Wednesday, February 22, 2012

मनाच्या कप्प्यातून ...

मनाचा भेद अजून हि मला उमगला नाही ..
काय खरं ? काय काल्पनिक ? काहीच कळेना ..
कधी एकटाच असतो तरी गुंतलेला..
गर्दीत असला तर हरवलेला..
असा कसा विचित्र स्वभाव रे तुझा...

आज का? खिडकी बाहेर डोकाऊन बघतोस ..
कुणाची वाट आहे का ??? कोण येणार आहे का ??
तुझ्या ह्या अंधारात डोम्बायला येणार तरी कोण  ..
माझ्या शिवाय आहे का तुझा कोणी सख्या ...
नशीबच तुझा खोटा...

कस रे तुझ अस जगन माझ्या मना ..
न संगती तुझ्या कोणी .. न कुणाची उणीव तुला ..
खरच कारे  tu  मातीचा पुतळा फक्त स्वप्नात  भाराकातणारा ??

No comments:

Post a Comment