Sunday, December 25, 2011

जगण्यावर जीव जडावा

जगण्यावर जीव जडावा

खूप कठीण नाही आहे रडत रडत हसणे
दुखांच्या सावल्या झटकून दूर सारणे
उरात अशा आणि स्वप्नांना उश्याशी घ्यावे
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

त्या नभाशी पैज होती , कावेत माझ्या घेईन त्याशी
त्या सूर्याचा तेज हि फिका पडेल, ह्या विजे पाशी
गुलाबाचे काटे बोचे तरी हि फुल तोडावे
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

समयचक्र हि कधी कुणाची वाट जोहत नाही
मग का बीतीची पोटली उद्याची वाट पाहे
विसरून चुका झाले गेले पुन्हा झुंज द्यावे
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

सप्तरंग स्वप्नांचे बहरू दे दारी
सुखाचे फुल पडली आपोआप अंगणी
परत एक पर्यंत उडण्याचा करून पाहावे
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

शरद असो कि श्रावणाचा मोहरलेला वारा
गार पडलेल्या श्वासाला गंधित केवडा
हूरहूर जगण्याची मनी केतकीच्या सुगंधासम यावे
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

बघा एकदा त्या उडणाऱ्या पाखरांचे थवे नभाशी
चराचरा तून वाहणाऱ्या त्या सरितेची धार धराशी
उन्मुक्त खेळणारा वार्याच्या झुळूकसम मनाने हि वावरावे
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

पाश नको बंध नको विसरून सारी रीत जगीजे
मुक्त विचरण उन्माद भाव असू दे जगताना मनी हे
धुके नैराश्याचे झकळून सारे ...
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

रोज नव्या स्वप्नांची पहाट असावी
क्षितिजा पुढची मनात आस असावी
शब्द्फुलाच्या परड्या उधळून द्यावे
पाऊलखुणा नव्या जगास सोडून जावे
जगा असे कि जगण्यावर जीव जडावे .........

Ro$hni.....
December 24, 2011

No comments:

Post a Comment