काय राव !!!
रोजच तुमच हे उपक्रम झालाय
खोट्या आश्वासनाचे आभाळ दाटून आलेय
कधी लागेल तुमच्या योजनांना कळ
कधी ओलावेल ह्या देशाची बागडोर !!
महागाईचे वारे सोसेना आता
अन्नाच्या किमती सोन्याच्या भावाला
भूखमारी दिवस जगावे लागतील असे वाटे
तुमच्या घरी मात्र शंभर वर्षाचे साठे !!
काही होणार नाही लोकपालच्या नवा खाली
पोकळ हे राजकारण पोकळ दुनिया सारी
चार दिवसाचे स्वप्न दाखून पुढाकारी गप्तात
त्याच्या चढाओढीचा बसतो मात्र जनतेला धक्का !!
ह्याचे उपक्रम , यांची योजना
फक्त यांचे घर भरण्यासाठी
सांगा का तुम्ही निवडले असे हे
भ्रष्ट नेता देश्यासाठी ??
कोण कुणाला पुसत नाही ,
आमिष त्या सत्तेचा असा
रक्ताचे नातेही तेव्हा
पिसाटतात पिशाच जसा !!
हे माझे हे तुझे
यातच सत्तावाया गेली
निवडणुकीच्या नावाखाली
संपत्तीची उधळण केली !!
पांचवर्ष्या काळात सांगा
किती शेत तुम्ही रोविले
पण हे नक्कीच आहे
पापाचे घडे पूर्ण भरले ..!!
सोडा आता तरी राजकारण खेळण
एकदा जागून बघा जनतेचे स्वप्न
कर्तव्याची जाणीव कशी होईल कुणास ठाऊक
तो कणखर हात देशसाठी कधी मिळेल कुणास ठाऊक !!
Ro$hni.......
No comments:
Post a Comment