छोट्या छोट्या कविता
==============================================================
प्रेम ज्याला कळले नाही ...
या देहाचे मूल्य किती देणार तो
जीवाचे मूल्य ज्याला कळले नाही
प्राण सोडला पायाशी त्याच्या
पण अश्रू डोळ्यातून झरले नाही
विनवणी करून हरले मन
पाषाण ते वितळले नाही
काय मूल्य देणार तो भावनेचा
प्रेम ज्याला कळले नाही ......................
==============================================================
कुणाला काय पडलंय
कुणाला काय पडलंय
कोण कधी जळलंय
आपल्याच दुखांचा बाजार इतका कि
दुसऱ्याचे काटे कोणी वेचले
कुणाला कुणाची चिंता इथे
चिंतेne कधी जीवन सुधारले
आपल्या साठीच वेळ नाही
दुसऱ्यान विचारायला कधी वेळ पुरले
काळ रात्री एक गोष्ट स्वप्नात आली
सकाळी ती कामात विसरूनच गेली
इतका व्यस्त जीवन कि नाते जपायला कठीण झाले
पण कुणाला कुणाच काय
कोण आयुष्यभर कुणाला पुरलाय...........
==============================================================
तुझी सोबत सख्या मला नशिबाने मिळाली
सुकलेल्या वृक्षास जशी सर पाऊसाची
चिंब भिजून जावे त्या ओल्याव्यात आता
प्रेमाच्या सागरी उफानल्या स्वप्नांच्या लाटा
एक क्षण प्रेमाचा त्या लाटांना लाभला
पूर्ण अस्तित्व त्यांचा इथेच संपला
प्रेम करावे असे सख्या जिथे नाही कशाची भीती
प्रेमच असतो प्रेम साठी शेवटी
==============================================================
असे का होते.......
प्रत्येक हसण्या मागे एक दुख का लपते
येणारे सुख का अश्रू देऊन जातात
स्वप्नात असलेले का वास्तव्यात होते नाही
असे का होते काहीच कळत नाही
चालते पण वाट संपत नाही
सावली चा खेळ का पाठलाग करत जाते
किती तरी सावल्या पण माझीच मला दिसतात नाही
शोधते मी स्वतःला गर्दीत पण का माझा अस्तित्व सापडत नाही.
==============================================================
मला पण झाड व्हायचे
काल मी एकटीच होते त्या झाडाच्या सावलीत
किती तरी प्रश्नांचा शोध घेत
तप्त माझ्या मनाच्या भूमी वर
त्या झाडाच्या पानांचा वार घेत
एक पान सहज गळला माझ्या पुठे
जसे आश्रू कोसळतात आठवणी मध्ये
पण त्या पानाची दशा बघून
वाटले प्राण गेले हरवून माझे
मी निशब्द निर्विकार विचारात फसले
कधी मी त्या झाळाचे मन गवसले
किती दुखांचा होता माढा
तरी तो कसा तटस्थ उभा
उन्ह असो कि पाऊस
किती हि निसर्ग चा खेळ
पण तो तटस्थ होता नेहमीच
कधी कशी हि असुदे वेळ
त्याने सवाली दिली उन्हात
आणि पाऊसात आसरा
पण कधी नाही परती ची अपेक्षा
पान फुल फळ फांदी
सगळ्याची त्याला काळजी
मला पण झाड व्हायचे
निस्वार्थ सेवेसाठी
निस्वार्थ प्रेमा साठी .....
==============================================================
का माणसाला प्रत्येक क्षणात कुणाची तरी जराच असते ?
का सावली पडायला प्रकाशाची साथ लागते ?
का चंद्राला चांदणी इतक प्रेम करते ?
दिवसा मग रात्री चा खेळ कसा चालतो ?
असे का होते का कुणाची तरी साथ भासते ???
==============================================================
बहरून आला मोगरा
जाई जुई हि बहरल्या
तुझा प्रीतीच्या रंगत
आज त्यला हि शहारल्या
स्वप्नातली एक भेट
मला आयुष्य देऊन जाते
जे शब्दात सांगता येते नाही
ते नजरेत बोलून जाते ..........
==============================================================
रात्र शांत आहे
तरी मनात गोंगाट आहे
कानात अजून तेच शब्द घुसमडत आहेत
का तुझेच प्रतिबिंब डोळ्यात अजून दिसत आहे
काही प्रश्न काही भाव आहेत
काहींचे उत्तर सुधा ठाव आहे
पण तरी ते तुलाच याथारतात शोधात आहे
.
.
का तू कल्पनेत अजून रुजत आहेस
मी पाश घातला मनावर पण
तू कैद झाला त्याच्या कोपऱ्यात
आता तोच कोपरा मला रात्र दिवस सलत आहे
परत परत तुझी आठवण मज येत आहे..
==============================================================
कुणाला शोधतोस तू........
कुणाला शोधतोस तू
स्वतःच्या सावलीत तुला तूच दिसत नाहीस
मग कुणाला शोधतोस तू
त्या पाषाणात देवाला
कि गाभार्यातल्या घराला
कुणाला शोधतोस तू
चालताना पाऊल मोजताना
काल हरवली ती वाट तुझी
आज पुन्हा का ओढ त्या गावाची
कुणाला शोधतोस तू
तुझ्या अंतकरणात डोकावून बघ
पटते का ओळख तुलाच तुझी
एकदा स्वतःला विचारून बघ
गर्दीत आपल्या अस्तित्वाची खात्री पटवून बघ
दुसर्यांना शोधण्या आधी स्वतःला शोधून बघ.......
आपल्या सावलीशी ओळख पटून बघ..............
==============================================================
क्या फर्क है डोली और जनाजे में
दोनों में लोगो का कारवां ही होता है
अश्क बहते है किसी को खोने के गम में
श्रृंगार तो दोनो जगह होता है
जनाज़े को भी लोगोने कंधे पे ही उठाया
डोली को भी कहार के कंधे पर ही जाना होता है
क्या फर्क है डोली और जनाजे में
आसुओ के साथ ही तो दोनों का सफ़र होता है...
==============================================================
शब्द तुझ्या माझ्यातले अंत
शब्द आहेत स्वतंत्र
शब्द कधी तू कधी मी
शब्द कधी रडणारे कधी रडवणारे
शब्द ओले जरी डोळे तरी गालात हसणारे
शब्द कधी सुख कधी दुख
शब्द कधी प्रेम कधी द्वेष
शब्द एक लपंडाव आहे
मनतले मनात गुपित
पण ओठान वर वेगळाच भाव आहे
शब्द खेळ आहे
अक्षरांची भेळ आहे
शब्द मध्यम आहे
आठवणीची साठवण आहे
शब्द एक तरंग आहे
तुझ्या माझ्यातले अंतर आहे ............... Ro$hni
==============================================================
तुला समोर पाहून माझीच मी हरवते
नजरेत तुझ्या मी स्वप्न रंगवते
मनातले कधी तुला बोललेच नाही
अडकले शब्द कधी मोडलेच नाही
ओठांवर आज शब्दांच साज आहे
मनात तुला सांगायला गोष्टींचा किलबिलाट आहे
पण कुणास ठाऊक सगळे कुठे हरवतात
तू समोर येताच सगळे लपून बसतात
मला तर वाटते तुला पाहून शब्द माझे लाजतात...
==============================================================
आज मला भिजूदे तुझ्या आसवांच्या सवे
उद्या ते ही माझे नसणार
तुझ्यात गुंफलेला श्वास माझाच वैरी असणार
जगू दे आज आयुष मला तुझ्या मिठीत सख्या
कारण उद्या ह्या मिठीची शांतता हि मला बोचणार
आज फक्त तुझे शब्द असुदे दोघांमध्ये
उद्या पासून तुझ्या तुझ्या प्रत्येक शब्दासाठी मी तडपणार
आज मोजूया चांदण्या अमावसेच्या राती हि
उद्या तो चंद्र प्रकाशही नकोसं मला वाटणार
आज जोडुया नात आणि क्षणाची साथ
तोडून नाते उद्या तू तुझी वाट चालणार ....
==============================================================
मी आणि माझे मन
====================
गडबड गडबड नेहमीच याची
किती घाई याला सख्याला भेटण्याची
याच्या गोंधळा मध्ये माझा कालवा होते
आठवणीत असेलेल सगळे विसरून जाते
क्षण क्षण हा मला बोचतो
सख्या साठी...... मलाच टोचतो ......
किती किती हा मला बोलतो
नुसताच खूळखुळ्या प्रमाणे वाजतो
.
.
.
.
.
घे आला आता सखा सामोरी
कुठे गेली किलबिल तुझी सारी
सरिते सारखा तू शांत
बर्फ सारखे का रे तुझे झाले अंत
उफान्लेला तू सागरा प्रमाणे
कुठे आटले तुझे आता पह्ने
.
.
सांगणं सख्याला तुझे वेड
भेटण्यास आतुर तू खेळलास किती खेळ...
==============================================================