Sunday, December 11, 2011

तुझ्या विचारात

तुझ्या विचारातच सुचतात मला कविता करायला
शब्द आपोआप लागतात झरायला
आठवून ते क्षण सोबत जगलेले
ती कलम ही   लागते हसायला माझ्या सवे
कोऱ्या कागदाने बदले रूप
तुझ्या रंगाचे ते स्वरूप आले
एक एक भावना अश्या उतरतात
नभी जसे चांदणे खुलतात
जितक आठवते मी तुला
तूजवळ तितका येतोस
विचारात येऊन माझ्या
लेखणीतून पाझरतोस....
==============================================================
 तुझ्या विचारात...

रमले मी जगले मी
हसले मी हरवले मी
निजले मी रुसले मी
रडले मी पडले मी
खेळते मी छळते मी
नाचते मी गाते मी

जळते मी विझते मी
कोसळते मी सावरते मी
तुटते मी जुडते मी
रिक्त मी पूर्ण  मी
स्वप्न मी सत्य मी
चंद्र मी चांदणी मी
आयुष्याच्या वाटे वर
सावली आहे तुझी मी  
तुझ्या विचारात....
=================================================================

तुला विचारात आणणे क्रम नाही माझा
सवय आहेस तू या विचारांची
मी मुद्दाम काही करत नाही पण होते जात अस
तुला विसरण्याच्या नादात तू आठवतोस जस
 

No comments:

Post a Comment