पाऊल पडले तुझे माझे सोबत त्या वाटे वर
पुढे सरकत गेले क्षण ते जसे विरते लाट सागरावर
परत नजर वळून बघते पण कालचे जसे काहीच नवते
उरले दिसले क्षण रुपी फक्त त्या पाऊल खुणा
कसे सरले कसे विसरले दिवस प्रीतीचे
कसे उतरले नभावरती ढग ते आठवणीचे
कसे निसटले क्षणा कशांतून धागे प्रीतीचे
मागे पडले फक्त ' पाऊल खुणा ' साथीचे
आज हि दिसते मला ती हरवलेली संध्याकाळ
तोच किनारा तोच सागर त्याच लाटांचा ज्वार
तुझे ते हातात हात घेऊन चालणे
माझे वळून त्या ' पाऊल खुणा' पाहणे
जे मागे पडले ते क्षण मला जगायचे आहे
परत एकदा त्याच तटावर तुझ्या सवे चालायचे आहे
एकदा परत चालताना पाऊल खुणा बघायचे आहे
पाऊल पाऊल मोजले तुझ्या सवे चालताना
त्या लाटांचा अधीर स्वभाव वाहून गेल्या पाऊल खुणा
जुन्या त्या वाटे वर अजून दरवडतो सुगंध प्रेमाचा
एकदा परत ये सख्या बघण्यास त्या
जपलेल्या हृदयी मी ' पाऊल खुणा '
कसे मिटतील ठसे त्या दुर्भाग्याचे
कसे विसरतील ते दिवस नशीबाचे
पुढे पुढे आयुष सरकत जातो असा
सोडून मागे आठवणीच्या पाऊल खुणा
ये सख्या तू साथ देशील ना ?
सप्तपदीचे पाऊल सोबत घालशील ना ??
त्या आयुष्याच्या उंबरठ्यावर
पाऊल खुणा जपशील ना ??
काही नसते आज उद्याचे
आठवणीचे आभाळ आहे
जशी पळते सावली दूर दूर
तसेच हे पाऊल खुणा आहेत
उद्या तुला आठवायला काही नसेल
एकटाच तू आणि तो किनारा
जिथे होता कधी तुझ्या प्रेमाचा गार वारा
उगाच एकदा वळून बघ
तुझ्या पाऊल सोबत पडलेले पाऊल आठवून बघ
सांग तुला आठवतात का सोबत मोजलेल्या त्या घटका
मागे पडलेल्या ' पाऊल खुणा '
आता सूर्याने हि आकाशाची साथ सोडली
त्या किरणांची लाली सर्वत्र विखुरली
सागरावर हि रंगीन छटा पसरली
बघ्या त्या मावळत्या दिवसात तुला आठवते का
ती संध्याकाळ
सावलीला सावलीत झाकलेला काळ
आणि पुस्सटश्या पडलेल्या त्या पाऊल खुणा ..
पुढे सरकत गेले क्षण ते जसे विरते लाट सागरावर
परत नजर वळून बघते पण कालचे जसे काहीच नवते
उरले दिसले क्षण रुपी फक्त त्या पाऊल खुणा
कसे सरले कसे विसरले दिवस प्रीतीचे
कसे उतरले नभावरती ढग ते आठवणीचे
कसे निसटले क्षणा कशांतून धागे प्रीतीचे
मागे पडले फक्त ' पाऊल खुणा ' साथीचे
आज हि दिसते मला ती हरवलेली संध्याकाळ
तोच किनारा तोच सागर त्याच लाटांचा ज्वार
तुझे ते हातात हात घेऊन चालणे
माझे वळून त्या ' पाऊल खुणा' पाहणे
जे मागे पडले ते क्षण मला जगायचे आहे
परत एकदा त्याच तटावर तुझ्या सवे चालायचे आहे
एकदा परत चालताना पाऊल खुणा बघायचे आहे
पाऊल पाऊल मोजले तुझ्या सवे चालताना
त्या लाटांचा अधीर स्वभाव वाहून गेल्या पाऊल खुणा
जुन्या त्या वाटे वर अजून दरवडतो सुगंध प्रेमाचा
एकदा परत ये सख्या बघण्यास त्या
जपलेल्या हृदयी मी ' पाऊल खुणा '
कसे मिटतील ठसे त्या दुर्भाग्याचे
कसे विसरतील ते दिवस नशीबाचे
पुढे पुढे आयुष सरकत जातो असा
सोडून मागे आठवणीच्या पाऊल खुणा
ये सख्या तू साथ देशील ना ?
सप्तपदीचे पाऊल सोबत घालशील ना ??
त्या आयुष्याच्या उंबरठ्यावर
पाऊल खुणा जपशील ना ??
काही नसते आज उद्याचे
आठवणीचे आभाळ आहे
जशी पळते सावली दूर दूर
तसेच हे पाऊल खुणा आहेत
उद्या तुला आठवायला काही नसेल
एकटाच तू आणि तो किनारा
जिथे होता कधी तुझ्या प्रेमाचा गार वारा
उगाच एकदा वळून बघ
तुझ्या पाऊल सोबत पडलेले पाऊल आठवून बघ
सांग तुला आठवतात का सोबत मोजलेल्या त्या घटका
मागे पडलेल्या ' पाऊल खुणा '
आता सूर्याने हि आकाशाची साथ सोडली
त्या किरणांची लाली सर्वत्र विखुरली
सागरावर हि रंगीन छटा पसरली
बघ्या त्या मावळत्या दिवसात तुला आठवते का
ती संध्याकाळ
सावलीला सावलीत झाकलेला काळ
आणि पुस्सटश्या पडलेल्या त्या पाऊल खुणा ..
No comments:
Post a Comment