Sunday, December 25, 2011

फिर भूल गया तू ...

फिर भूल गया तू ...

फिर भूल गया तू अपनी परछाई को
बीती दिनों की फटी चादर और रजाई को
जो उब मिली थी ठंडी में
उस ममता की दुलाई को
फिर भूल गया तू परछाई को .....

नापते चला है असमान सारा
दो गज ज़मी का ख्याल नहीं
अपने वजुद का सवाल है तुझे
पर उनके सवालो के जवाब नहीं
इन कदमो पे जो तू दौड़ रहा है
चलाना सिखाया है उसे भूल गया
कल जो तेरा सहारा था
उसका सहारा तू ना बन पाया
खुद्दार नहीं खुदगर्ज है तू
फिर भूल गया तू परछाई को .....

तुझे सुलाने जिसने अपनी नींद गवई तेरी माँ
तुझे पढ़ने जिसने अपने अरमान मिटाए वो बाबा
तेरी रक्षा के खातिर पल पल दुआ की वो बहना
कसे भूल गया तू वो बचपन और घर का अंगना
निकले पर तो उड़न भरने में तनिक भी देरी ना दिखाई
तोड़ के सरे रिश्ते, फिर भूल गया तू परछाई को .....
फिर भूल गया तू परछाई को .........

Ro$hni.....

जगण्यावर जीव जडावा

जगण्यावर जीव जडावा

खूप कठीण नाही आहे रडत रडत हसणे
दुखांच्या सावल्या झटकून दूर सारणे
उरात अशा आणि स्वप्नांना उश्याशी घ्यावे
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

त्या नभाशी पैज होती , कावेत माझ्या घेईन त्याशी
त्या सूर्याचा तेज हि फिका पडेल, ह्या विजे पाशी
गुलाबाचे काटे बोचे तरी हि फुल तोडावे
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

समयचक्र हि कधी कुणाची वाट जोहत नाही
मग का बीतीची पोटली उद्याची वाट पाहे
विसरून चुका झाले गेले पुन्हा झुंज द्यावे
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

सप्तरंग स्वप्नांचे बहरू दे दारी
सुखाचे फुल पडली आपोआप अंगणी
परत एक पर्यंत उडण्याचा करून पाहावे
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

शरद असो कि श्रावणाचा मोहरलेला वारा
गार पडलेल्या श्वासाला गंधित केवडा
हूरहूर जगण्याची मनी केतकीच्या सुगंधासम यावे
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

बघा एकदा त्या उडणाऱ्या पाखरांचे थवे नभाशी
चराचरा तून वाहणाऱ्या त्या सरितेची धार धराशी
उन्मुक्त खेळणारा वार्याच्या झुळूकसम मनाने हि वावरावे
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

पाश नको बंध नको विसरून सारी रीत जगीजे
मुक्त विचरण उन्माद भाव असू दे जगताना मनी हे
धुके नैराश्याचे झकळून सारे ...
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

रोज नव्या स्वप्नांची पहाट असावी
क्षितिजा पुढची मनात आस असावी
शब्द्फुलाच्या परड्या उधळून द्यावे
पाऊलखुणा नव्या जगास सोडून जावे
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

Ro$hni.....
December 24, 2011

काय राव !!!

काय राव !!!

रोजच तुमच हे उपक्रम झालाय
खोट्या आश्वासनाचे आभाळ दाटून आलेय
कधी लागेल तुमच्या योजनांना कळ
कधी ओलावेल ह्या देशाची बागडोर !!

महागाईचे वारे सोसेना आता
अन्नाच्या किमती सोन्याच्या भावाला
भूखमारी दिवस जगावे लागतील असे वाटे
तुमच्या घरी मात्र शंभर वर्षाचे साठे !!

काही होणार नाही लोकपालच्या नवा खाली
पोकळ हे राजकारण पोकळ दुनिया सारी
चार दिवसाचे स्वप्न दाखून पुढाकारी गप्तात
त्याच्या चढाओढीचा बसतो मात्र जनतेला धक्का !!

ह्याचे उपक्रम , यांची योजना
फक्त यांचे घर भरण्यासाठी
सांगा का तुम्ही निवडले असे हे
भ्रष्ट नेता देश्यासाठी ??

कोण कुणाला पुसत नाही ,
आमिष त्या सत्तेचा असा
रक्ताचे नातेही तेव्हा
पिसाटतात पिशाच जसा !!

हे माझे हे तुझे
यातच सत्तावाया गेली
निवडणुकीच्या नावाखाली
संपत्तीची उधळण केली !!

पांचवर्ष्या काळात सांगा
किती शेत तुम्ही रोविले
पण हे नक्कीच आहे
पापाचे घडे पूर्ण भरले ..!!

सोडा आता तरी राजकारण खेळण
एकदा जागून बघा जनतेचे स्वप्न
कर्तव्याची जाणीव कशी होईल कुणास ठाऊक
तो कणखर हात देशसाठी कधी मिळेल कुणास ठाऊक !!

Ro$hni.......

प्रारूप


मी शोधात होते स्वतःला
त्या सावल्यांच्या बाजारात
पण माझीच सावली होती
माझी वैरी झाली

मी निजले पापण्या
दुखणं कवटाळून उराशी
पण वर्ण पुन्हा उमटले
क्षणिक जिव्हाळया पाशी

वाऱ्या सांगे पाखरांसम
उडून जावे क्षितिजा पाशी
पण एकवटले बळ तरी
तुटेन हि प्रीती धाराशी

कल-कल वाहतो तो ओढा
तरंगात विसरून वेदना
अश्याच वाहत होत्या कधी
लोचानातून रुधिर लेण्या

श्रावणाचे वारे कसे
फुलवून जाते बाग
कधी सरेल हि जीवनातून
काटेरी शांत वाट

कधी कधी वाटे
हे प्रारब्ध माझे कसे
जीव घेणे झाले आहे
इथे पाषाणासम जगणे .......

Ro$hni.......

Sunday, December 11, 2011

तुझ्या विचारात

तुझ्या विचारातच सुचतात मला कविता करायला
शब्द आपोआप लागतात झरायला
आठवून ते क्षण सोबत जगलेले
ती कलम ही   लागते हसायला माझ्या सवे
कोऱ्या कागदाने बदले रूप
तुझ्या रंगाचे ते स्वरूप आले
एक एक भावना अश्या उतरतात
नभी जसे चांदणे खुलतात
जितक आठवते मी तुला
तूजवळ तितका येतोस
विचारात येऊन माझ्या
लेखणीतून पाझरतोस....
==============================================================
 तुझ्या विचारात...

रमले मी जगले मी
हसले मी हरवले मी
निजले मी रुसले मी
रडले मी पडले मी
खेळते मी छळते मी
नाचते मी गाते मी

जळते मी विझते मी
कोसळते मी सावरते मी
तुटते मी जुडते मी
रिक्त मी पूर्ण  मी
स्वप्न मी सत्य मी
चंद्र मी चांदणी मी
आयुष्याच्या वाटे वर
सावली आहे तुझी मी  
तुझ्या विचारात....
=================================================================

तुला विचारात आणणे क्रम नाही माझा
सवय आहेस तू या विचारांची
मी मुद्दाम काही करत नाही पण होते जात अस
तुला विसरण्याच्या नादात तू आठवतोस जस
 

Friday, December 9, 2011

मी अस propose करीन त्याला

मी अस  propose करीन त्याला


मावळता सूर्य असेल
थंडगार वारा
धुंध अश्या संध्येस 
मी propose करीन त्याला  ...


सागरच्या तीरावर 
लाटांचा ज्वर 
 आहोटी भरताना
 भावनांचा कहर 
 अश्या उफान्लेल्या दारियात
मी propose करीन त्याला  
    
भिजलेला निसर्ग
कापणारे देह
ओल्या जरा पाण्याच्या
खाली दडलेला शंब्द
अश्या श्रावणच्या ऋतू मध्ये 
मी propose करीन त्याला     


ती वळणदार वाट
तो अंधामोड घाट
सुसाट चालणारी bike 
आणि निशब्द स्वंवाद 
अश्या खोल दर्यांच्या सानिध्यात
मी propose   करीन त्याला
 
टीम टीमणारे  चांदणे 
ते शांत रात्र
काजव्यांचा प्रकाश 
कीर किर्यांचा किलबिलाट 
अश्या तारकांच्या रात्री 
मी propose करीन त्याला 

पाऊल पाऊल मोजताना
हातात हात असेल
त्या वाटे वर फक्त जेवा
त्याची साथ असेल
असो काटेरी वाट जरी 
पण फुलांचा थाट बसेल
अश्या फुललेल्या वाटे वर 
मी propose करीन त्याला


पूर्ण आयुष्य त्याच्या स्वप्नात काढले
प्रत्येक क्षण त्याची वाट पाहिली
त्याच्या श्वासात मोहरून जायचं होते
त्याच्या डोळ्यात मला माझे स्वप्न पहायचे होते
एक क्षण असा कि पूर्ण आयुष्य त्याच्या सोबत जगायचे होते
अश्या च आशेने कि तो शेवटच्या घटकाला येईल मला भेत्याला
शेवटच्या श्वासात मी propose करीन त्याला.

तूच संग मला कुठे मला मी चुकले

सख्या तुझ्या सोबत मी आयुष्याचे स्वप्न रंगविले
तूच संग मला कुठे मला  मी चुकले ....

तुझ्या सावलीत मी माझे अस्तित्व विसरले
तूच सांग मला कुठे मी चुकले

तुझ्या श्वासातला प्राण मी बनले
तुझ्या जीवनातले स्वप्न हि पुरवले
क्षणोक्षणी तुझा साथ दिला
सांग न मला कुठे सगळ विसकटला
     

poem

त्या काळोख्यात काजव्यांचा प्रकाश
आशेची एक किरण दिसते मला आज
दुरून पाहते लुक लुकणारे चांदणे 
आज त्या सूर्याला  पाहण्याचा ध्यास आहे
अनोळखी सावल्यांचा बाजार मांडला
माझीच मला दिसेना कुठे  
ती शोद्याचा आज प्रयत्न खास आहे
उधळलेली रात्र ती स्वप्नाच्या गावी 
तिचा प्रत्येक क्षण जगण्याचा जिवंत आभास आहे
नीजलेले असंख्य पाखरू मनाचे 
उन्मुक्य सोडण्याचा  प्रयास आहे .....         
========================================================

Wednesday, December 7, 2011

मी निशब्द असते !!!!!!

जीव निश्वास घेते , एक वेदनेची काळ उठते,
तू आठवतोस मला जेव्हा,
मी निशब्द असते

त्या आठवणीना मी मोकाट दिली
वाट त्यांची शोधण्यास
पण त्याच वाटे वर तुझ्या सावलीचे वर्ण होते
ज्यांना पाहून मी निशब्द होते

प्रेमाला हि चौकट असावी
हे कळले नव्हते कधी
आज हि भिंतींशी मी भांडते
पापण्या ओलावण्या आधी च  मी निशब्द होते

रिक्त आहे गडद सर्वत्र पसरलेला
त्या स्वप्न महाली वेदनेचा बसेरा
रात्रीच्या कुशीत निजण्या आधी मी चांदरात तुला बघते
चांदण्यांच्या प्रांश्ना समोर परत मी निशब्द होते    

============================================

मी निशब्द असते कारण तुला शब्द काही बोलू नये
मी निशब्द असते कारण परत तू मला आठवू नये
मी निशब्द असते तू माझे मान ऐकावे म्हणून
मी निशब्द असते तू स्पन्दने मोजबे म्हणून
मी निशब्द असते तू स्वप्नात हरवावे म्हणून    
मी निशब्द असते तू तुझ्या मनातले बोलेवे म्हणून...

 =================================================

Monday, December 5, 2011

असे हि करून पहा

असे हि करून पहा

चालताना दगडाची ठेच लागते, शिव्या न टाकत त्याला बाजूला सारून पहा
कधी असे हि करून पहा

आपण रोजच सरळ वाटे ने चालतो कधी वाट हि विसरून पहा,
आयुष्याच्या नवीन वाटेचे काटे निरखून पहा
कधी असे हि करून पहा

रडत रडत आयुष सगळेच घालवतात कधी तरी हसवून जगण्याचा प्रयन्त करा
आनंदित राहून स्वतः दुसर्यांना हसवून पहा
कधी असे हि करून पहा


फिरून पाहणे मज आता जमेना

सार्थ आहे अर्थ ह्या जीवाचा
फिरून पाहणे काही मज जमेना
दिवस उगवतो रोज नवं नव्या जोमान
का म्हणून मग आठवणीच्या पिंजर्यात अडकाव 
वाहून जाईल क्षणा सोबत क्षणाची सोयरी
स्वप्नाच्या देशी अवतरली स्वप्न परी
पूर्ण करण्यास ध्येय हे वाट पुढची जोहते
आठवांच्या गावी अश्रुचे सडे सोडते
दूर दूर शोध फक्त आहे नव्या उमिदीचा
फिरून पाहणे मज आता जमेना
   
 ==================================================================

Saturday, December 3, 2011

पाऊल खुणा

पाऊल पडले तुझे माझे सोबत त्या वाटे वर
पुढे सरकत गेले क्षण ते जसे विरते लाट सागरावर
परत नजर वळून बघते पण कालचे जसे काहीच नवते
उरले दिसले क्षण रुपी फक्त त्या पाऊल खुणा   

कसे सरले कसे विसरले दिवस प्रीतीचे
कसे उतरले नभावरती ढग ते आठवणीचे
कसे निसटले क्षणा कशांतून धागे प्रीतीचे
मागे पडले फक्त  ' पाऊल खुणा ' साथीचे

आज हि दिसते मला ती हरवलेली संध्याकाळ
तोच किनारा तोच सागर त्याच लाटांचा ज्वार
तुझे ते हातात हात घेऊन चालणे
माझे वळून त्या ' पाऊल खुणा' पाहणे 

जे  मागे पडले ते क्षण मला जगायचे आहे
परत एकदा त्याच तटावर तुझ्या  सवे  चालायचे आहे
एकदा परत चालताना पाऊल खुणा बघायचे आहे

पाऊल पाऊल मोजले तुझ्या सवे चालताना
त्या लाटांचा अधीर स्वभाव वाहून गेल्या पाऊल खुणा

जुन्या त्या वाटे वर अजून दरवडतो सुगंध प्रेमाचा
एकदा परत ये सख्या बघण्यास त्या
जपलेल्या हृदयी मी ' पाऊल खुणा '

कसे मिटतील ठसे त्या दुर्भाग्याचे
कसे विसरतील ते दिवस नशीबाचे
पुढे पुढे आयुष सरकत जातो असा
सोडून मागे आठवणीच्या पाऊल खुणा  

 ये सख्या तू साथ देशील ना ?
सप्तपदीचे पाऊल सोबत घालशील ना ??
त्या आयुष्याच्या उंबरठ्यावर
पाऊल खुणा जपशील ना ??

काही नसते आज उद्याचे
आठवणीचे आभाळ आहे
जशी पळते सावली दूर दूर  
तसेच हे पाऊल खुणा आहेत

उद्या तुला आठवायला काही नसेल
एकटाच तू आणि तो किनारा
जिथे होता कधी तुझ्या प्रेमाचा गार वारा
उगाच एकदा वळून बघ
तुझ्या पाऊल सोबत पडलेले पाऊल आठवून बघ
सांग तुला आठवतात का सोबत मोजलेल्या त्या घटका
मागे पडलेल्या ' पाऊल खुणा  '

आता सूर्याने हि आकाशाची साथ सोडली
त्या किरणांची लाली सर्वत्र विखुरली
सागरावर हि रंगीन छटा पसरली
बघ्या त्या मावळत्या दिवसात तुला आठवते का
ती संध्याकाळ
सावलीला सावलीत झाकलेला काळ
 आणि पुस्सटश्या  पडलेल्या त्या पाऊल खुणा     ..