आई
तुझविन जगी मजला न दिसे
मज सुख सारे तुच्छ लागे
आई तुझ्या कुशीची सवय अशी
ह्या स्वर्गी हि मन माझे न रमे !!
आई तुझ्या विना मी
एक पाऊल हि न चाललो
इथे वाट फुलांची दिसते
पण पाऊल तरी अडकते !
============================================================
शब्द कसे जोडू तुला वर्णिता
आई तुझ्या पुढे हा ब्रह्मांड हि खुजा
तिन्ही लोकात शोधले
तरी गवसला नाही दुजा
मूर्त तुझी सापडेना
मी स्वर्ग हि शोधला
=======================================================
जिने जन्म दिला त्रास भोगिला तिलाच आज दुणावतोय
माउलीतला ईश्वर सरतोय हेच ते खुणावतोय..
ममता काय ते विचार पामराला, तुला ते उमजणार नाही
जन्म जन्म शोधला तरी मायेचा बोध मिळणार नाही
सारून जाईल करंटा लेक पण माय पुन्हा जन्मेल काय ??
आज त्या ममतेला तू रडवतोय, त्या ईश्वर स्वरूप आई ला दुणावतोय
माउलीतला ईश्वर सरतोय हेच ते खुणावतोय..
किती यातना किती वेदना तुझ्या अस्तित्वासाठी भोगल्या
बुन्द्का बुन्द्का रक्ताचा तुझ्या प्राणासाठी ओतला
अरे दानव नाही माणूस आहे याचा भान असुदे
दुधाचा कर्ज नाही रे पण कर्तव्याची जान असू दे
माणुसकी म्हणून निनाद ममतेचे मान असुदे
आज त्या प्रेमाला विसरून चालतोय, त्या ईश्वर स्वरूप आई ला दुणावतोय
माउलीतला ईश्वर सरतोय हेच ते खुणावतोय.
पंखात बळ आहे म्हणून घेतोस भरारी,
तुझ्या झेपे साठी दिन रात झिजलीरे ती माउली
तुला निजवायला तिने पापणी हि मिटली नाही
मुखी तुझ्या घास देऊन उपाशीच राहिली आई
घरट्यातल्या वर्क्याला आशा रे तुझीच आहे
आज पण तू तिलाच लाथाडतोय, त्या ईश्वर स्वरूप आई ला दुणावतोय
माउलीतला ईश्वर सरतोय हेच ते खुणावतोय
अजून किती तुला तिच्या बलीदांचे वर्णन करू
तिच्या सहन शक्ती चे दर्पण करू
आता तरी वासरा जागा हो जरा हंबरते गाय गोठ्यात
तिला तुझाच रे आसरा
जिच्या कुशीत निजलास तिची साद ऐक जरा
त्या माउलीला रे फक्त तुझाच आसरा....
ह्या कठीण समयी नको सोडू रे तिला
नको सोडू रे तिला.........
वार्धक्याला शाप नको म्हणूंस लेकरा....
त्या ईश्वर स्वरूप आई ला दुणावतोय खर
माउलीतला ईश्वर सरतोय हेच ते खुणावतोय सार....

No comments:
Post a Comment