Tuesday, February 14, 2012

kahi tari ashch

हास्य जरी ओठी ...शिप्ल्यात मोती आहे
काय सांगू सजना .. वेदनेचे गीत ओठी आहे ..
तू गेलास ऐसा निघून ..पुन्हा नजर ती न वळली
मी इथेच होती उभी .. निहारात तुझी छबी ..
तोडून गेलास वाचन तू .. मोडून स्वनांचा झोपाळा ..
संग सजना कुठे बंधू  ..तुझ्या विना निवारा ..
मी शोध तुझा घेण्यास केला.. आसमंत एक सारा ..
आता निजते निरोप दे रे .. आवरून प्रेमाचा पसारा ..

===============================================

तुझ प्रेम माझ्या साठी फक्त आठवण नाही ..
एक एक क्षण आयुष्याचा फक्त साठवण नाही ..
श्वास आहे .. जीव आहे. .. अर्थ जगण्याचा ..
उगाच नाही माझा हट्ट हा तुझ्या सवे काही क्षणाचा ..

तुझ्या येण्याने एक नावच रंग आलाय आयुष्यात माझ्या ..
आठवा रंग प्रेमाचा जणू इंद्रधनुष्यात त्या ..
तुझ्या येण्याने आनंदाचे झरे पाझरू  लागले..
स्मित ओठी सजलेले संग लपवू ते निशाण कसे ...
 लाजले मन थोडे .. थोड्या झुकल्या पापण्या ..
तुझ्या चाहुलीने वाढली हृदयी स्पंदने    ..
तुझ्या येण्याने आयुष्य बहरून आलाय वसता जसा..
सुगंध प्रेमाचा दरवळला मोहरल्या चाहु दिशा  ..

==============================================
साथ तुझी हवी मला ...

शांत कातरवेळ ती ..एकांतात हरवलेली ..
प्रीती तुझी हवी आहे ..त्या दुरावलेल्या वाटे वरती ...

बरसून जाणारे मेघ नको ..नको त्या श्रावण सारी ..
रिमझिम बरसणारी सदा .. हवी साथ मला तुझी ...

जाई-जुईची बाग नको.. नको सुगंधाची वारी ..
रानफुलांना सुखावणारी मला वाऱ्याची ती झुळूक  हवी ..

शब्दांचे खेळ नको .. त्यांच्या अर्थाच्या निवारा दे ..
दुजावा नको भावनेचा .. आस आठवणीचा पसारा दे ..

गडद सर्वत्र पास्लेला .. तुझा साथ हवा आहे ..
तिमिरातून तेज कडे मला मार्ग हवा आहे ..

सृष्टी नको सारी मला.. प्रेमाची वृष्टी दे ..
तुझ्या विश्वासाची फक्त मला .. आयुष्य भर दृष्टी दे ...

श्वास पासून दुरावा नको .. शब्दांचा पुरावा नको ..
खाचणाऱ्या मला माझ्या तुझ्या मिठीचा आधार दे ..

आयुष्य तुझा नको मला.. प्रत्येक क्षणात तू हवा आहेस..
प्रत्येक क्षण वाटावा कि .. आयुष्य तो नवा आहे ..
=======================================================

No comments:

Post a Comment