Monday, September 5, 2011

कुणी तरी असावं..................

स्वप्नात हि माणूस एकटा नसतो, 
कुणी तरी त्याचा विचारांत रमतो,
जीवन इतके सोपे नसते,
एकटे जगायला खरे धाडस लागते,
वाट चुकीची कि बरोबर हे चालताना कळत नाही,
पण चुकल्या वर मात्र कुणी तरी आधाराला लागतो,
रोजच्या कामातून मधेच काळजी ने विचारणारा कुणी तरी असावे असे सगळ्यांनाच भासते,
गर्दीतही शोधणारा कुणी तरी असावं,
पापण्यातून झरण्या आधी त्या आसवांना पुसणारा कुणी तरी असावं,
न सांगता मनातल्या भावना जाणणार कुणी तरी असावं,
कधी तरी चालताना लाड्खडल्यावर संभाडणारा कुणी तरी असावं,
शांततेला विचारणारा कुणी तरी असावं,
हसताना बघणारा कुणी तरी असावं,
बघून  हसणारा कुणी तरी असावं,
कुणी तरी असावं हातात हात घेऊन चालणारा, 
चालताना सोबत पाऊल मोजणारा, 

कुणी  तरी असावं जीवनात ह्या जगण्याला अर्थ देणारा.................

No comments:

Post a Comment