Friday, September 2, 2011

 आधीच ठरले  होते  नाते तुझे माझे,
 म्हणून  तर  जुडले हे बंध रेशमाचे,
मंदिराची पायरी चढताना वाटले,
देवाच्या दारी अन्याय नसते,
म्हणून  त्याने  दिला मला जीवनात एक असा सखा,
जो  जपतो मला जीवपलीकडे.
आधीच होते ठरले हे क्षण तुझ माझ्या सोबत आयुष्याचे,
म्हणूनच आहेस तू इथे माझ्या सये,
आधीच ठरले होते पावसात भिजणे,
एका छत्री खाली दोघांचे असणे,
कनिसाचे स्वाद आणि ते संपवण्याची होड,
तू  जिंकल्यावर पडलेल्या मला प्रश्नाचा कोडं,
आधीच लिहलेला आहेस कदाचित नशिबात तू माझ्या,
म्हणूनच आहे हा जीव गुंतला तुझ्यात ....

No comments:

Post a Comment