Friday, September 30, 2011

सागर तटाचा एक संवाद

अनुद्विग्न अर्नावाचा तटे वर जीव किती
शांत सांझी त्यांच्या संवाद मज लाभला
अर्णव म्हणे तटला
तुझे तटणे माझ्या उरी
एक मंथन करी
भावनाचे उफान मग
त्या डोलणाऱ्या लहरी  
 
................................
तटाची वाणी हृदयाला भिनली
तुझ्यात सामावण्या साठीच 
मी इथे जन्मली 
माझे जीवन तुझ्या ओंजळीत आहेत 
तुझ्या लहरीचे आभार 
मी हे स्वप्न जगत आहे 
तुझ्या त्या उफान्लेल्या भवनाच्या 
लहरी मज भावे
तुझ्या स्पर्श साठी मी स्वतः 
हि पौर्णिमेची वाटे पाहे  
 
............................
अर्णव वदला इथेच तिला 
तुझ्या विना माझ्या अस्तित्व
म्हणजे सुसाटलेला वारा .........
 
.
.
.
इथेच संपली त्यांच्या संवाद्ची दोर
ते दृश्य मिलनाचे बघण्यास
आसुसली चंद्राची  हि कोर ...

Thursday, September 29, 2011

 आल्या सरी सख्या तुझ भिजवायला माझ्या संगे
पण पाहताच तुला त्या दडल्या पापण्यामध्ये
प्रश्नाच्या जाळ्यात अडकले माझे मन
मी भिजवण्या आधीच तू कसा ओलाचिंब

हळूच तुझ्या पापण्यातून एक थेब कोसळला
अलगद वेचताच त्याला तो मला वदला
तुझ्या सख्या चे आहे खूप प्रेम तुझ्या वर
जीव ओततो तो तुझ्या प्रेमावर
त्याच्या दिलाची तूच आहेस राणी
नको सोडून जाऊ त्याला
*************************************************************************
त्याला वेदनेच्या दारी सोडताना ती ही कोसळली
पण परतीची वाट स्वतः नेच होती मोडली ....
*************************************************************************
भिजलेल्या देहाला जळताना मी पहिले
विरहाच्या प्रकेत क्षणात त्याला करप्ताना पहिले ....
**************************************************************************
आज निश्वास घेतला त्याला शेवटचा निरोप देताना
दाटून आले होते मन पण भिजल्या नाही पापण्या
त्याच्या जायच्या मार्गावर का म्हणून माझ्या आसवांचे आच्छादन
त्याला थांबण्या साठी केलेला एक अजून प्रयंत्न
ठाऊक आहे मला तो आता माझा नाही
पण आज हि मन माझे वेडे त्याच्या येण्याची वाट जोही.....
****************************************************************************
डोळ्यातल्या सागरात
जेव्हा तू राहिलास
का नाही माझ्या मनाला
त्यात पोहताना पाहिलास
***************************************************************************
तुझ्या अश्रूंची लाट माझ्या पापण्याचा तीरावर
दुखाचे डोंगर तू विसरलास काठावर..........
*****************************************************************************
माझ्या सागराच्या अहोतीने वाट तुझी जोहली
तू दिसलास नाही म्हणून ती परतली
*************************************************************************
विरहात काय रे सख्या सौंदर्याची कल्पना
जळतो प्रत्येक क्षण माझा आणि तुझ्या खोडकर भावना........
***************************************************************************
स्वप्नाच्या घरचे दृश्याच वेगळे
वास्तव्यात मात्र त्याचे पडले तुकडे.......
*************************************************************************
दोन क्षणाचा का होईना साथ तुझ्या लाभला
स्वप्नाच्या रुपात तो मी जगला..........
***************************************************************************
का रे स्वप्न आणि वास्तव्यात इतका भेद
का नाही जीवनातही स्वप्नाचा मेद..??????
************************************************************************
तुझ्या अबोल भाषेचा व्याकरण थोडा tough आहे,
तीन शब्दातील गोष्ट ती सांगायला का अवगढ आहे..???????
*************************************************************************
तुझ्या मनाचे system मला कळले नाही,
boot केली os पण hardware जुडले नाही,
insert केली cdrom पण त्यात सापडले नाही driver
पर्यंत केला net download चा पण आले त्यात virus
आता शक्य नाही complete system formatting
त्या पेक्ष्या सोपे try new machine

********************************************************************
तुझे अश्रुरूपी शब्द माझे मन भिजवत आहेत
माझ्या मनात ते गोंधळ घालत आहेत.....
*********************************************************************
दुखत असल्या वर जग कसा धावत येतो 
प्रत्येक आसवांची माझ्या तो मजा घेतो
मग सुख त्यांना का बघवत नाही
मी हसताना मात्र ते माझ्या सोबत हसत नाही.....  
******************************************************************
क्षण साधले तुला बोलायचे म्हणून
पण क्षण तो येता सगळेच विसरले
तुला सांगायचे होते माझे प्रेम  
पण ओठांवर येऊन शब्द परतले.....
***********************************************************************
 भाकरीचा एक तुकडा जसा भूखेल्याचा जीवन आहे
प्रेमाचे दोन शब्द तुझे मला मग निवांत मरण आहे
********************************************************************
प्रेमाच्या वेदना कितीही असहाय असो
तरी वेड्या मनाला कोण सावरावे
कितीही बोचले काटे हाताला
पण सख्याला मी गुलाबच द्यावे
****************************************************************
रात्र दिवसा चा खेळ हा
कसा कधी संपणार
तू सूर्य मी चंद्र
कसा मिलन होणार
तुझ्या प्रेमाच्या प्रकाशाने
मी प्रज्वालात आहे
तू नाहीस माझ्या जीवनात
म्हणून मी तुझ्या सावलीत
आपले  स्वप्न रंगत आहे....
****************************************************************
त्याच्या वेदनेचा रंग तो फक्त रक्त म्हणून झळकला
वेदना होती म्हणून गुलाबानेही जीव त्यात ओतला......
**************************************************************
उगाच नाही सख्या त्या गुलाबाला रंग आले
माझ्या प्रेमाच्या रंगाने ते फुल नाहून गेले......
*************************************************************
माझ्या अश्रूंची तू काय किमत देणार
तुझ्या हसण्या मागे हि यांचा बलिदान आहे...
************************************************************
माणसाला माणूस बघत नाही
पण दगडात देव शोधतो
उपाश्या पोटी निजलेला दिसत नाही 
पण गाभार्यात पंच पक्कावान चढवतो
हा स्वार्थ आहे का आंधळेपणा 
इथे जीव चा नाही लेना देना
निर्जीव सत्य नसला तरी 
जीव ओठून त्याची होते सेवा........
**********************************************************************
भूल म्हणून तुला परत आठवून पाहते 
तुझ्या आठवणी हृदयी साठवून पाहते 
*****************************************************************
तुझ्या माझ्या प्रीतीचे क्षण मी मोजले
जशी मोत्याची शिम्प ताशे ते मज गवसले 
**********************************************************************
कोंड्तोय श्वास रडतोय मन
जीवाची होतीये फार उधळण
कसले कायदे तुमच्या मातीचे
जिथे माणसालाच नाही माणसाच्या
अस्तित्वाची  आठवण  
**********************************************************************
उसने मागितले त्याने हृदय मला
व्याजाचा मी सौदा केला
पण तो परतलाच नाही
हृदया सोबत स्वप्नांचा 
व्याज हि बुडाला  ..............
************************************************************************
दूर देशी मज काही नको तुझी आठवणच पुरे
पण काजवे अंधारातही फिरकले नाही तिकडे... 
***********************************************************************
आता नाही सख्या मला तुझ्या परतण्याची ओढ
दुखांशी झाली मैत्री नको त्यात वजा नाही जोड........  
*************************************************************************
त्याला काय ठाऊक 
अथांग सागर
उफान्लेल्या मनाच्या लहरी 
जशी कोसळते रेत हातातून 
तश्या कोसळल्या त्यात सरी ........
**************************************************************************
लकीरो से दोस्ती कि दुहाई ना कर, दोस्ती कभी लकीरो के बदौलत नही होती ,
ये किस्मत कि बात ही क्युकी दोस्ती इन्सान कि जिंदगी में दौलत से कम नही होती..
************************************************************************
ना दावा काम आई न दुआ काम आई जब 
जिन्दगी ने रुलानाही चाहती है तो 
मुस्कुराने केलिए कोई वजह काम ना आई..
************************************************************************
दुनिया का दस्तूर ही कुछ ऐसा है
जलता रहा चिराग रौशनी के लिए 
पर शामियाने में फिर भी अँधेरा है..... 
**********************************************************************
क्या कुसूर है उस दिया का 
जिसने बाती को पन्हा दी
 उसने अपनी जिंदगी 
रोशनी के लिए फनाह की 
खुद तो जल गयी लौ 
पर दिए पर लगा इलज़ाम
इसकी ही पनाह में गयी है 
उस बाती की जान.....
*************************************************************************
क्या खूब थामा आपने समां , बहार को भी रोक लिए ,
बारिश की बूंदों अपनी पलकों में कैद किया ,
उस दिन जब महफ़िल रंग लायी थी 
आपके तरानों के एक एक लफ्ज़ में दुहाई थी
क्या कहते हम वहा 
आपकी मुहब्बत देखर मेरी भी आंखे भर आई थी 
कुछ नम पलकों से आपने उनका नाम पुकारा
तारीफ की उसकी और इलज़ाम आपने सर डाला
क्या यही वफ़ा-ऐ-मुहब्बत है 
जहाँ   सिर्फ गम की ही खिदमत है..
***********************************************************************

Monday, September 26, 2011

four liners

i dream about you day n night,
but now i come to now
that's only my fight to have you in my life....
i tremble to tell you that i love you,
but now i feel my self true,
you never be the right guy,
to spend my life with you...
*******************************************************************
my mysterious dream  

secrecy i don't known really
but some thing hidden in depth
i don't dream at noon
yet i wait on faith
*******************************************************************
past present future
which is secure ?
any term or condition
applied to everyone...
whats on your mind is your action
but every action may be good perception
****************************************************************************
what we need to know the  best 
it me only or human race ??

when i get chance to test
shall i go for myself or others are best ??

what do i expect 
when nothings there in hopes plate

its my fate that i m here
or anything else He planed for me there ??

question question question 
un answered question ..
who d hell will give solution........
*******************************************************************************

Sunday, September 25, 2011

chit chat 6

प्रेमात पडण्या आधी जर प्रेमाचे नशीब उमगले असते,
सख्या खरा सांगू,.. दुखाशी मी नातेच जोडले नसते... 
*************************************************************************
जन्माला येनच एक कोडे आहे,
मग जीवनाचे कोडे का त्या पेक्ष्या  वेगळे आहे... 
*************************************************************************
रुसलेल्या शब्दांची करून गुंफण, बघ जरा माझ्या नजरेत दर्पण, पाणावले असले तर त्या प्रत्येक अश्रू मध्ये फक्त असेल तुझेच वर्णन...
*************************************************************************
विचारांचे खेळच एक शतरंज आहे कधी जय कधी मात मनात एक द्वंद आहे..
*************************************************************************
प्रेम अंकुर फुलायला दुखांचा का ठेवा,
बहरून आलाय मोगरा सुखाच्या अंगणी
वेच तो प्राजक्ताचा सडा,  प्रेमात आता वसंत आला....... 
*************************************************************************
नाझरेत बोलीन मी सख्या, जाणून घे काय लपलाय माझ्या मनात,
गुपित असेल काही तर सांगीन तुझ्या कानात............
*************************************************************************
ब्रह्मांड मापन्या साठी निघाले, गवसले नाही एक हि नक्षत्र, तारकांनी केली आकाशवाणी, दडलाय तुझ्यातच रहस्य ..
************************************************************************
पाषाणाला पूजतात देव म्हणून माणसे,
त्यातही देवपण येते काही काळाने,
पण माझ्या मनाला आहे मोठा कोड,
कानही तोच भाव माणसाचा माणसाला..
*************************************************************************
क्षणात क्षणात बदलते आयुष्य,
राज होतो रंक आणि रंकाचे अफाट साम्राज्य,
जगताना जाणीव असावी फक्त
श्वासाची, हृदयाच्या स्पंदनाची,
मी माणूस आहे फक्त माणूस मानून जगेन...
**************************************************************************
मित्र म्हणून साद दिली
मी होकार दिला मैत्री झाली.....
.
.
प्रेम म्हणून हाथ दिला
मी अड्खडले
परत प्रश माझा असा कि विश्वास बसेना प्रेम वर माझा
तू हळूच हातात हात घेऊन
त्या मनाला आधार दिला
आणि प्रेमच प्रवास शुरू झाला
.
.
मग चालू गाठी भेटी
कधी रुसवा कधी प्रीती
कधी भांडण कधी समजून काढणं
मनाचे तार जुळू लागले
डोळे बोलले कळू लागले
त्या हृदियाची स्पंदने हि एकू यायची
तो स्पर्श, तो आभास,
स्वप्नांनी रंगलेला गुंतलेला श्वास...

.
.
संपले सगळे खेळ मनाचे
तुटले घरटे प्रीतीची
ती पाखरे हि उडून गेली
अधुरी कहाणी अधुरी राहिली.......  
************************************************************************
तुझ्या विचारात सख्या रमते मी
आठवोस तू पण जळते मी
श्वास तुझे असताना जगते मी
दिवस असो कि रात्र 
कधी विसरते कधी आठवते तुला मी
खेळ हे प्रीतीचे खेळतोस तू
पण कधी जिंकते कधी हरते तुला मी....

***************************************************************************
तुला आठवत का बालपण अपुले
भातुकलीच खेळ अपुले
छोटस महल गमतीचीच चहल पहल
त्या महलाचा तू राजा  आणि मी तुझी गोंडस राणी
कधी तरी भरायची राज सभा
नाही तर फक्त दूर देशी स्वारी
.
किती सुंदर स्वान होता राजा आणि राणीचा
आई बाबान हि आवडायचा तो खेळ गमतीचा
मग आज काय झाले जर स्वप्न सत्यात आले
का तो बालपण जीवनात नाही असू शकत ते उत्तरले
***************************************************************************
शब्द फुटेना भावना सावरेना
डोळ्यांना बोलायचे म्हटले
तर नजरेला नजर मिळे ना 
किती विचित्र चित्र आहे
मनातले गुपित मनातच आहे
कळून सुधा कळले नाही
ते घरटे कधी बांधलेच नाही
विसावलेली पाखरे त्या शिशिराच्या छायेत
प्रेमाच्या श्रावणात भिजलेली
चांदणे टिपताना पहिले त्या दिपलेल्या डोळ्यांनी
वऱ्या ची झुळूक मोहरून गेली त्या पाखरांची स्वप्ने
*******************************************************************************

का म्हणून भविष्याचा विचार करायचा
जगायचे आहे तर वर्तमान जगायचा
 झाले गेले विसरून सारे
नवीन सूर्य सोबत नवी पहाट बघायची....
****************************************************************************
भविष्याची चिंता आजच्या जगण्यावर
आयुष्य संपले कल्पनेच्या उंबरठ्यावर...
***************************************************************************
आज पासून मरणा पर्यंत सगळे प्लान ok
पण future चे अजून सुधा ओसरले नाही धुके....
****************************************************************************
तुझ असते रे डाव सख्या 
माझ्या मनाची नाव 
डोलते त्या तीरावर
न धारेची साथ न तटे चा धाव 
कसा रे तुझा हा प्रीतीचा डाव......... 
***************************************************************************
बीअर फक्त बीअर नाही
तुझ्या माझ्या स्टोरी चा थ्रील्लर आहे
तू आलीस तेव्हा celebration 
गेलीस तर परत हिनेच दिला साथ माझा 
आणि केले tension  चे temporary stop function...

बीअर फक्त बीअर नाही
तुझ्या माझ्या स्टोरी चा थ्रील्लर आहे
तुझी हि सवत आहे असे तुला वाटायचे 
पण खर तेच आहे हे राहिले तुला सांगायचे
तू नसताना हीच माझ्या सोबत असायची
तू असताना सुधा हि कधीच साथ नाही सोडायची 
म्हणून दिला तुला सोडून पण नाही सोडू शकलो
**********************************************************************
गुलाबवर कोरलेल प्रेमाचे  गीत,
बघ जरा तुला हि दिसते का माझी प्रीत  ..
*********************************************************************
शिप्ल्यात साठवले अश्रुचे तळे वाटले पडतील मोती पण उरले आठवणीचे सुकलेल तळे...
*********************************************************************
वेचताना प्रजाक्तांच्या फळी काटे दिसले उभे डहाळी वरी
कसे आता तुला आणू गुलाब मी राणी
कळी हि फसली काट्याच्या घरी........
*********************************************************************
चंद्रकले सारखा भासतो मला माझा सखा
कधी पूनम ची रात्र , अफाट प्रेमचा दरिया 
तर कधी मावळता चंद्र,  काळोखाच्या पहेरा 
हळू हळू जवळ येतो स्वप्नात रंगवून 
हळूच तो सोडतो मला त्या आठवणीच्या सागरात...............
************************************************************************
तुझ्या मिठीत सख्या आहे स्वर्गाचे सुख 
विसरून जाते मी माझे सर्व दुख.....
************************************************************************
क्या बिगाडा फुलो-ने तेरा ,
तेरा आशिक हि धोकेबाज था ,
क्यू तोडा उन नाजूक पंखुडीको ,
जाब तेरे सर पार हि बेवफाई का ताज था......
*************************************************************************
तुमच्या आमच्या प्रेमात त्या गुलाबाचे काय कोडे,
पण प्रत्येक प्रोपोजल नंतर त्याचीच मान मुरडे......
*************************************************************************
वो टूटकर बिखरे ऐसे की हमे समेटना न आया, उनके बहते हुए आसुओ को रोकना न आया,
वो समजे हम पत्थर दिल है सनम, पर वो क्या जाने की हमने भी गिने है कितने जखम.........
**************************************************************************
कभी टूट कर देख मेरे संग तो पता चले की दर्द क्या है,
यु तो  गज़लों में लिखते हो ज़ज्बात पूछो हमसे तो बताये हम भी बताएँगे की गम क्या है...........
**************************************************************************
तेरी महफ़िलो में आज कल रंग न रहा क्या हुआ प्यार में कोई भरम न रहा...........
**************************************************************************
छुपा ले अपने गमो मुझसे तू  उस मुस्कान के पीछे 
पर तेरे दर्द की आह सुनाई देती है मिलो दूर,
 न खेल हमसे के नकाब का खेल साकी
हम बसते है तेरे रूबरू .......
***********************************************************************
कुछ ऐसा था समां रोक नहीं पाए, बह गए तेरी नजरो के समुन्दर में,
फिर भी दिल की गहराई को छु नहीं पाए............
***********************************************************************
कहते भी क्या उस ज़ालिम से पहल तो हमारी ही थी, वो तब भी किसी और की अमानत थी और आज अभी किसी और की है........... 
***********************************************************************
है हौसला उड़ने का अब तक इसलिए पंखो की काबिलियत पर शक नहीं है
टूटकर बिखर जाये तो गम नहीं पर अरमानो की आभी श्याम नहीं है..........
**********************************************************************
अश्रु चे आधार घे सख्या तुझे दुख विसरायला, मी असेन नेहमी तुझ्या पाशी तुझा प्रत्येक अश्रू मोजायला.....
**********************************************************************
इवल्याश्या नका वर ढगा एवढा राग..  नाही बोलायचे तुला तर मी पण कट्टी  तुझ्याशी आज........
***************************************************************************
आभारात मोजू नकोस रे हे प्रीती धागे, मी नेहमीच आहे सख्या तुझ्या सोबती तुझ्या संगे......
***************************************************************************
पाऊल घालताना सख्या मज साथ असुदे तुझा.... नको आठवणीचा ढीग मला..फक्त आयुष्यात असुदे तुझ्या... 
*************************************************************************
गुंतले ते धागे सख्या आठवताना तुझी प्रीती सोडवण्याच्या प्रयत्नात अपुरीच नात्याची जाळी...
*************************************************************************
नियती चे खेळ हे
कुणास ठाऊक आहे
आजचे अगाध सत्य
उद्या पोकळ आहे....
विचारांशी कधी मन जुडले होते 
जेवा हि जुडले मेंदू चे घोडे अडले होते
का कल्पकतेचे राज्य इतके समृद्ध आहे
जे वास्तव्या पासून किती तरी लांब आहे.............
वाहून जातो भावना मध्ये माणूस 
भुरळ आहे फक्त 
हेय मायाजाल आहे 
उघडे डोळे पण 
समोर अंधार आहे............. 
************************************************************
हसतो का आज तू माझ्या वर
उद्या तुझी हि वेळ येईल 
जरी आज मी तुटले तरी 
उदया परत झेप घेईन .............
**************************************************************
दिव्याला असते का अंधाराची भीती
सूर्याला सालीलाची
चंद्राला प्रखर तेजाची
मग का या मनाला भीत पराजयाची ......
*****************************************************************
पर्जन्या सारखी तिची प्रीती
ती गेल्या वर उरते  फक्त आठवणीची ओली माती..
****************************************************************
एकटेपणा चे अभिप्राय तुला अजून ठाऊक नाही सख्या
निश्वसातून हि वेदनेची साद येते
*********************************************************************
क्षणिक का असेना
ओली झाली पापणीही
तुला हि नाही आली
विसरता ओली प्रीती ती.....
*******************************************************************

वाळवंटी बरसला
आठवणीचा मेघ
शिशिरातही भासतात
श्रावणाचे खेळ .........
********************************************************************
 
मी अंत असावी.......

प्रथम मीच असावी तुझ्या आयुष्यात 
असे माझे बोल नाही
पण  मी च अंत असावी
हा जरूर माझा अट्टाहास राहील...

तुझे मान तुझी आशा
असुदे प्रीतीची वेगडी परिभाषा
ती परिभाषा हि प्रथम मी नसावी
पण अंतिम ओळ माझ्या वर विसावी..

दुख सुख गोड तिखट आठवणी
रमुदे त्यात कुणीही हि कधी हि
पण डोळे पाणावले कधी तर
ओघळत्या अश्रुना पुसणारी मी असावी

पाऊले कितीही मोज तू कुणा सोबत हि
पण सप्तपदी चालताना मात्र मी असावी
कितीही वाचणे दिली तू आणि मोडली तरी
ते सात वाचन घेणारी मी असावी

तुझ्या जीवनाचा श्वास नको पण प्राण मात्र मी असावी
तुझ्या मनात नको जागा मला आपण आत्मेत मीच दिसावी ..........

***************************************************************************

Saturday, September 24, 2011

miss you DIDA...

 हि फक्त कविता नाही माझ्या जीवनाची गुरुकिल्ली आहे.. हि माझ्या दादीनि दिलेली एक भेट आहे, मी नेहमी या कवितेचा प्रत्येक शब्द आपल्या जीवनात आण्याचा प्रयत्न करते.... 
its my fav, my secrete .....juz want share wid u.....hope you like it...
सर्वांचा विश्वास सहजी बसेल ,
असे शुद्ध शील ठेवीन मी 
देव देश राजा गुरु आत्मनिष्ठ 
सर्व एक निष्ठा राहीन मी
जाने अनाथांच्या प्रतिदिन साहाय्या 
लोकां साठी काय झिजवीन
गुरु आई बाप अधिकारी खरे
आज्ञा त्यांची त्वरे पाळीन मी
कोसळे संकट कर्तव्य कठीण 
मानाने प्रसन्न राहीन मी
द्रव काळ व्यय जपून करीन 
अनाथ देईन उरेलते
शरीराने शुद्ध मानाने निर्मळ
कृतीने सरळ राहीन मी
सौजन्य दावीन स्रिया बालकांशी 
वृद्ध निर्बालांशी निरपेक्ष 
मुकी जनावरे मित्र गनुतया
व्रत भूत दया आचरीन.......

Saturday, September 17, 2011

पाऊसाशी माझ्या नात्याची कथा

एक ढग आकाशातून हळूच मला बघतो, 
मी बघायला लागले कि वाऱ्या संग खेळतो,
मी परत बघव म्हणून  तो मोठ्याने गरजतो, 
जरा घाबरले कि तो खुदकन गालात हसतो,
मी रागाने पहिले तर तो हि तडित वारतो,
खोडकर कुठला मला भिजवायचा डाव तो टाकतो,
त्याला ठाऊक आहे पाऊस मला रुचते,
आणि मला हसताना बघणे त्याला रुचते 
वृष्टी ची माझी मैत्री घडून येते,
असा पाऊसाचाशी माझ नात जुडून येते......  

Friday, September 16, 2011

cht chat 5

मी हरवले आहे कवितेच्या जगात तुझा शोध घेणास,
शब्दाच्या सहायाने तुला रूप देण्यास ,
शोधते माझ्याच प्रश्नाचे उत्तर कारण अर्थ नाही तुला आता बोलण्यात,
एक एक शब्द लिहितात्ना आठवण तुझी येते,
प्रत्येक शब्दात मला तुझी परिमित जाणवते,
शोधते या कवितेच्या सहायाने मी तुला,
कुठे हरवलास माझ्या मना.......... 
************************************************************************
उत्तर कोण देणार........??

मनाचे मेंदूशी द्वंद सुरु होते,
दोघांच्याही कप्प्यात काही तरी लपले होते,
पण एकमत व्हायला अडले त्यांचे घोडे,
दोघांच्या कुरबुरीने घातले मला कोडे....
कोड्याचे उत्तर सापडता सापडेना..
परत झाला चालू संग्राम ..........
आता उत्तर कोण देणार..............????????????
***************************************************************************
मन बोलला मेंदूला
का नेहमीच हे कोडे तुला
मत माझे हि मान कधी
कधी मी हि "मान" देयील तुला
संग्रामात न ह्या पडले काही
दुमाताने पहा रडले काही
मिळवून हात दोघा सुखचं मिळेल
एकमताने कुठलेही कोडे सुटेल
..............(nileश)

***************************************************************************
ऐक मग मेंदू काय बोलला.........
अरे माझ्या कोमल मना,
तू फक्त विचार करतोस गृहीत धरून भावना,
कधी नाही जुडले तुझे माझे मंथन,
पण मी नेहमीच करतो तुझे चिंतन,
किती तू हळवा, होतोस बावळा,
कधीच नाही आपल्या शब्द ला पावला,
तुझ माझ जमणार नाही...
वाटल तर मी नेहमीच तुला मदत देयीन....
****************************************************************************

लिहिता लिहता आठवले,
शब्दांनी तुझी ओळख दिली,
रचनेत तुझा स्वभाव होता,
माझ्या मनातले काही नाही,
तुझ्याच अस्तित्वाचा हा प्रभाव होता,
मी फक्त तुझी प्रतिमा बनवली,
माझ्या लेखणीने तिला जरा-शी सजवली......
*****************************************************************************
हे असे चालायचेचं .......

कधी तू कधी मी.....हे असे चालायचेच,
हसत रुसत आयुष्य जगायचे...
कधी असणार आहे मुसळधार पाऊस,
तर कधी गार वाऱ्या ची चाहूल,
कधी काटेरी वाट तर कधी असणार महलाचा थाट,
हे असे चालायचेचं .......
 एक से दिवस कधीच राहत नाही,
नाशिबावाचून काही मिळत नाही,
किती हि झटकेल आयुष्य तरी क्षण काही मोजता येत नाही,
जे असते मनी ते कधीच नाही जीवनी,
हे असे चालायचेचं .......
पाऊल पाऊली मिळतील माणसे किती,
जुडतील नाती मनाची मनाशी,
पण एक दिवस सगळेच संपणार,
तू कुठे तरी मी कुठे तरी असणार,
विसरणं आठवन हे खेळ आहे मनाचे
हे असे चालायचेचं .......
आणि म्हणूनच हसत हसत जगायचे
कारण दिवस आहे थोडे का म्हणून रडत बसायचे
झाले ते झाले विसरून परत पुढे जायचे....
कारण

जीवनात हे असेचं.... चालायचे..
************************************************************************
मनातले सांगता येते म्हणून मी लिहते,
पण माझा सखा मला वेडी म्हणते...
त्याला कवितांच मुळातच नाद नाही,
मला प्रत्येक भावना बोलण्याचा धाडस नाही,
मनातल्या गोष्टी मनातच लपतात,
कधी बोलायचे म्हंटले तरी,
ओठान वर येऊन शब्द माझे लाजतात.......  
***************************************************************************
 
Wednesday, September 14, 2011

झुंज

झुंज आहे विचारंची न जुडलेल्या विचारांशी,
झुंज आहे मनातल्या अपूर्ण इच्छांची,
झुंज आहे दिवसाची प्रत्येक येणाऱ्या रात्रीशी,
झुंज आहे मावळत्या सूर्याची उगवणाऱ्या चंद्राशी,
झुंज आहे प्रेमाची परंपरेशी,
झुंज आहे जीवनाची श्वासाशी,
हे जीवन एक युद्धस्थल आहे,
आणि प्रत्येक क्षण देतो झुंज स्वतः च्या  अस्तित्व रोखून ठेवण्या साठी ......

Tuesday, September 13, 2011

उमीद...

कहते है डुबते हुये को तिनके का सहारा हि काफी है,
पर सहारा देने वाला हि  डूबाने वाला निकले तो,
बीच दरिया मे डूब जाना हि मुनासीफ ही....
**********************************************************************

 एक झोका हवा का आयेगा,
तेरे अरमानो का महल टूट जायेगा...
फिर क्यों उमीद का दामन थाम्बते हो,
एक दिन उमीद का परिंदा भी उड़ जायेगा.....
है जूनून दिल में तो कटे पंखो से उड़ चल,
काटे भरे सफ़र के जख्मो को गिनते चल,
हर ज़ख्म तेरा सिर्फ हौसला बढ़ाएगा,
अगर है हिम्मत तो जरुर एक दिन अपनी मंजिल को पायेगा....
टूटकर हारना तो बुजदिली है,
कायरो  की भांति क्यों तेरी आंखे गीली है,
सीने में चट्टानों से मंजर खड़े कर,
कोई डर न हो तेरे सीने के अन्दर,
दिल में हो ख्वाइश जीने की तो 
आज कल और कल बस चलता जा चलता जा..
मंजील दूर सही मर नामुनकीन नहीं,
है रास्ते ज़टिल, कही है खाई तो 
कही घटीयो के बीच से डगर है आई,
पर है हौसला तो आगे बढ़...
मंजिल दूर सही पर नामुमकिन नहीं...
बस चलता चल , बस चलता चल.............
जीना है तुझे तो चलता चल............

एक इच्छा

एक इच्छा आहे तुझ्या सोबत जगण्याची,
तो हसणारा चंद्र आणि तारकांना बघण्याची,
निळा निळा आभाळ, मखमली गवत,
तुझ्या सोबत गप्पान मध्ये रंगलेला दिवस,
तुझ्या नजरेत तुने मला हे अवकाश बघायचे आहे,
एक छोटी सी इच्छा मला एकदा तुझ्या सोबत जगायचे आहे.....
त्या वाऱ्या ची झाप, सूर्याचा ताप,
पाउसाचा मध्ये मला चिबं भिजायचे आहे,
पण एक क्षण मला तुझ्या मिठीत जगायचे आहे....
तुझ्या साठी  माझ्या मनात प्रेम खूप आहे,
पण त्या प्रेमाच्या सरी मला डोळ्यात पहायचे आहे,
ओठांवर अडकलेले शब्द लिहायचे आहे,
गुतालेले माझे मन तुझ्या प्रीतीत,
फक्त एकदा तुझ्या आठवणीत जगायचे आहे...

अश्रू

डोळ्यातल्या सागरात मोत्या प्रमाणे 
पापण्यांच्या शिंपल्यात साठवून ठेवलेले
आठवणीचे पूर म्हणेजे अश्रू,

कळत नकळत येणारे आणि चिबं भिजवून जाणारे
श्रावणाचे पाऊस आहे अश्रू,

हळूच मनात रुदणारे, भावनांना बोलणारे,
डोळ्यातले साज आहे अश्रू,

प्रेमात, विरहात, मिलनात,
मुख्य पाहुणे असतात हे अश्रू,
 माझ्या आयुष्यात तुझा अस्तित्व दर्शवितात हे अश्रू..........

prem prem prem

तू मला आवडतोस मी तुला आवडते,
मग कशाला हि दुनिया जळते..
तुझ माझ्या वर प्रेम आहे, मी तुझ्या वर करते,
मग या जगच काय बिगडते,
तू माझी लाईफ, दोघे मिळून सांभाळू,
 आपले घरकुल आपणच बांधु,
  कुणाला काहिच त्रास नाही,
 मग कुठे सगळेच अडते,
 का या प्रेमला सर्व जग लाथाडते....
 ***************************************************************************
प्रेम प्रेम करत मी जगले  मी मेले ,
पण तरी प्रेमाच्या सानिध्याला तरसले ,
तू कधी मला समजून घेतले नाही,
माझ्या प्रेमाला किंचित हि मोजले नाही,
दिन रात तुझ्या होकाराची वाट जाहले ,
 तुझ्या साठी मी माझा आयुष्यही पणाला लावले ,
 पण किती कठोर मनाचा तू,
जरा हि कीव आली नाही,
भिक्षा म्हणून हि तू मला एक नजर प्रेमाची दिली नाही,
किती किती केलाय मी फक्त तुझ्या साठी,
पण सगळ्या प्रयत्नाने खाली माती,
मी मलाच विसरले तुझ्या नादात,
पण शेवटी काहीच उरले नाही माझ्या हातात ..........

जा आता परत तू येऊ नकोस,
मला प्रेमाचा धडा गिरवू नकोस,
प्रेम म्हणजे सर्वस्व नाही कळून चुकले मला,
जगण्या चा आधार जेह्वा मी गमावला,
सगळे असून हि मी पोरकी आहे,
फक्त तुझ्या मुले मी आज एकटी  आहे.. ..
नको मला तुझे हे समर्पण,
नको मला तुझ्या प्रेमाचे आलिंगन,
प्रेमाची  भुकेली होती  तेव्हा तुला कळले नाही,
आज प्रेमच माझ्यात उरलाला नाही तर तू कुणाला आता तू  हाक  देई..........  
**********************************************************************

Monday, September 12, 2011

घायाळ पक्षिणी ची व्यथा

घायाळ पक्षिणी ची व्यथा,
माणसाचे चे हृदय थोर मग का त्या मुक्या पक्ष्याच्या मुखी असावी हि गाथा ....

घे कवड अखेरीचा तुला, ती घायाळ आई म्हणे बाळाला,
कोण्या एका निष्ठुराने स्वार्थ पायी उरी माझ्या हा बाण रोविला...
क्षमा करा मज लेकरा साथ इथेच संपला,
जीवन तर दिले तुला पण तू पोरखाच राहिला......

आपले प्रशासन...

देहाला माणसाने धुतले महागड्या साबणाने,
पण मनाची स्वच्छता करणार कोण ??
देवाला बसवले सुसज्य मंदिरात,
मन मनाच्या गाभारात त्याला पूजणार कोण??
पुण्याई  करायला सगळेच पुढे, 
पाषाणास चढवता सोन्याच्या ताटात पंचपकवान,
पण भुकेल्याला मात्र हीन भाव आणि दारातच त्याच्या दारिद्राचा अपमान,
मग गरिबी भूखमारी हटवणार कोण ??
विदेशी  बँक मध्ये आहे प्रोपटी अपार,
तरी स्वदेशात दाखवतात गरिबीचा मार,
मग श्रीमंतच उपभोगणार गरिबीच्या योजना,
 तर गरिबी हटवणार कोण ??
 कसे होणार या देशाचे हाल,
 कसे संपणार हे दारिद्राचे काळ,
 पुढाकरी  पुढे होऊन आपलेच भारतात घर,
 तरी म्हणतात नाही आहे विश्रांतीला दर,
मग  गोर गरीबांची ऐकणार कोण ??

Friday, September 9, 2011

chit chat 4

आत्मा माझा सख्या नेहमी तुला शोधात गेला, घेतलो जरी दुसरे जन्म तरी तुझ्यातच हा गुंतत गेला..

*******************************************************************
तुझ्या आठवणीच तर माझ्या चारोळ्यांचा जीव आहे,
जशी चंद्राला बघण्यास उतावळी चकोर आहे .........
*******************************************************************
 जन्म जन्मान्तारची नाती अपुली सहजच तुटणार नाही,
आतामारूपी मिलन आपुला दुसऱ्या जन्माने हि सुटणार नाही..
*******************************************************************
लोग  क्यू नाही समझते मोहब्बत कोई खेल नही है,
दिल  से दिल न मिले तो इस  रिश्ते का कोई  मोल नाही है,
बेदर्दी से हासील किया तो क्या हासील किया,
जो दिलो  जान से  तेरा नही उसे अपनाया तो क्या प्यार पाया,
रोक उसे जो  जिता है तेरे लिये ,
पर जिसके लिये तू जिंदगी भर कुछ नही,
उसके लिये जान भी दिया तो रोने  के लिये तेरे जनाझे पर कोई न आया...
क्यू बरबाद  होता है  पत्थर दिल के लिये  रेगीस्तान मे भी क्या कभी सुनामी आया,
अश्को कि किमत बहुत है बहाया तुने इस तरह  जैसे कि सिर्फ पानी बहाया,
बस कर अब रोना तेरा देख उसे  जो तेरे लिये हर लम्ह रोया और मुस्कुराया.......
*******************************************************************

श्रावण हा ऋतूंचा राजा आहे,
जरी का गेला सख्या निघून श्रावण,
तरी तुझ्या विरहात तो नेहमीच माझ्या डोळ्यातून बरसला आहे.....
*******************************************************************

सरी वर सर पडे  त्याला नाही रे तुझे अश्रू  कडे,
गालावर अलगद चे स्पर्श करते त्यास विरहचा ऋतू म्हणे...
*******************************************************************
असेन जर मी तुझ्या  जीवनात तर अश्रू काय ते तुला  कळणार नाही,
 दुख चुकून हि तुझ्या वाटेला वळणार नाही...........
*******************************************************************
का रे  नेहमी मला कोसतोस म्हणे मला एकदा श्रावण राजा,
जेह्वा दाटतो पाणी डोळ्यात तर पहिले मलाच साद देता.........
*******************************************************************
श्रावण आला घेऊन आठवणींच्या सरी,
पण परतला देऊन पापण्यान  खाली
*******************************************************************
चोर मनाचा श्रावण राजा, भुरळ मला पडतो,
पण त्याला नाही  माहित माझा  सखा त्याला जगतो....
*******************************************************************
पापण्या खाली का रे तुझ्या दाटला आहे श्रावण राजा,
करू नको मैत्री सख्या तो चोरट्या आहे दुष्ट मनाचा.........
*******************************************************************
श्रावण चे खेळ आता संपले आहे,
पापण्या खाली तडे देखील आटले आहे,
किती हि विरह चा आला जरी वारा,
 मनसोख्त  या श्रावणात मी नाहले आहे........
*******************************************************************
 किती  खेळतोस रे श्रावणा, किती छेडतोस माझ्या मना,
कळते तुला हि वाहत असलेल्या डोळ्यातल्या माझ्या गंगा यमुना.......
*******************************************************************
 गोंदळ तुझ्या मनातले मला हि कळायला लागले,
 वादळ येण्या आधी मी तुला साद घालते,
मैत्रीचे नाते अपुले जपून तू ठेवावे,
 मी तुझ्या कडे फक्त मैत्रीच नात मागते....
*******************************************************************
मैत्री मध्ये प्रेम असावे, पण प्रेम मैत्रीत करू नये,
 या प्रेमाने नेहमीच मैत्रीचे घर उध्वस्त केलेय........ 
*******************************************************************
 तुझ्या मैत्री साठी मी वाटेल ते  करीन, पण प्रेम नकोस मागुस मी माझा  मित्र हि गमावीन........
*******************************************************************
 ओझारले पाणी डोळ्यातून मित्राचे हात पुढे  होते, पण पाणी डोळ्यात आणायला प्रेमच पुरे होते..
*******************************************************************
 श्रावणाला नेहमीच प्रेमच दोष देते , मात्र  मैत्री त्याच्या प्रत्येक सरीत नाहून निघते ....
*******************************************************************
चारोळी चारोळी असतात फक्त चार ओळी,
पण सांगतात मात्र गोष्ट भारी.......कुणाच्या जीवनाचे अर्थ,
कुणाच्या जगण्याचे स्वार्थ,
कुणाची प्रीती तर कुणाच्या विरहाची जिवंत अनुभूती,
कोणी करतो आपल्या प्रेमाची मागणी,
कुणाची असते कुणासाठी विनवणी,
किती तरी भाव लपलेल्या ह्या रचनांची बागवाडी, 
चारोळी चारोळी खरच आहे मी तूझी आभारी.....
 *******************************************************************
सागराच्या मोत्या ची किमत तोच जाने,
प्रेमात जो चिंब भिजलेला आहे..
********************************************************************
त्या प्रकेत मोत्यात सख्या माझाच अस्तित्व होता,
तुझ्या सागरातून जरी वेचल,
तरी तो माझ्याच आठवणीचा  अंश होता...
*******************************************************************
किती सांभाळणार अजून त्या लोचनातली लाट ,
उफानलेल्या सागराला फक्त तटाचीच साथ..
*******************************************************************
तीरावर मी अजून रोखली  ती लाट आहे,
तुझ्या  जाण्याच्या वाटे वर तिचाच  मला साथ आहे..
********************************************************************
  आली ती तटावर माझ्या भेटीला पण अस्तित्वच तिचे तिथे च हरवले,
 तू बघण्या आधीच ने स्वतःला निजवले...
*******************************************************************
वाऱ्यावर भिरभिरणाऱ्या त्या पाकड्या  बघताना तू मला बघायचास,
 म्हणून  त्या  प्रयत्नात हि मला आनंद वाटायचा.......
********************************************************************
दोघे हि वाटून घेऊ जीवन थोडे थोडे,
म्हणजे माझ्या तुझ्या हृदयाचे ठोके थोडे थोडे,

दुख असो कि सुख असो,
कोसळलेल्या प्रत्येक संकट,
वाटून घेऊ आपण दोघे बरोबरीचा वाटा,
कारण नको परत भांडण त्या झरलेल्या आस्वानवर,
भोगलेल्या दुःखावर...

चालताना पाऊल मोजून चालू,
आणि प्रत्येक पाऊल वाटून घेऊ
कारण परत नको भांडण माघार घेतलेल्या पाऊलांवर ..

पण कसे वाटू सख्या श्वास तुझे माझे,
कसे वाटू मी मिलन अत्मेचे,
 कसे वाटू सांगना प्रेम तुझे माझ्या वर जे,
भांडलास तरी चालेल आता कारण तूच श्वास आहेस माझे,
आत्मा माझ्या प्रेमाचे..........
********************************************************************
शोधते मी ज्याला रानो वाणी, तो तर होता माझ्याच मनी...

मनाचे आता होते द्वंद चालू, नको  रे सख्या तू त्यात खल घालू,
मनाचे भेद तू घेऊ नकोस सख्या, तुझाच प्रतिबिंब असेल त्यात...

तुला बघून मन माझा लाजला,  खुदकन तो गालातच हसला...

 त्याला हसताना खळी ने पकडले, हळूच तिने हि गालातून  डोकाऊन बघितले...

तिला बघून सख्या तुझे डोळे उत्तरले, रुपाला माझ्या आपल्या नजरेच्या पाशात गाठले..

मनातून मग कड उठते, आठवणींची त्याला मार जेव्हा बसते...
 हळव्या मनाला आठवनीचा त्रास, बोचतात त्या तुझ्या  मनी ,
  पण कड उठते माझ्या उरी...

आठवणीचे ढग कोसळले तुझ्या वर म्हणून का श्रावण रुसलाय माझ्या वर

तुझा अशाच  प्रेमाने तर तो चंद्रही जळला, म्हणूनच तर  त्याच्या वर काळा डाग पडला..
********************************************************************
आज काल वसंत हि काही-सा गपचूप बसला आहे,
कारण त्याला हि  कडले कि तू माझ्या वर रुसला आहेस...
********************************************************************
वसंताचा दोष काय सख्या , श्रवणाने केली खोडी,
 म्हणूच श्रावणाच्या दारी आली वसंताची होडी...
********************************************************************
तू  आहेस म्हणून ह्या हसण्याचे कौतुक आहे,
ह्या अस्तित्वाचे अर्थ आहे,
हे सौदर्य सार्थ आहे ..
 तुझ्या विन सख्या रे श्वास हि व्यर्थ आहे............
********************************************************************
 त्या चांदनीने एकदा केली चौकशी,
  चंद्र पेक्षा जास्त आहे का तुझा सख्या ची प्रीती ????
*******************************************************************
सागरच्या गभारयातच मोलाचे ठेव आहे,
 म्हणून आठवणीचा हि तिजोरीचा मोल आहे 
********************************************************************
पाहुणे म्हणून येत त्या मनाचा घरात,
 आणि कायमचा संपतो त्यांचा पुढचा प्रवास...
********************************************************************
एक भेट हवी सख्या तुझ्या माझ्या स्वप्नांची,
साथ तिला असणारच त्या हसणाऱ्या चंद्राची...........
********************************************************************
मुक्या त्या आठवणी मनातल्या मनात बोलतात,
पण शब्द त्यांचे हळूच माझ्या लेखणीतून पडतात....
********************************************************************
क्षणिक भेट तुझी माझी, परत त्याच ओल्या राती........
********************************************************************
तुझ येणे पाऊसा सारखे, थांबणे विजेसारखे, आणि परत जाने शिशिर सारखे.........
********************************************************************
सख्या मी तुझ्या हातात हात जेह्वा दिला , थोडासा माझा मान तिथेच विसावला......
********************************************************************
तुझ्या येण्याचे बेत काही ठरत नाही, माझ्या मनाचे तार काही जुडत नाही.......
********************************************************************
तू येणार नाही मला खात्री आहे, पण तुझ्या आठवणीशी घट्ट माझी मैत्री आहे... 
********************************************************************
प्रेमाच्या खेळ तू जिंकला मी हरले, तरी हि डोळ्यात तुझ्या मी समाधान नाही पाहिले ....
********************************************************************
नाते मनाचे तोडल , मग कां आठवणीना च माग सोडल .......
********************************************************************
डाव तर तू टाकला, मी फक्त खेळला,
हरलास तू तुझ्या चुकीने, पण दोष माझाच दिसला .....
********************************************************************
तुझ्या अबोलपानात सगळेच गुपित दळले होते,
 मीच खुळी आहे सख्या मला ते कळले नहव्ते ....
********************************************************************
हरणे जिंकणे हे युद्धाचे  नियम आहे,
प्रेमात सख्या दोन्ही पक्ष्य अमर आहे...
********************************************************************
तू जिंकणे माझे हरणे, माझे जिंकणे तुझे हरणे,
काय फरक पडतो, पाणी तर वाहतो दोन्ही तटेने .. ...
********************************************************************
तुटलेले नाते जोडायला, मी वाट पाहीन तुझी,
विसखटलेले सावरायला, मी वाट पाहीन तुझी,
आज जरी तुला भासते प्रेम माझे वैरी,
पण तुझ्या प्रेमा साठी मी वाट पाहीन तुझी............
********************************************************************
पाउसाच्या सरी अलगद स्पर्श करी,
प्रत्येक ओघाडून जाणाऱ्या सरीत तुझी आठवण खरी...
********************************************************************
उमलण्या आधी कळ्यांना तोडतो तो माळी,
मग कशी फुलायची हि बागवाडी....
*********************************************************************
जो आहे पालानहारी आज या कलयुगात तोच भक्षण करी...
********************************************************************
कोरड्या स्वप्नातही तुझे ओले प्रतिबिंब आहे,
तुझ्या स्वप्नातच सगळा काही सार्थ्य आहे....
********************************************************************
 प्रेमात अपेक्षाचा असतो पारडा  भारी असतो ,
तुटतात  जेह्वा कल्पना तर तो आकाश स्वताहून कोसळतो... 
********************************************************************
माझ्याच शब्दांच्या जाळ्यात तू मला फसवले,
 बोलायला आत मात्र काहीच नाही उरले ...
*********************************************************************
खेळतोस स्वताशी , स्वतःतच गुंतातोस,
मनातले लपवायला,
कशाला उगाच हसरा मुखवटा घालतोस.... 
********************************************************************
अडकलेला मन माझा आधीच बरा होता,
आता तो झेपणार कसा दुखाची परीभाष्या..
 ********************************************************************
स्वप्न स्वप्न करता करता , झोपलोच नाही,
स्वप्नात हि तुला शोधताना माझी रात्र लोटून जाई...

आज तुला सांगते, प्रेम माझे कसे आहे..........

आज तुला सांगते, प्रेम माझे कसे आहे,
 जसे गुलाबाला काटे, सेम टू सेम तसे आहे..

आज तुला सांगते, प्रेम माझे कसे आहे,
जसे चंद्राला चांदणी वाटे, सेम टू सेम तसे आहे..

आज तुला सांगते, प्रेम माझे कसे आहे,
जसे पोळी आणि तवा, सेम टू सेम तसे आहे..

आज तुला सांगते, प्रेम माझे कसे आहे,
जसे मोत्याला शिंपले, सेम टू सेम तसे आहे..

आज तुला सांगते, प्रेम माझे कसे आहे,
जसे सूर्याला तपन , सेम टू सेम तसे आहे..

आज तुला सांगते, प्रेम माझे कसे आहे,
जसे झाडाला सावली, सेम टू सेम तसे आहे..

आज तुला सांगते, प्रेम माझे कसे आहे,
जसे तुझे माझ्यावर , सेम टू सेम तसे आहे..

देशील का मज साथ सख्या....

पाऊल पाऊल घालताना, अंधेरी वाट असो कि काट्यांची वाडी,
कोसळेन जेव्हा मी देशील का मज हाथ सख्या,
देशील का मज साथ सख्या...

उन्ह सावली चा खेळ जीवनात नेहमीच असतो,
जर पाऊस पडला कधी तर,
भिजण्या आधी मला देशील का आधार सख्या,
देशील का मज साथ सख्या...

फुलांचा सुगंध, चंद्राची चांदणी नेहमीच असते ओढ मनाची,
जर का उजाड वनात गेलेतर,
नेशील का तूझ्या मज साथ सख्या,
देशील का मज साथ सख्या...

रूप गोजिरे चार दिवसाचे,
प्रेमाचे दिवस आयुष्याचे,
त्या थकलेल्या दिवसात तही,
असशील  का मज साथ सख्या.....
बोलना, देशील का मज साथ सख्या.....

Wednesday, September 7, 2011

आयुष्य

आयुष्य असे का असते,
कधी तपन तर कधी छाया,
कधी राग कधी माया,
कधी आशा कधी निराशा,
कसा खेळ आहे इथे भवसागरात या........

आयुष्य असे का वागतो,
तहानलेल्याला तीरा पासून दूरच ठेवतो,
आणि वमन करेल इतकं  एखाद्याला देतो...

आयुष्य असे का छळतो,
स्वप्न  दाखून त्याचे दारच बंद ठेवतो,
मृग्जालासारखे नेहमीच खेळ खेळतो,

आयुष्याचे  कोडे कधी कोण फोडणार,
गुंतलेली हि साखळी कोण सोडणार......

तरीही रिता............

तरीही रिता

पुरा रिता झाली पियुनिया मधुघट,
नाही आली ढेकर, नाही ओलावले ओठ,
मोगऱ्याच्या फुलाने भरला देऊळाचा गाभारा,
नाही सुवासाची  लाट, नाही सुगंधाचा वारा,
चंद्राच्या शितलतेत नाहून निघाले जग,
तरी कुठे सापडेना एक श्वास निवांत,
गळा दाटे हुंदका , अश्रू  वाहे झरझरा,
अंतरीच्या दरीत नाही मायेचा वारा,
ज्यात काही नसते त्यात शोधतो आम्ही,
कुबेराच्या तीजोरीतुन ही रिकामे परततो आम्ही ,
कोण्या एका भिखाऱ्याला सापडला हिरा,
फाटक्या त्याच्या झोळीत नाही त्याला हि थारा.............
 
मैत्री

मैत्री नाजूक धागा आणि अटूट बंधन
हे बंधन देते मृत हृदयाला हि स्पंदन..

मैत्री आहे सुखद प्रवास,
इथे न धोक्याचे वळण न ब्रेकप चा त्रास.....

 मैत्री आहे गुलाबचे  फूल ,
 काटे असतात थोडे पण नेहमीच असते कुल.......

जिथे  प्रेम इथे मैत्री,
पण तुटणार नाही कधी अशी फक्त मैत्री मधेच खात्री....

Tuesday, September 6, 2011

chit chat 3

थिजलेले क्षण, भिजलेले मन,
शांत प्रवास, सुखद एहसास,
संपलेली वेड तुझ्या माझ्या भेटीची,
तरी ओढ तशीच होती अपूर्ण मिलनाची,
मुक्या लोचनांनी प्रश्नाचे केले वार,
का रोखून ठेवला नाही समय पडतोय फार?
*****************************************************************************
पहाता पहाता मला तू दिसावी ,
पथी चांदण्यांनी फुले अंथरावी ...
कंचन रूप तुझे, मोहक स्मित शोभे,
जसे गुलाब कळी ने बाग सजवावी...

अशा निराश उरी विसरून गेलो,
तुझ्या कौल माझ्या दृष्टीस पडला,
मनाचे दार उघडण्या आधी, निद्रेने साथ सोडला,
अचंभित मी विचारात दडलो,
कातरवेळी स्वप्नाचा सडा कसा पडला ???

अलगद स्पर्श होउ दे तुटलेल्या हृदयाला,
आसवांचा भार आता जमेना पापण्यांना,
उरी ज्वलंत अजून हि त्या आठवणी आहेत,
घाल गार वारा तुझ्या मृदुल स्वरांचा..
तडा गेलेल्या विश्वात माझ्या,  तुला का विसाव्याची आस आहे,
तुटलेला हृदयाची साद ऐक सखे प्रीती चे खुळे विश्व आहे....

तुझ्या प्रेमाचा सुगंध माझ्या जीवनात दरवडावे, 
कस्तुरी ने मग कसे ते सहावे...

प्रेमाची भाषा डोळ्यांनी बोलले,
शब्दांचे नको कोडे म्हणून मी शब्दाचा आधार सोडले,
तरीही तुला कळले नाही मान माझे झुरते,
 माझ्या या अबोल प्रीतीचे नशीबच खोटे ठरते....

आठवणी मोत्याच्या हार प्रमाणे असतात,
डोर जशीच तुटते सगळेच विसखटतात....

Monday, September 5, 2011

chit chat 2

खेळतो स्वतःशी कारण तुझे अंतर्मान तुला पटत नाही,
तुझ्यात दडलेला माणूस तुला दिसत नाही,
पुरे झाले आता हे ढोंग तुझे,
माणूसअसून माणसाची च किमंत करत नाहीस... 
****************************************************************
महफिलो कि जान हि किसी कि आह होती ही,
जब भी रोता ही कोई नागमो मे, तो दुनियाकी वाह होती होती है...
**************************************************************
शबनम कि बुंद कुछ ऐसे गिरी कि
पतझड में भी बहार आयी,
जिसके   इंतजार में सुर्ख हो गायी थी अंखीया,
उनकी एक झलक पाते हि ये भी  सावन कि तरह मुस्कुरायी...
******************************************************************
 कतरा कतरा तेरे याद का, यु मुझे भिगोने लगा,
चंद लम्हो का सफर क्यू याद अब आने लगा.......
****************************************************************
अब यु  बरस ये मेघां कि घटांये  फिर न छाये,
आज तू भी रो ले मेरे  साथ में फिर से ये बरसात  ना आये...........
****************************************************************
आज भी सावन मुझे तेरी याद दिलाता है,
चुपके से वो मेरे पलको को भी भिगता ही.........
******************************************************************
तुझ्या प्रेमात पडायला या चारोळीची साथ आहे,
आपल्या या  मैत्री मध्ये हिचा मोठा हात आहे.......
******************************************************************
तुला हि कळते न बोललेले शब्द माझे,
दाटून आलेले भाव डोळ्यातले,
तरी विचारतोस माझ तुझ्या वर कितीत प्रेम आहे ते,
शब्दात वर्णन येते नाही इतके प्रेम आहे.........
******************************************************************
 
परत ती वाट शोधते..

सोडून आले जिथे तुला,
प्राण हि तीथे च पडला,
परतीच्या वाटे वर माझा पाऊल अड्खाडला...
थबकलो क्षण भर तिथेच विचाराने मला जडले,
 का कोण जाणे पण काही तरी विसरले,
विचारांच्या ओघात कधी मी वळले,
मलाच कळले नाही कस काय ते घडले,
पण  हे  काय आता परत एक कोड,
दृष्टीस पडली नाही ती मोड,
कुठे आली निघून काही कळेना,
शोधतोय वाट परतीची पण वाटच मिळेना....

chit chat 1

श्याम रंगात रंगली प्रीत दोघांची हि भारी,
शोधतात गोपी त्याला दारी  दारी, प्रत्येक तीरावरी,
कृष्णाच्या लीलेची काय बरोबरी....
*****************************************************************************
अजनबी थे हम इस सफर में,
न जाने कैसे रस्ते मिल गये,
कभी  सोचा ना था आपसे मुलाकात होगी,
पर आज हम एक हि सफर के साथी बन गये
*******************************************************************************
baate to bahut hai par kehne ke liye kuch khas nahi,
aaj hote nahi sile hai par inpar koi alfaz nahi, 
gumsum sa dil hai, khoyi si dhadkan,
bahut kuch hai dil me band par kehne ke liye kuch khas nahi...........
*******************************************************************************

कुणी तरी असावं..................

स्वप्नात हि माणूस एकटा नसतो, 
कुणी तरी त्याचा विचारांत रमतो,
जीवन इतके सोपे नसते,
एकटे जगायला खरे धाडस लागते,
वाट चुकीची कि बरोबर हे चालताना कळत नाही,
पण चुकल्या वर मात्र कुणी तरी आधाराला लागतो,
रोजच्या कामातून मधेच काळजी ने विचारणारा कुणी तरी असावे असे सगळ्यांनाच भासते,
गर्दीतही शोधणारा कुणी तरी असावं,
पापण्यातून झरण्या आधी त्या आसवांना पुसणारा कुणी तरी असावं,
न सांगता मनातल्या भावना जाणणार कुणी तरी असावं,
कधी तरी चालताना लाड्खडल्यावर संभाडणारा कुणी तरी असावं,
शांततेला विचारणारा कुणी तरी असावं,
हसताना बघणारा कुणी तरी असावं,
बघून  हसणारा कुणी तरी असावं,
कुणी तरी असावं हातात हात घेऊन चालणारा, 
चालताना सोबत पाऊल मोजणारा, 

कुणी  तरी असावं जीवनात ह्या जगण्याला अर्थ देणारा.................

Saturday, September 3, 2011

char oli..

जब भी कोई किरण नज़र आती है आशा की,
दिल उसकी तरफ चल पड़ता है,
पर वो भी  ज़ालिम है  दुनिया की तरह,
फिर से निराशा का पर्दा डाल देता है.
***********************************************************************
 काफिला था लोगो का मेरी महफ़िल में,
पर  ना जाने कहाँ था वो मेरा आशिक,
 जिसके लिए ये तराने बने...........
************************************************************************
अजीब दस्तूर है दुनिया का, 
जब सांस चलती है तो कोई पूछता नहीं है,
पर कफ़न में लिपटने के बाद
सवालो का सिलसिला रुकता नहीं है..........
************************************************************************
कहते थे वो हमे हम आपके साथ ही इस सफ़र की मंजिल तक जायेंगे,
आज हम सेज पर  इंतज़ार कर रहे है  कब वो अपना वादा निभाने आएंगे....
************************************************************************
....Ro$hni  
**************************************************************************

Friday, September 2, 2011

very short.....

रोपलेल्या रोपालाही  पाण्याची गरज असते
मातीच आधार आणि सूर्य च प्रेम लागतं
जीव देन सोप पण जीव लावण कठीन असत  

==================================================================== 

सूर्य कडे पाहण्याचा धाडस कुणाचा
पण तरी जीवनाला त्याची गरज आहे 
मग काही गोष्टी कठीण  असल्या तर काय झाले 
माघार हि माघारच आहे 
==================================================================
कधी आयुष्य खूप मोठ वाटते 
आकाश झेप घ्यायला खूप छोट वाटते
ध्येय सगळे  सार्थक दिसतात 
हेय सगळ मात्र स्वप्नातच घडत 
===================================================================

चुकांची आयुष्यात गर्दी असते फार
जो शिकला तो शहाणा
 नाही तर परत तीच मार
===================================================================
 
charolya

मन तुझे आहे गुडाची ठेप ,
किती तरी माश्या वर वर,
पण स्वाद घेणारी  एक......
*************************************************************************
शांततेच परतीची वाट आहे,
न बोललेल्या शब्दाचा गोंगाट आहे,
खंत आहे ते फक्त तुला कळण्याची,
मनात गुरफटलेल्या भावना  स्पष्ट न करण्याची...
**************************************************************************
वाटते बोलाव भरभरून,
सर्व काही मनातल टाकाव सांगून, 
पण दुसरयाच  क्षणी आठवते मैत्रीचे नाते,
आणि वाटते भीती तेही तुटण्याचे...
**************************************************************************
प्रेमाची निशाणी ते , तेही वेड्या प्रेमाची,
आहे पवित्र भावना ती कोमल मनाची, 
किती केले प्रयत्न तरी मिटणार नाही,
कारण कोरली आहे प्रीती,
तिच्या अतूट विश्वासानी....... 
**************************************************************************
मला हि वाटते तुझ्या सारखे प्रेम चे क्षण मोजावे,
कधी तरी तू मला माझ्याच मिठीत फसवावे,
मला हि पडतात स्वप्ने तुझ्या माझ्या भेटीची,
आणि वाटते जगावे मी स्वप्नांना घेऊन उश्याशी,
    
मला हि होतो आभास तू नसताना तुझ्या असण्याचा,
तेच क्षण असतात तुझ्या आठवणीत जगण्याचे......... 
***********************************************************************
 नजरे आड असलास तरी,
विचारांत मात्र तूच असतोस,
तुला कळत नाही ते,
म्हणून मन माझे झुरते....
***********************************************************************
परत  आज तू सहजच सगळ बोलून गेला,
आधीच गुंतलेल्या या मनाला,
न सुटणारे कोडे घालून गेला....
************************************************************************
कळले मला हि आज तुझ्या मुखावर जे भाव आले,
ओठांवर अडकलेले ते शब्द हळूच नयन बोलून गेले,
************************************************************************
कितीही प्रयत्न केले तरी प्रेम हे लपत नाही,
मनात असलेल्या भावना  कधी डोळे खोट सांगत नाही......
************************************************************************
शब्दांच्या पलीकडे वर्णन आहे या नात्याचे,
जगात कुठे हि मोल नाही ज्याचे.....
************************************************************************
नाव जेव्हा तुझे माझ्या ओंठान वर  येते,
गुलाब काळी सारखी मी उमलते,
सुरेख ती वाट तुझ्या गावाची,
भासते आज हि चाहूल तुझ्या येण्याची...
************************************************************************
ओझरते प्रीतीचे पाणी, तहानलेला मी ग राणी,
शहारा घेतो जेव्हा प्रेमाचा अंगावर ज्या क्षणी,
असतेस फक्त  तूच माझ्या ध्यानी मनी
************************************************************************
मनात तू रुजला आहेस, 
कल्पनेत बसला आहेस,
इथे शब्द माझे असले तरी,
माझ्या प्रत्येक रचनेत तू दिसला आहेस...........
************************************************************************
हि नवी प्रभात , पण तेच आकाश,
तेच आहे घरटे आणि परत तेच कामाचे भार आज,
गरम गरम चहाच्या प्याल्याने केली आहे सुरवात,
बाप्पा आज चा दिवस असुदे खास,
सर्वाना दे शुभ दिवसाचा  आशीर्वाद...