Thursday, November 17, 2011

कारण मला तितकासा फरक पडत नाही...


रिक्तता वाटे जरा रोजच्या कामात
कुठे तरी भासते तुझी उणीव या मनाला
बाकी सगळे सुरडीत चालत आहे
तू नाहीस आता इतकेच ठाऊक आहे
पण तुझ्या नसल्याने माझ काही अडत नाही  
कारण मला तितकासा फरक पडत नाही...

रोज सकाळी चहाची गडबड नसते
डब्बा बनवण्याची धडपड नसते
तो पेपर आता लोवकर आला तरी
कुणीही वाचत नाही
दारात उभारून कुणाला बई म्हणत नाही
तरी मला तितकासा फरक पडत नाही

फोने चा बिल कमी झालाय आता
दुपारी जेवलेत हि का फिकीर राहत नाही
संध्याकाळी वाट पाहण्याचा उपक्रम हि मोडला
कारण लवकर परत या असे आता मी सांगत नाही
तरी मला इतकासा फरक पडत नाही

सकाळचा स्वयपाक संध्यकाळी जेवायला लागले
तिखट मिठाची तक्रार आता  कुणी करत नाही
सरस झाले तरी सुधा कुणी स्तुती करत  नाही
तरी मला इतकासा फरक पडत नाही

दिवस कसा हि सरतो घरी
पण रात्र काही सरत नाही
क्षण क्षण आहे फक्त माझा
पण आठवणी सोडत नाही
सलते प्रत्येक क्षण
पण वाट काही जुडत नाही
जगणे तुमच्या शिवाय आता मला
मला काही सोसत नाही
तरी मला तितकासा फरक पडत नाही......... 
   
    

No comments:

Post a Comment