Tuesday, August 30, 2011

साद मुक्तीची ........

मी पहिले  या जगात,
स्वप्नांनी भरलेले डोळे आणि आसुसलेले मन,
उडण्यासाठी  आतुर प्रत्येक क्षण,
का कोण जाणे त्याला या कोठरीत डांबले,
स्वच्छंद, स्वातंत्र्य  का हिसकावून घेतले,
भावनाना त्याचा का तो समजून घेत नाही,
स्वतः च्या मोह पायी त्या निष्पापाचे  प्राण घेई,
बघ त्या  इवल्याशा जिवा कडे प्रेमाने,
हरवलेले स्मित त्याच्या चेहर्याचे,
आवाजातले कंपण सुद्धा तुला कसे भासत नाही,
इतका निष्टुर आहे प्राण तुझा कि वेदनेची साद तुला कळत नाही,
नको त्याला तुझा हा अफाट पसारा,
मखमलची गादी आणि सोन्याचा पिंजरा,
ऐक साद त्या मुक्ती ची, म्हणे कर " मुक्त मला "..................

----------------**************-----------------*************----------------------


 

No comments:

Post a Comment