मी आणि माझी ती खोली
चार भिंती आणि एक खिडकी
खिडकीतून दिसणारे तुझे रूप गोजिरे
नजर पुन्हा पुन्हा जडते त्या पटलावरती ...
रंगांचे खेळ खेळतोस नभी ..
कधी तांबडा कधी केशरी ..
उधळण नव किरणांची ऐसी
चार भिंती आणि एक खिडकी
खिडकीतून दिसणारे तुझे रूप गोजिरे
नजर पुन्हा पुन्हा जडते त्या पटलावरती ...
रंगांचे खेळ खेळतोस नभी ..
कधी तांबडा कधी केशरी ..
उधळण नव किरणांची ऐसी
ढगाने नेसली जणू भारी जरदारी ...
हिरवे हिरवे शालू पांघरून
नाचते पालवी उरावरी ..
रूप निहालता तुझे हसतो
तो वारा वेली पाशी ...
पाखर भिजली .. घरट्यात निजली ...
दूर देशी असे त्यांची स्वारी ..
इवले इवले पंखांचे
स्वप्न क्षितिजापरी ....
काळी काळी उमलली ..
सुगंध पसरला चाहु दिशा
किलीबिलाट पक्षांचा
मोहरून आला निसर्ग जसा...
तुझीच वाट चाराचाराला
कणा कणाला ध्यास तुझा
सर्व जगाला जगवणाऱ्या
नारायणला नमन माझा...
नारायणला नमन माझा...
No comments:
Post a Comment