त्या जुन्या आठवणीची होळी झाली
त्या जुन्या प्रेमाची गोडी कुठे हरवली
देहाच्या या बाजारात
प्रेमाची परीभाश्याच वेगळी ...
कुठे हरवल्या त्या निर्मल भावना
ते लाजणे ते नजरेत बोलणे
स्पर्श प्रेमाचा होताच अंतरंग मोहरून जाने
कुठे हरवले ते प्रेम
या देहाच्या बाजारात
आज हि प्रेम आहे पण अर्थ बदलला
निःस्वार्थ , त्याग हे शब्दच कुठे सापडेना
अहंकार , वासना हे आजचे माप दंड आहे
देहाच्या या बाजारात
प्रेम नाही फक्त मनाची एक तरंग आहे
ते झुरणे रात्र दिवसाचे
वाट बघणे क्षणा क्षणा चे
कुठे हरवले ते दिवस
प्रेमाच्या कुशीत निजण्याचे
देहाच्या या बाजारात
प्रेम कोणी शोधत का
एक रात्रीचा प्रवास
उद्या कोण ओळखत का
प्रेम हल्ली उरलाच नाही
उरल्या त्या वासना
देहाच्या बाजारात
नग्न साऱ्या भावना
No comments:
Post a Comment