देहाला माणसाने धुतले महागड्या साबणाने,
पण मनाची स्वच्छता करणार कोण ??
देवाला बसवले सुसज्य मंदिरात,
मन मनाच्या गाभारात त्याला पूजणार कोण??
पुण्याई करायला सगळेच पुढे,
पाषाणास चढवता सोन्याच्या ताटात पंचपकवान,
पण भुकेल्याला मात्र हीन भाव आणि दारातच त्याच्या दारिद्राचा अपमान,
मग गरिबी भूखमारी हटवणार कोण ??
विदेशी बँक मध्ये आहे प्रोपटी अपार,
तरी स्वदेशात दाखवतात गरिबीचा मार,
मग श्रीमंतच उपभोगणार गरिबीच्या योजना,
तर गरिबी हटवणार कोण ??
कसे होणार या देशाचे हाल,
कसे संपणार हे दारिद्राचे काळ,
पुढाकरी पुढे होऊन आपलेच भारतात घर,
तरी म्हणतात नाही आहे विश्रांतीला दर,
मग गोर गरीबांची ऐकणार कोण ??
No comments:
Post a Comment