Wednesday, August 31, 2011

स्वप्न प्रीतीचे..........

असे सुंदर स्वप्न होते तुझ्या माझ्या प्रीतीचे,

 डोंगरा पलीकडे त्या देशात  जिथे नसतो या समाजाचा अट्टाहास,
 दूर या जागा पासून, रिती रीवाजांच्या पाशातून मुक्त होऊन,
नसणार कुणी बोलणारे, स्वप्न प्रीतीचे तोडायला,
तू  चिमणा मी चिमणी, असणार घरटे छोटेसे,
ते घरटे अपुले मोडायला,
तुझे माझे असे होते  फक्त इवले से स्वप्न प्रीतीचे...

 पण  कुठून हे वादळ आले, स्वप्नांचे घरटे मोडून गेले,
त्या  काळोख्यात प्रेमाची  झीलमिल करणारी शेवटची आशा हि विझून गेली,
मी होते तिथेचं तुझ्या मागे, पण तू पाठमोरी निघून गेला,
जाताना एकदा हि विचार नाही का तुला माझा आला,
 मी आज ही आहे तिथेचं तुझ्या शब्दांच्या विश्वासावर,
नजर अजून हि आहे तुझ्या परतीच्या वाटेवर......


No comments:

Post a Comment