Thursday, February 16, 2012

manatlya kavita...

उधळून रंग सारे .. एक चित्र रेघाटला
मात्र काळ्या रेघाने .. सर्वस्वी पुसला  ..

डाव जिंकण्यास तो ... शतरंज खेळला..
एकाच त्या प्याद्याने ... साम्राज्य जिंकला ..

घडून गेले महाभारत .. जुगाराच्या खेळात कधी
पण तोचं जुगार आज .. जीवनाचा जुगाड बनला ..

कधी हसत होती .. रेष नशिबाची हाती ..
आज त्याच नशीबापुढे .. रडताना पहिले ..

सावल्यांची गर्दी .. व्यथा मनाची ..
कभी संपणार हि वाट काटेरी क्षणाची ..
===================================================

लाल पिवळा निळा.. रंगांशी मी खेळते..
श्वेत चकमकीत कॅनवासवर .. कुंचीचे सडे सोडते ...
कधी प्रेमाचा ... कधी मैत्रीचा ..
कधी निखळ नात्याच्या स्पर्शाचा..
आठवणीचा रंग भरभरून त्यात भरते ...  
श्वेत चकमकीत कॅनवासवर ..  रंगांशी मी खेळते..
एक तुझा.. एक माझा ..
एक आपल्या सुखद क्षणाचा..
कधी स्मित ...कधी रुसवा ..
कधी ओघळणाऱ्या त्या सरींचा  ..
अश्या निरनिराळ्या रसाने त्यास सजवते
श्वेत चकमकीत कॅनवासवर ..  रंगांशी मी खेळते..
स्वतःशीच बोलतो कधी.. मनाचे द्वंद चाळतो कधी..
निरागस प्रतिमेची .. अनुभूतीही देतो  कधी ..
मूक राहून माझ्या शब्दांना .. रंगत उधळते ..
श्वेत चकमकीत कॅनवासवर ..  रंगांशी मी खेळते..
 ============================================


No comments:

Post a Comment