Sunday, August 28, 2011

हवा क्षण भर विसावा....

हवा क्षणभर विसावा या थकलेल्या मनाला ,
                क्षितिजाच्या काप्रीतून चैतन्य शोधायला ,
दुभंगलेल्या स्वप्नांची कालोख्यात मशाल ,
                 मशालीच्या प्रकाशाने उजडती आशा ,
 कधी कधी सुटेना  कोडी या मनाची ,
                  कधी आटते  पान्हा कधी भारती सागराची,
 धावते कधी पावसाच्या सरीतून ,
                   टीपकटे कधी निखाडत्या थेम्बातून ,
झरते कधी  रुसलेल्या आसवांनी ,
                    फुलते कधी  हासऱ्या डोळयातून ,
सुख दुखाच्या उन्ह सावलीने  नको कधी  धीर सोडू ,
                    संघर्षाच्या चौसराचा खेळ नको  मोडू ,
कधी तुझा डाव कधी  माझा डाव तुला जिंकायचेच आहे,
                    आनंदाचा तुषार अन दुखाचा गारा तुला  झेलायच्या आहे ,
 गारठलेल्या जीवनाला  उबवायचे आहे ,
                     निखळत्या आशांना  सावरायचे आहे ,
मना मनाला जोडायचे आहे ,
                     झरत्या  जख्मानणा  बांधायचे आहे ,

म्हणून हवा मानसला क्षणभर विसावा ......

No comments:

Post a Comment