Tuesday, February 21, 2012

कॅनवास आणि मी

मी चित्र कोरले मनाच्या क्यान्वासवर
रंग संगती जमेना आता
संग सख्या येशील कां
उमटून दिसतील सर्व रेश्या ???

तो कॅनवास प्रथमच पहिला आणि मनात आला
माझ्या मनाचा कोरा करकरीत कोपर्यात पडलेला
एक कोण... त्या कॅनवास सारखाच

मी रेखाटल्या दो तीन रेश्या आणि लक्षात आले निसटलेले क्षण
उडालेले रंग आणि ते निरागस जीवन...

परत त्या चित्र पुसले ..कॅनवास ला पाण्याने धुतलं
पण तरी उमटलेल्या त्या रेश्या काही फिक्कटश्या अजून तिथेच होत्या

खूप पर्यंत केला जुना चित्र पूर्णपणे खोदण्याचा
पण त्या कॅन्वासला हि त्यांचा लडा लागला होता
आणि तो काही त्यांना सोडेना आता ..

ते रंग पुसून नवीन रंग भरायचे होते
एक नवीन आकार चित्रास द्यायचे होते
पण हट्टी त्या रेश्या ...जागाचं धरून बसल्या
अडीयल घोडय प्रमाणे जणू होत्या रुसल्या ..

किती तरी रंग होते मी कपाटात ठेवले
कुंच्यांचे होते आयुष्य वाट बघत सरले
पण कसे सांग मी त्यानाही जीवन देणार
त्या रेषांचे आधी साम्राज्य कसे खोडणार ...??

=============================================================
 
लाल पिवळा निळा.. रंगांशी मी खेळते..
श्वेत चकमकीत कॅनवासवर .. कुंचीचे सडे सोडते ...
कधी प्रेमाचा ... कधी मैत्रीचा ..
कधी निखळ नात्याच्या स्पर्शाचा..
आठवणीचा रंग भरभरून त्यात भरते ...
श्वेत चकमकीत कॅनवासवर ..  रंगांशी मी खेळते..
एक तुझा.. एक माझा ..
एक आपल्या सुखद क्षणाचा..
कधी स्मित ...कधी रुसवा ..
कधी ओघळणाऱ्या त्या सरींचा  ..
अश्या निरनिराळ्या रसाने त्यास सजवते
श्वेत चकमकीत कॅनवासवर ..  रंगांशी मी खेळते..
स्वतःशीच बोलतो कधी.. मनाचे द्वंद चाळतो कधी..
निरागस प्रतिमेची .. अनुभूतीही देतो  कधी ..
मूक राहून माझ्या शब्दांना .. रंगत उधळते ..
श्वेत चकमकीत कॅनवासवर ..  रंगांशी मी खेळते..
 ============================================
रंग ..
कॅनवास सजतो रंगानी .. एक नवा रूप त्यास मिळतो..
मिळवलेल्या रुपला मात्र .. आपल्या पासून परका करतो ...

उमटलेल्या छटा .. ठळक दिसतात आज फलकावर ..
आठवणीचे रंग ते .. कॅन्वास्च्या पटलावर  ...

कोण आपले कोण परके .. इथे जाळले किती तरी घरटे ..
रंग नवे नवे बांधून बघते .. नवीन भावना मांडून बघते ..
कधी सजवून ती कातरवेळ   .. तुझी माझी भेट ..
कधी ती पाहत उगवती .. आणि दुरावा तुझ्या माझ्या मधी ...
असे काही परत परत मिटवून बघते ..
सजवून बघते..
कारण कॅनवास आणि माझे नातेच वेगळे....
==================================================== 
कधीच अपूर्ण चित्र तो ..आज हि अपूर्णच आहे..
ना रंग संगती कळते त्यात.. ना अर्थाचा बोध आहे..
जीर्ण दशा त्याची .. पुन्हा पुन्हा आठवते..
होता कोपर्यात पडलेला .. मला बघत थबकलेला..
असे वाटे जणू मला काही प्रश्नच विचारते ..
कर पूर्ण आज तरी अशी साद घालते ..
इथे ना रंग आहेत .. मग उधळ करू कशाची..
ना रस आहे .. मग भास देऊ तुला कशाचा ..
सर्व अपूर्ण स्वाप.. उडालेले रंग. .विसंग संग  ..
उरले ते फक्त विरुद्ध रंग ....
==================================================== 
 
खुबदा प्रयतज्ञ करूनही क्यांवासात तो उतरत नव्हता
तो माझा, क्यानव्हास माझा तरीही गाळ वाढत होता
शेंवटी ठरवले क्यानवास कोराच ठेवायचा
समोर नुसत्या आठवणींचा रंग भरायचा
...............
आज कळले तू कुठेच नव्हतास
तू फक्त अवती भवती वावरत होतास
माझ्या प्रेमाचा धाग्यातील एक भास होतास
जो गुंफता गुंफता गुंता होऊन वाढतच गेलास
..................
आता मी क्यानव्हास गोळा करते त्यात मला उतरवते
डोळ्यातील अश्रूंनाही उगाच एक वाट मिळते
अधून मधून तू येतोस त्यातील चित्र पाहिला
पण तुझ्या कोरड्या नजरेला जमेल का भाव ओळखायला
==================================================== 

No comments:

Post a Comment