Wednesday, February 15, 2012

कविते आज तुझ्यावर मी कविता लिहायची म्हणते ....

हटकून आज मी काही खास करायचं म्हणते
कविते आज तुझ्यावर मी  कविता लिहायची म्हणते ....

खूप झाले मांडून कौतुक सख्याचे..
भांडण क्षणाचे ..  लटके राग मनाचे..
आज मी तुझ्या मनतले आर्त पिळायचे म्हणते
कविते आज तुझ्यावर मी  कविता लिहायची म्हणते ....

गळती पानाची..उसासे वनाचे  ..
चटके उन्हाचे ..असे भोगलस  भोग शब्दांचे
म्हणून आज जखमेवर फुंकर घालायचं म्हणते
कविते आज तुझ्यावर मी  कविता लिहायची म्हणते ....

गारव्याचे वर्णन... श्रावणाचे आगमन ..
चिंब भिजलेले कण कण .. असे रुजले दव अर्थाचे
म्हणून आज त्या शब्दांना उब द्यायची म्हणते ...
कविते आज तुझ्यावर मी  कविता लिहायची म्हणते ....

कधी घरकुल सजवलस तू.. कधी उद्वस्त होताना पाहिलास..
बंध प्रेमाचे जुड्तांना ..तुटतांना पाहिलास...
म्हणून आज मी तुला मुक्त करायचं म्हणते..
कविते आज तुझ्यावर मी  कविता लिहायची म्हणते ....

कोणी लिहले आर्त भाव .. कोणी मांडला प्रश्नांचा डाव..
शब्दांचे खेळ तू जिंकताना ..हरतांना  पाहिलास ...
म्हणून आज तुला निशब्द कराच म्हणते
 कविते आज तुझ्यावर मी  कविता लिहायची म्हणते ....

No comments:

Post a Comment