vision ...
तुटलेली फांदी .. मोडलेला कणा ..
गळलेली पानं ..अशी क्षीण अवस्था ..
कधी तरी .. कणखर उभा होता ..
त्या गगनाला स्पर्श करण्याचा ध्यास त्याचा..
पण समय कधी थांबतो कुणा साठी ..
निजला बोटी बोटी प्राण त्याचा....
.
.
तो जीर्ण जरी आज पडलेला खोड आहे
पण जीवांशी त्याची जोड आहे..
शेवटच्या श्वास पर्यंत लढतो तो "वृक्ष"
.
.
माणूस काही वेगळा नाही..
पण परोपकारी नसतात वृक्ष सारखे..
आपले घर आणि सुख पोटी
करतात स्वतःलाच स्वतः पासून परके ...
.
.
एक दिवस असेच स्वप्न घेऊन ..
पापण्या मिटायच्या आहेत..
पण त्या आधी बघ जमात्का..
स्वाभिमानाने जगायचे आहे...
No comments:
Post a Comment