का त्याला डोळ्यांची भाषा कळत नाही,
का भावनानमध्ये गुंतलेले हे मन त्याला सोडत नाही,
आयुष्याचा साथ आहे हे स्वप्न मला सांगतात,
पण मी त्याला स्वप्ना मध्ये हि दिसत नाही,
काळजाच्या प्रत्येक ठोक्या सोबत फक्त त्याचा ध्यास आहे,
पण त्याला माझ्या प्रेमाचा जरा हि आभास नाही.
*************************************************************************
डोंगराला शिखर, तर सागराला तट,
आकाशाला आहे क्षितिजाची अट,
दिवस रात्री ची तीच वाट,
सगळ कुठे तरी संपतो,
विलीन होता एक दुज्या साठी,
प्रेम हि अस कराव,
या जगात असेन फक्त तुझ्या साठी...............
************************************************************************
तो सहज सगळ बोलून जातो,
नवीन आशा, नवे स्वप्न देऊन जातो,
प्रेम केले नाही पण प्रेमात पडले मी तुझ्या,
तू सहज सगळ करतोस तरी,
तुटत रे मन माझा............
*************************************************************************
भेटतील जन्मांच्ये नाती,
जुडतील प्रेमाच्या गाठी,
एक पहाट अशी येईल,
इवलेसे स्वप्न तुझे माझे,
ते पूर्ण होईल........
*************************************************************************
मनात असलेले बोलून द्यावे,
क्षणात सगळे बदलू शकते,
आणि ओठान वर असलेले शब्द,
तिथेच अडकून बसतात,
मग उरते शिल्लक ती फक्त खंत त्या न बोललेल्या शब्दांची...........
**************************************************************************
कळतेत त्याला हि नं बोललेले शब्द माझे,
नं पूर्ण होणारे स्वप्न माझे,
माझ्या परिस्थितीचीहि जाणीव आहे त्याला,
मग का प्रत्येक क्षणी त्याच प्रश्नाचे उत्तर हवे त्याला.......
**************************************************************************
कुणी तरी स्वप्न दिले,
स्वप्न बघितले तर विचारतो कसेगं सये तुला ते पडले,
स्वप्न बघितले तर विचारतो कसेगं सये तुला ते पडले,
कुणी तरी वाट दिली,
चालताना विचारतो हि वाट कशी जाहली
कुणी तरी अलगद स्पर्श केले,
गप्प असलेल्या लेखणीला ,
लिह्तात्ना विचारतो,
कसेगं सये तू अर्थ देतीस या जीवनाला ..
**************************************************************************
No comments:
Post a Comment