Wednesday, February 22, 2012

आणि मी हरवले ....

आणि मी हरवले ....

तुला बघताच मनाचे  गुलाब उमलले
प्रीतीचे रंग त्यास उतरले
रूप इतके मोहक होते कि
माझीच मी हरवले ..

तुला बघतच नजर हि भुलली
मनात प्रेमाची कळी उमलली
क्षणात जसा श्रावण बरसला
प्रीतीचा मोगरा मनात फुलाला
बघून तुझे रूप ते भुरळ मनाला पडले
आणि माझीच मी हरवले...


ते तीक्ष्ण नजरेचे तीर
पाकळी सम ओठांचे नूर
दवा प्रमाणे  सजलेले शब्दांचे काहूर
चिब भिजले शाहारलेले अंग
आणि मनात विचारांचा द्वंद  ..
 हे पाहून मी अवचित अडखडले
आणि माझीच मी हरवले ..

तू जवळ येण्या आधीच स्वप्न रंगविले
तुझ्या श्वासाच्या स्पर्शाने मोहरले
धुंदी डोळ्यात होती प्रीतीची
मनात दाटलेली भीती रातीची
वाढलेले स्पंदनाचे ठोके ऐकून
माझीच मी हरवले....  

स्पर्श तुझा जणू श्वावन सरी ओघळल्या अंगावरून
रोम रोम रोमांचित झाला तुझ्या मिठीत विसावून
भुलले मी जगाच्या रिती तुझ्या कवेत ..
त्या प्रीतीच्या पाशात अडकून
माझीच मी हरवले .....

 त्या डोळ्यांचे भाव नजरेने टिपले
ओठांवरचे नाव हळूच मी वेधले
तुझ्या मनाच्या हिंदोळ्यावर झुलताना
माझीच मी हरवले.... 
 
कधी होकार कधी नकार
कधी शब्दांना शब्दांचे घाव
असे शब्दांचे खेळ तुझ्या सोबत खेळले
पण प्रेमाचे ते शब्द ऐकून
माझीच मी हरवले .... 

चिंब पाउस, भिजलेले पाखर
शाहारलेले पान , दाटलेले मेघ
अश्या चिंब ऋतू मध्ये
तूझे हातात हात घेताना
माझीच मी हरवले ....

चालत होती वाट पण दिशा सापडेना मनाला
तुझ्या पाऊलखुणांचा आधार मी घेतला
शोध तुझा घेताना तुला जवळून जाणले
तुझ्या निखळ हास्यावर मन माझे फासले
आणि माझीच मी हरवले ...
 
तुला आठवणे क्रम नाही माझा
 पण विचारातून तू बाहेर पडतस नाही
तुला मांडायचे म्हणते शब्दात
पण शब्द काही जुडत नाही
ह्या जोडण्या तोडण्याच्या नादात
तुझ्या विचारात रमले
आणि माझीच मी हरवले

तुला सांगायचे होते सख्या

काय मनात गुपित मी ठेवले
पण तू समोर येताच
माझीच मी हरवले 

तू नसलास तरी तुझे आभास आहे
तुझा माझ्या क्षण क्षणात  वास आहे
वाऱ्याचा स्पर्श हि तुझी आठवण देतो
गंध फुलांच्या आठवणीच्या बागेत नेतो
खेळ तुझ्या आठवणीचे सतत चालू ठेवले
त्यात रमताना माझीच मी हरवले

त्या सागरकिनारी आज मी एकटीच होते
काल सोडलेल्या पाऊलखुणा निहाळत
अजून हि टवटवीत होते
नाव प्रीतीचे त्या तटावर
त्या गारव्यात परत तुलाच आठवले
आणि माझीच मी हरवले ...

तुला इतक जवळून कधी पहिलेच नाही
तुझे शब्द कधी ऐकलेच नाही
fakt तुझ्या स्वप्नाचे घरटे होते मनात
तू समोर येताच जसे चांदणे नभातून उतरले
आणि माझीच मी हरवले 
 
त्या सूर्याला दिसणार कसा प्रकाश दिव्याचा
अस काही माझा प्रेम आहे
तुझ्या जवळ असून नाही
तूच नादान आहे .... 

मी पणती तुझ्या प्रीतीची सख्या
सतत पेटत राहीन प्रेमात आपल्या
तू साथ दे ते  पात्र बनून
साठवून ठेव मला मनात आपल्या .

तू पणती मी वात

तुझ्या मुळे माझ्या आयुष्यास सुरवात
सांग ना देशील का शेवट पर्यंत साथ

मी जळत होते तुझ्या विरहात ज्वलंत
पणती बनून तुझ्या आठवणीची साथ होती
पण त्या हि तू हिरावून घेतल्या
आता वातीची झाली राख होती .. 

1 comment: