Tuesday, September 6, 2011

chit chat 3

थिजलेले क्षण, भिजलेले मन,
शांत प्रवास, सुखद एहसास,
संपलेली वेड तुझ्या माझ्या भेटीची,
तरी ओढ तशीच होती अपूर्ण मिलनाची,
मुक्या लोचनांनी प्रश्नाचे केले वार,
का रोखून ठेवला नाही समय पडतोय फार?
*****************************************************************************
पहाता पहाता मला तू दिसावी ,
पथी चांदण्यांनी फुले अंथरावी ...
कंचन रूप तुझे, मोहक स्मित शोभे,
जसे गुलाब कळी ने बाग सजवावी...

अशा निराश उरी विसरून गेलो,
तुझ्या कौल माझ्या दृष्टीस पडला,
मनाचे दार उघडण्या आधी, निद्रेने साथ सोडला,
अचंभित मी विचारात दडलो,
कातरवेळी स्वप्नाचा सडा कसा पडला ???

अलगद स्पर्श होउ दे तुटलेल्या हृदयाला,
आसवांचा भार आता जमेना पापण्यांना,
उरी ज्वलंत अजून हि त्या आठवणी आहेत,
घाल गार वारा तुझ्या मृदुल स्वरांचा..
तडा गेलेल्या विश्वात माझ्या,  तुला का विसाव्याची आस आहे,
तुटलेला हृदयाची साद ऐक सखे प्रीती चे खुळे विश्व आहे....

तुझ्या प्रेमाचा सुगंध माझ्या जीवनात दरवडावे, 
कस्तुरी ने मग कसे ते सहावे...

प्रेमाची भाषा डोळ्यांनी बोलले,
शब्दांचे नको कोडे म्हणून मी शब्दाचा आधार सोडले,
तरीही तुला कळले नाही मान माझे झुरते,
 माझ्या या अबोल प्रीतीचे नशीबच खोटे ठरते....

आठवणी मोत्याच्या हार प्रमाणे असतात,
डोर जशीच तुटते सगळेच विसखटतात....

 

No comments:

Post a Comment