Saturday, November 26, 2011

नाही कशी म्हणू तुला


तू रुजला हृयात असा
धामानियातून वाहतोस
श्वासही झाला वैरी
का अंत पाहतोस 
जीव तुझ्यात गुंतला
मग नाही कस म्हणू तुला ...

तूच स्वप्न तूच सत्य
तूच भास जीवनी
तूच आज आहेस माझा
तूच माझ्या लोचनी
संग कस रे सोडू तुला
मी झाले तुझी रे छाया
जीव तुझ्यात गुंतला
मग नाही कस म्हणू तुला ...

सर्वस्व अर्पण तुला
क्षण क्षण फक्त तुझाच सख्या
आजच्या ह्या क्षणी
आठवणीत साठव मला
भेटशील कधी जरी
ओळख दे मजला

जीव तुझ्यात गुंतला
मग नाही कस म्हणू तुला ...

हे वाट इथेच सरली
नशिबाची साथ सरली
माझी ओंजळ भरून मी
तुझ्या ओंजळीत ठेवली

पुरतात त्या साथीची
माझ्या परीने केली
तुझा सहवास लाभला
जीव तुझ्यात गुंतला
मग नाही कस म्हणू तुला ...

स्वप्न अधुरे, अधुरी आशा
अपूर्ण राहिली प्रेमाची भाषा
रिती परंपरांचा पिंजरा
अडकला श्वास माझा
तू दूर जाताना,
वाह्ल्या नायनातून लाटा
परी असह्य होते जगण
जीव तुझ्यात गुंतला
मग नाही कस म्हणू तुला ...


No comments:

Post a Comment