Friday, February 10, 2012

ram

मी प्रेम केल फक्त तुला ..
प्रत्येक क्षण ...प्रत्येक श्वास सोबत ..
मी फक्त तुझीच होते ..
प्रत्येक शब्दत ..प्रत्येक आठवणी सोबत ... 
मला फक्त तूच पाहिजे...
प्रत्येक वळणावर ..प्रत्येक प्रवासात माझ्या..
माझी नेहमीच साथ तुला ..
प्रत्येक संकटात ..प्रत्येक दुःखात तुझ्या ..
तू स्वच्छंद आहेस ...असाच राहा ..
मी कधीच घालणार नाही बंधन तुला...
मी नेहमीच जपीन तुझ्या माझ्या भूमिकेला आयुष्यात
देऊन मोकाट वाट त्यांना
मी जपीन तुझा माझा स्वातंत्र नात्यात अपुल्या ....
तुझी आवड .. तुझे स्वप्न ..तुझी प्रत्येक इच्छा ..
मी माझी म्हणून जगीन .. कधीच नसणार दुजावा तिथे
जिथे तू तिथे मी असेन ...
तू विश्वास ठेव तुला कधी उणीव भासणार नाही ..
मी तुझ्या प्रत्येक नात्याला पूर्णपणे न्याय देईन ...
मी फक्त प्रेयसी नाही .. ना तुझी अर्धांगिनी ...
तुझा मित्र ..तुझी मैत्रिणी .. तुझ्या प्रवासाची संगिनी ...
खुप मोठे असे स्वप्न मी तुला दाखवू शकत नाही
पण छोट्या छोट्या प्रयत्नाने नक्कीच आयुष्यात
आनंद भरभरून  आणीन ..
तुला हसताना मला खूप आवडतोस त्या स्मितसाठी ..
मी आसमंत एक करेन ...
तुझी साथ फक्त इतकीच नाही
त्या बियराच्या पेल्या पासून ..
........ प्रत्येक मौज मस्ती मध्ये पूर्ण सहभाग राहील ..
लग्नाच्या बेड्या.. कारावासाच वेडा.. कधी हि तुला भासणारा नाही ...
तू फक्त तू बनून राहशील आणि .. मी आपले अस्तित्व असेच जपीन
सख्या...
तू माझा जीवन, माझा श्वास, माझा हृदय ..माझी आत्मा आहेस..
माझा क्षण माझे शब्द माझे काव्य तू आहेस...
माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक रंगत तूच आहेस...
मला पूर्ण करणारा तू तो कान आहेस...
मी खरच नशीबवान आहे .. तुझी साथ मला लाभली ..
तुझ्या सोबत जाण्याची एकच इच्छा बाकी ...
 अजून कुणाची हि मला वाट नाही.. तू तो आहेस ज्यात मला सर्व काही मिळाल
अपेक्षा पेक्षा जरा जास्तच तू मला दिल ..
मी मनापासून आभारी आहे.. तुझ्या त्या प्रत्येक क्षणासाठी..
" कसे साठवू इतक प्रेम ?? " असे प्रश्न पडणाऱ्या प्रेमासाठी ..  
तू मला इतक दिलास ओंझाल भरून वाहू लागली..
माझे शब्द हि अपुरे पडतील ..
इतक आयुष्य मी तुझ्या सोबत आनंदाने जगली ..

शेवटी इतकच मला तुला सांगायचे आहे..
माझ्या आयुष्य तुझ्या शिवाय कोणी ना आले .. ना येणार आहे ..
तूच माझा वर्तमान ..आणि भविष्य आहेस...
मी फक्त तुझीच रे ....
पण वचन कस देऊ .. ..जर नाहीच पुरली आयुष्याची साथ तर करशील न मला माफ  ....



No comments:

Post a Comment