Thursday, November 10, 2011

शब्द-अलंकर

शब्दांचा हा मोह जाळ
भृन्ग्याचा आहे जसा फुलांवर डाव
मनाला हे शब्द भिनत आहेत
कुठे तरी मनात ते रुजत आहेत
 
तू समोर असलास कि शब्द माझे अड्खडतात
का ओठातल्या ओठात ते पुटपुटतात
माझी शोधणारी नजर तुला गवसली
मग का ओठांची चाहूल तुला नाही उमजली ..
 
शब्द ओठांवर दवाप्रमाणे सजले
कापऱ्या ओठांतून ते ओथंबले
अलगद वेच ते ओझरते सडे शब्दांचे
तुझ्या स्पर्शाने कदाचित ते लाजले.. 
 
शब्द आहे जणू पानावरचा शृंगार 
तुझ्या आठवांचा आधार
आणि आठवणीचा अलंकार ..
  
 
शब्द तुझ्या माझ्यातले अंत
शब्द आहेत स्वतंत्र
शब्द कधी तू कधी मी 
शब्द कधी रडणारे कधी रडवणारे
शब्द ओले जरी डोळे तरी गालात हसणारे
शब्द कधी सुख कधी दुख
शब्द कधी प्रेम कधी द्वेष
शब्द एक लपंडाव आहे
मनतले मनात गुपित
पण ओठान वर वेगळाच भाव आहे
शब्द खेळ आहे
अक्षरांची भेळ आहे
शब्द मध्यम आहे
आठवणीची साठवण आहे
शब्द एक तरंग आहे
तुझ्या माझ्यातले अंतर आहे ....
 
 
फुलासारखा शब्द तू किती नाजूक आणि कोमल आहे
म्हणून जपते मी तुला तू माझे प्रतिबिंब आहे.
 
जुडता शब्द तुझे माझे
गीत उपजले प्रेमाचे
कलकल करत वाहणाऱ्या सरीतेचे
जसे गाणे सागराशी मिलनाचे  
 
 
जाता जाता प्रेमाची मी साद देऊन गेले
कळले नाही तुला पण शब्द तुझ्या ओठी ठेऊन गेले
आरोप वाटले तुला ते नशीब खोटे अपुले
तुझ्या प्रेम साठी साठवले शब्द आज मी ओसंडून गेले ..
  
 
काल परत शब्दांनी मला गाठले
तुझ्या नको त्या चौकशीत मला दाटले
भांडले मला ते तुझ्या प्रेमासाठी
म्हणे मारतो आम्ही तुझ्या भवनाच्या ओठी ...
 
काय हे शब्दाचे कोडे मला उलगडत नाही
शब्द नि शब्द मोडला तरी गुंता काही सुटत नाही ...
 
शब्द डोलते वार्या संगे
शब्द नदीची धार एक
शब्द आहे भाव मनाचे
शब्द निसर्गाचा अलंकर एक ..
 
शब्द सरिता शब्द समीरण
शब्द अर्णव शब्द महीधर
शब्द अमृत शब्द हलाहल
शब्द चराचर मधे व्याप्त कण कण ....
 
शब्द जोडेल शब्द तोडले
कधी मनतले कधी वर वर बोलले
कधी रडले कधी हसले
मी तुला माझ्या शब्दात फासले ....
 
कधी विसरते मी त्या स्वप्नात
मला माझेच कळत नाही
नाद मला हि नाही शब्दांचा
पण मोह त्यांचा तुटत नाही ......
 
==================================================================    
   

No comments:

Post a Comment