मी शोधात होते स्वतःला
त्या सावल्यांच्या बाजारात
पण माझीच सावली होती
माझी वैरी झाली
मी निजले पापण्या
दुखणं कवटाळून उराशी
पण वर्ण पुन्हा उमटले
क्षणिक जिव्हाळया पाशी
वाऱ्या सांगे पाखरांसम
उडून जावे क्षितिजा पाशी
पण एकवटले बळ तरी
तुटेन हि प्रीती धाराशी
कल-कल वाहतो तो ओढा
तरंगात विसरून वेदना
अश्याच वाहत होत्या कधी
लोचानातून रुधिर लेण्या
श्रावणाचे वारे कसे
फुलवून जाते बाग
कधी सरेल हि जीवनातून
काटेरी शांत वाट
कधी कधी वाटे
हे प्रारब्ध माझे कसे
जीव घेणे झाले आहे
इथे पाषाणासम जगणे .......
Ro$hni.......
No comments:
Post a Comment