Tuesday, November 29, 2011

आज पुन्हा येशील का

आज पुन्हा येशील का
त्या चांदण्याच्या रात्री
टीम टीमनाऱ्या मोजण्यास माझ्या सवे

आज पुन्हा येशील का
लाजून मिठीत माझ्या 
दूर दूर जायला प्रेम गीत गायला माझ्या सवे

आज पुन्हा येशील का
स्वप्नांच्या देशी हळूच उश्या पाशी
प्रीतीचे खेळ खेळायला माझ्या सवे

 आज पुन्हा येशील का
ते शब्द शोधायला मनाच्या नगरी या
परत त्यांना गुंफायला माझ्या सवे

आज पुन्हा येशील का
त्या नदीच्या काठी संध्याकाळची गोड भेटीस
शांतता मोडायला माझ्या सवे

 आज पुन्हा येशील का
ते बोचलेले काटे वेचायला रक्ताळलेले हृदय पुसायला
वेदनेचे थोडे ओझे तुझ्या पदरात निवडायला
पुन्हा आज माझ्या सवे

No comments:

Post a Comment