Friday, September 2, 2011

जीवन हि रम्य पहाट आहे, 
प्रत्येक  क्षण हा नवीन आभास आहे , 
झोका वाऱ्याचा येतो एक क्षणी,
देतो स्वप्न आणि अविस्मरणीय आठवणी ,
प्रत्येक  स्वप्न जगण्याचा ध्यास आहे, 
जीवन हि रम्य पहाट आहे,

 कधी नाती जुडतात कधी नाती तुटतात,
तुटत नाही ती डोर मनाची,
मोह आहे फक्त हे कि वाटते असावे कुणी  तरी  जीवनात हि,
म्हणावे ज्यांना माणसे अपुली,
पण कुणासाठी कधी आयुष्य थांबत नाही,
सतत च कुणी येत जात राही, 
तरी परत त्या वाटेवर,
कुणी तरी कुणाची  तरी वाट  पाहे.

No comments:

Post a Comment