Wednesday, August 31, 2011

मैत्री........

मैत्री हि लाजाळूच्या झाड प्रमाणे,
स्पर्श केला तर कोमिजते,
पण परत फुलते आपुलकीच्या स्पर्शा साठी...

मैत्री आहे केतकीचे फुल,
ज्याचा सुगंध दरवळतो काळाने होणार्या हि गाठी भेटीत,

मैत्री आहे रेशमी बंधन,
 ज्याची गाठ असते अतूट नात्याचे दर्पण,
 
निवन जून काही नसते नात्यान मध्ये,
फक्त असते ती जाणीव मित्राच्या प्रेमाची,

निव नात्याची असते मैत्री,
आणि मैत्री मध्ये असुदे तुझ्या विश्वासाची खात्री ....

फक्त तूझ्या साठी प्रिये .......

गुलाब चंपा चमेली,
सर्व फुले फुलली,
खास तू येणार म्हणून,
हि  बाग हि सजली..

निळ्या निळ्या आकाशात,
इंद्रधनुष्य हि साकारले,
जणू दारावर बांधले तोरण स्वागताचे..

 रम्य हि सांझ सखे,
फक्त तुझी वाट आहे,
माझ्या हृदयी उफानलेला,
भावनांचा घाट आहे ...



 

 
 

स्वप्न प्रीतीचे..........

असे सुंदर स्वप्न होते तुझ्या माझ्या प्रीतीचे,

 डोंगरा पलीकडे त्या देशात  जिथे नसतो या समाजाचा अट्टाहास,
 दूर या जागा पासून, रिती रीवाजांच्या पाशातून मुक्त होऊन,
नसणार कुणी बोलणारे, स्वप्न प्रीतीचे तोडायला,
तू  चिमणा मी चिमणी, असणार घरटे छोटेसे,
ते घरटे अपुले मोडायला,
तुझे माझे असे होते  फक्त इवले से स्वप्न प्रीतीचे...

 पण  कुठून हे वादळ आले, स्वप्नांचे घरटे मोडून गेले,
त्या  काळोख्यात प्रेमाची  झीलमिल करणारी शेवटची आशा हि विझून गेली,
मी होते तिथेचं तुझ्या मागे, पण तू पाठमोरी निघून गेला,
जाताना एकदा हि विचार नाही का तुला माझा आला,
 मी आज ही आहे तिथेचं तुझ्या शब्दांच्या विश्वासावर,
नजर अजून हि आहे तुझ्या परतीच्या वाटेवर......


Tuesday, August 30, 2011

साद मुक्तीची ........

मी पहिले  या जगात,
स्वप्नांनी भरलेले डोळे आणि आसुसलेले मन,
उडण्यासाठी  आतुर प्रत्येक क्षण,
का कोण जाणे त्याला या कोठरीत डांबले,
स्वच्छंद, स्वातंत्र्य  का हिसकावून घेतले,
भावनाना त्याचा का तो समजून घेत नाही,
स्वतः च्या मोह पायी त्या निष्पापाचे  प्राण घेई,
बघ त्या  इवल्याशा जिवा कडे प्रेमाने,
हरवलेले स्मित त्याच्या चेहर्याचे,
आवाजातले कंपण सुद्धा तुला कसे भासत नाही,
इतका निष्टुर आहे प्राण तुझा कि वेदनेची साद तुला कळत नाही,
नको त्याला तुझा हा अफाट पसारा,
मखमलची गादी आणि सोन्याचा पिंजरा,
ऐक साद त्या मुक्ती ची, म्हणे कर " मुक्त मला "..................

----------------**************-----------------*************----------------------


 

इवल्याश्या गोष्टी...

का त्याला डोळ्यांची भाषा कळत नाही,
का भावनानमध्ये गुंतलेले हे मन त्याला सोडत नाही,
आयुष्याचा साथ आहे हे स्वप्न मला सांगतात,
पण  मी त्याला स्वप्ना मध्ये हि  दिसत नाही,
काळजाच्या प्रत्येक ठोक्या सोबत फक्त त्याचा ध्यास आहे,
पण त्याला माझ्या प्रेमाचा जरा हि  आभास नाही.
*************************************************************************

डोंगराला शिखर, तर सागराला तट,
आकाशाला आहे क्षितिजाची अट,
दिवस रात्री ची तीच वाट,
सगळ कुठे तरी संपतो,
विलीन होता एक दुज्या साठी,
 प्रेम हि अस कराव,
या जगात असेन फक्त तुझ्या साठी...............
************************************************************************

 तो सहज सगळ  बोलून जातो,
 नवीन आशा, नवे स्वप्न देऊन जातो,
प्रेम केले नाही पण प्रेमात पडले मी तुझ्या,
तू सहज सगळ करतोस तरी,
तुटत रे  मन माझा............
*************************************************************************

भेटतील जन्मांच्ये  नाती,
जुडतील प्रेमाच्या गाठी,
एक  पहाट  अशी येईल,
इवलेसे स्वप्न तुझे माझे,
ते पूर्ण होईल........
*************************************************************************

मनात असलेले बोलून  द्यावे,
क्षणात सगळे बदलू शकते,
आणि ओठान वर असलेले शब्द,
तिथेच अडकून बसतात,
मग उरते शिल्लक ती फक्त खंत त्या न बोललेल्या शब्दांची...........
**************************************************************************

कळतेत त्याला हि नं बोललेले शब्द माझे,
नं पूर्ण होणारे स्वप्न माझे,
माझ्या  परिस्थितीचीहि  जाणीव आहे त्याला,
मग का प्रत्येक क्षणी त्याच प्रश्नाचे उत्तर हवे त्याला.......
**************************************************************************

कुणी तरी स्वप्न दिले,
स्वप्न बघितले तर विचारतो कसेगं सये तुला ते पडले,
कुणी तरी वाट दिली,
चालताना विचारतो हि वाट  कशी जाहली
 कुणी तरी अलगद स्पर्श केले,
गप्प असलेल्या लेखणीला ,
लिह्तात्ना विचारतो,
कसेगं सये तू अर्थ देतीस या जीवनाला ..
**************************************************************************


Sunday, August 28, 2011

हवा क्षण भर विसावा....

हवा क्षणभर विसावा या थकलेल्या मनाला ,
                क्षितिजाच्या काप्रीतून चैतन्य शोधायला ,
दुभंगलेल्या स्वप्नांची कालोख्यात मशाल ,
                 मशालीच्या प्रकाशाने उजडती आशा ,
 कधी कधी सुटेना  कोडी या मनाची ,
                  कधी आटते  पान्हा कधी भारती सागराची,
 धावते कधी पावसाच्या सरीतून ,
                   टीपकटे कधी निखाडत्या थेम्बातून ,
झरते कधी  रुसलेल्या आसवांनी ,
                    फुलते कधी  हासऱ्या डोळयातून ,
सुख दुखाच्या उन्ह सावलीने  नको कधी  धीर सोडू ,
                    संघर्षाच्या चौसराचा खेळ नको  मोडू ,
कधी तुझा डाव कधी  माझा डाव तुला जिंकायचेच आहे,
                    आनंदाचा तुषार अन दुखाचा गारा तुला  झेलायच्या आहे ,
 गारठलेल्या जीवनाला  उबवायचे आहे ,
                     निखळत्या आशांना  सावरायचे आहे ,
मना मनाला जोडायचे आहे ,
                     झरत्या  जख्मानणा  बांधायचे आहे ,

म्हणून हवा मानसला क्षणभर विसावा ......