Friday, September 9, 2011

देशील का मज साथ सख्या....

पाऊल पाऊल घालताना, अंधेरी वाट असो कि काट्यांची वाडी,
कोसळेन जेव्हा मी देशील का मज हाथ सख्या,
देशील का मज साथ सख्या...

उन्ह सावली चा खेळ जीवनात नेहमीच असतो,
जर पाऊस पडला कधी तर,
भिजण्या आधी मला देशील का आधार सख्या,
देशील का मज साथ सख्या...

फुलांचा सुगंध, चंद्राची चांदणी नेहमीच असते ओढ मनाची,
जर का उजाड वनात गेलेतर,
नेशील का तूझ्या मज साथ सख्या,
देशील का मज साथ सख्या...

रूप गोजिरे चार दिवसाचे,
प्रेमाचे दिवस आयुष्याचे,
त्या थकलेल्या दिवसात तही,
असशील  का मज साथ सख्या.....
बोलना, देशील का मज साथ सख्या.....

No comments:

Post a Comment