मी च घडवते , मी च मोडते ...
संसार तिचा माझी कल्पना ..
हव तसं रूप देते तिला ...
मी शब्दात गुंतवते तिला ..
कधी वृत्त बद्ध ती ..
कधी यमक जुडणारी फक्त ..
हव तसं वळण घालते तिला ..
मी शब्दात गुंतवते तिला ..
कधी भावांचा पसारा इथे ..
कधी काट्यांचा आधार तिला ..
मात्रांच्या पाशात कधी अडकवते तिला ..
मी शब्दात गुंतवते तिला ..
कधी थंड गार वारा..
कधी उकळणारा उन्हाळा ..
कधी ओलीचिंब भिजवते तिला
मी शब्दात गुंतवते तिला ..
कधी गळलेला पान ती ..
कधी ती स्वप्न तुटलेला ..
उमीद बनून मी जागवते तिला
मी शब्दात गुंतवते तिला ..
कधी क्षणातल क्षण ती ..
कधी उडालेला पाखरू ..
रंग बनून कॅनवासवर रंगले तिला
मी शब्दात गुंतवते तिला ..
कधी शब्दात बांधले ..
कधी अर्थात बोधले..
प्रत्येक ओळीत शृंगार दिले तिला
मी शब्दात गुंतवते तिला ..
No comments:
Post a Comment