ्या आठवणीचा ज्वर पोहोचला १०० डिग्री वर
कसे हे उन्हाळे मी झेलणार
कधी तुझ्या प्रेमाचा श्रावण बरसणार ...

जालीम दुनिया के दस्तूर अजीब है

कोई जलाता है भीगे मौसम में
किसी की तड़प की तपन से कहर है  


मांडतो जेव्हा सये वेदना कागदावर
तो हि पुसतो डोळे तेव्हा लेखणीचा पदरावर  

महफिल जी रंगवते 
ती गझल माझी असते
पण शब्द शब्द त्याचा 
फक्त तुझ्या साठी सजते ....   

तू चिंब भिजून माझ्या पाशात आली
जणू फुललेली वेळ ती श्रावणात नाहली
ते लाजाळूचे झाड हि लाजले असेल तेव्हा
पाहून तुझ्या मुखावर लाजलेली गुलाबी आभा   ...

तुझे रूप आधीच गोजिरे कविते
सईच्या रूपांनी ते मोहक  अजून होते  ...

गुलाबाचे फुल टिपताना सये
काट्यांचा दुख मनात येतो
कळी पासून फुला पर्यत साथ त्याची असते
आणि मी त्याचा प्राण हिसकावून आणतो

तो चंद्र हि आज ढगाआड लपला
पाहून तुझा गोजिर मुखडा

चला परत त्या दूर देशी
स्वप्नाच्या कुशीत
तुझ्या सवे
स्वप्न प्रीतीचे सजवायला
हळूच पापण्या खालून मग
स्वप्नात तुझ्या रंग भरायला ...
   
नको सजना दृष्ट लावू चंद्र लागल जाळायला
शब्द शोधता झाले वैरी कविता लागली रडायला

तुला कळते का रे माझ्या मनाचे झोके
कसे मांडतोस तंतोतन ह्या वेड्या मनाचे ठोके..

जुन्या क्षणांची जुनीच गाथा नव्याने मांडूया
हरलेल डाव आज पुन्हा एकदा खेळूया ...

आसवांची शिदोरी माहेरी दिली
सासरचे काटे वाट सोडेना आता ...

किती अजून जपून तू चालशील सख्या
एक दिवस जगणेच विसरशील जगात या ...

अपेक्षांचे घर कधी श्रीमंत नाही
जसे भेटले तसे निभवावे
...

किती अजून खेळणार शब्दाचे खेळ तू
मनातल्या भावना जड झालाय का आता ..???

पुन्हा मना एक कवितेत भर तू
शब्दात तुझ्या मला उतरायचे आता ...

मी टाकाऊ करार देऊन ते
पुसतील का ह्या देहाला
शब्दाचे पोकळ वार से वेदनेचे तीर झाले
असहनीय हे आता मनाला  


सागरात किती हि भारती हो गंगेची
क्षार त्याचा  संपेल कधी का  ???

उजाड ह्या जगात प्रेमाचा झरा
तरी रिता केला वेदनेचा घडा...

चला आता निषे ने दिली साद आम्हा
उद्या भेटू मेहफिलत तुमच्या
नवीन प्रश्न सोडवायला
शुभ घ्यावा आता...

शुभ रात्री ....

आणि मी हरवले ....

आणि मी हरवले ....

तुला बघताच मनाचे  गुलाब उमलले
प्रीतीचे रंग त्यास उतरले
रूप इतके मोहक होते कि
माझीच मी हरवले ..

तुला बघतच नजर हि भुलली
मनात प्रेमाची कळी उमलली
क्षणात जसा श्रावण बरसला
प्रीतीचा मोगरा मनात फुलाला
बघून तुझे रूप ते भुरळ मनाला पडले
आणि माझीच मी हरवले...


ते तीक्ष्ण नजरेचे तीर
पाकळी सम ओठांचे नूर
दवा प्रमाणे  सजलेले शब्दांचे काहूर
चिब भिजले शाहारलेले अंग
आणि मनात विचारांचा द्वंद  ..
 हे पाहून मी अवचित अडखडले
आणि माझीच मी हरवले ..

तू जवळ येण्या आधीच स्वप्न रंगविले
तुझ्या श्वासाच्या स्पर्शाने मोहरले
धुंदी डोळ्यात होती प्रीतीची
मनात दाटलेली भीती रातीची
वाढलेले स्पंदनाचे ठोके ऐकून
माझीच मी हरवले....  

स्पर्श तुझा जणू श्वावन सरी ओघळल्या अंगावरून
रोम रोम रोमांचित झाला तुझ्या मिठीत विसावून
भुलले मी जगाच्या रिती तुझ्या कवेत ..
त्या प्रीतीच्या पाशात अडकून
माझीच मी हरवले .....

 त्या डोळ्यांचे भाव नजरेने टिपले
ओठांवरचे नाव हळूच मी वेधले
तुझ्या मनाच्या हिंदोळ्यावर झुलताना
माझीच मी हरवले.... 
 
कधी होकार कधी नकार
कधी शब्दांना शब्दांचे घाव
असे शब्दांचे खेळ तुझ्या सोबत खेळले
पण प्रेमाचे ते शब्द ऐकून
माझीच मी हरवले .... 

चिंब पाउस, भिजलेले पाखर
शाहारलेले पान , दाटलेले मेघ
अश्या चिंब ऋतू मध्ये
तूझे हातात हात घेताना
माझीच मी हरवले ....

चालत होती वाट पण दिशा सापडेना मनाला
तुझ्या पाऊलखुणांचा आधार मी घेतला
शोध तुझा घेताना तुला जवळून जाणले
तुझ्या निखळ हास्यावर मन माझे फासले
आणि माझीच मी हरवले ...
 
तुला आठवणे क्रम नाही माझा
 पण विचारातून तू बाहेर पडतस नाही
तुला मांडायचे म्हणते शब्दात
पण शब्द काही जुडत नाही
ह्या जोडण्या तोडण्याच्या नादात
तुझ्या विचारात रमले
आणि माझीच मी हरवले

तुला सांगायचे होते सख्या

काय मनात गुपित मी ठेवले
पण तू समोर येताच
माझीच मी हरवले 

तू नसलास तरी तुझे आभास आहे
तुझा माझ्या क्षण क्षणात  वास आहे
वाऱ्याचा स्पर्श हि तुझी आठवण देतो
गंध फुलांच्या आठवणीच्या बागेत नेतो
खेळ तुझ्या आठवणीचे सतत चालू ठेवले
त्यात रमताना माझीच मी हरवले

त्या सागरकिनारी आज मी एकटीच होते
काल सोडलेल्या पाऊलखुणा निहाळत
अजून हि टवटवीत होते
नाव प्रीतीचे त्या तटावर
त्या गारव्यात परत तुलाच आठवले
आणि माझीच मी हरवले ...

तुला इतक जवळून कधी पहिलेच नाही
तुझे शब्द कधी ऐकलेच नाही
fakt तुझ्या स्वप्नाचे घरटे होते मनात
तू समोर येताच जसे चांदणे नभातून उतरले
आणि माझीच मी हरवले 
 
त्या सूर्याला दिसणार कसा प्रकाश दिव्याचा
अस काही माझा प्रेम आहे
तुझ्या जवळ असून नाही
तूच नादान आहे .... 

मी पणती तुझ्या प्रीतीची सख्या
सतत पेटत राहीन प्रेमात आपल्या
तू साथ दे ते  पात्र बनून
साठवून ठेव मला मनात आपल्या .

तू पणती मी वात

तुझ्या मुळे माझ्या आयुष्यास सुरवात
सांग ना देशील का शेवट पर्यंत साथ

मी जळत होते तुझ्या विरहात ज्वलंत
पणती बनून तुझ्या आठवणीची साथ होती
पण त्या हि तू हिरावून घेतल्या
आता वातीची झाली राख होती ..