त्या काळोख्यात काजव्यांचा प्रकाश
आशेची एक किरण दिसते मला आज
दुरून पाहते लुक लुकणारे चांदणे
आज त्या सूर्याला पाहण्याचा ध्यास आहे
अनोळखी सावल्यांचा बाजार मांडला
माझीच मला दिसेना कुठे
ती शोद्याचा आज प्रयत्न खास आहे
उधळलेली रात्र ती स्वप्नाच्या गावी
तिचा प्रत्येक क्षण जगण्याचा जिवंत आभास आहे
नीजलेले असंख्य पाखरू मनाचे
उन्मुक्य सोडण्याचा प्रयास आहे .....
========================================================
No comments:
Post a Comment