फक्त एकदा
तुझ्या सोबत जगायचे आहे
रडत रडत थोड हसायचे आहे
स्वप्नांच्या गावात रमायचं आहे
एक छोटस घर सजवायचं आहे
फक्त एकदा...
माझ्या सोबत जागून बघ
त्या पहिल्या पावसात भिजून बघ
चोरून पाहणाऱ्या चांदण्यांना
चंद्राच्या कुशीत निजताना बघ
फक्त एकदा...
तो मावळता मावळता आणि
घरट्यात परतणारी पाखर
शांत त्या सांझ वेळी
भाव मनाचे बोलायचे आहे
फक्त एकदा...
तस तर रोजच भेटतो बोलतो आपण
भांडतो आणि समजूतही काढतो आपण
तरी तुझी वाट बघून मला लटका राग धरायचं आहे
खऱ्या अर्थाने त्या तुझ्या प्रेमाला
मनाच्या कोपऱ्यात जपायचं आहे नेहमी साठी
फक्त एकदा ...
खूप काळजी घेतोस माझी
यात वाद च नाही
फुला सारखा जपतोस मला
अजून काय मला दुजी आस राहील
तुझ्या नजरेत मला
स्वतःला विसरायचे आहे
फक्त एकदा...
सांगना येशील का त्या अवकाशात
जिथे फक्त तू आणि मी
आणि अबोल शब्दांचा करवा
मग मी सांगेन अजून काय मला
सांगायचं आहे
जुनी च ती कविता तुझ्या साठी
मला वाचायची आहे
समजून घेशील ना मला
फक्त एकदा....
तुझ्या आठवणीत चिंब भिजायचं आहे
थेंब बनून तुझ्या पापण्या खाली लापयचं आहे
शब्द बनून ओठान वर सजायचं आहे
भावना बनून हृदयात नांदायचं आहे
फक्त एकदा ..
मला तुझ्या होकाराची वाट आहे
नको आयुष्याची साथ पण
क्षणात आयुष मला जगायचं आहे
रोज नव्याने तुझ्या विश्वात मला फिरायचं आहे
आठवणीचे घरटे बांधण्यास तुझा सहवास मला हवा
फक्त एकदा..
खोट खोट पण एकदा तरी हे बंध प्रेमाचे जोडून बघ
श्वासात माझ्या श्वास तुझे एकदा गुंफून बघ
हात हात घेऊन पूल पूल मोजून बघ
एक एक क्षण तुझ्या फक्त माझ्यासाठी ठेऊन बघ
फक्त एकदा..
प्रवास माझ्या च एकटीच तुझा शोध घेण्यास सख्या
सावली बनून राहीन मी सदैव तुझ्या पाशी सख्या
तू ओढ ह्या मनाची.. दोर जीवनाची...
तू आसमंत माझा .. मिलन आपुला क्षितिजा परी
क्षणिक भेट हि मंजूर मला..तू साद देऊन बघ
फक्त एकदा ..
शृंगार माझा तुझ्या साठी
हातावर मेहंदी तुझ्या साठी
तुझी बनूनच शेवटा माझ्या
तुझ्या बहुपाश्यात विसावायचं आहे
नेहमी साठी ...पण
फक्त एकदा...
==========================
ती :- आज roseday आहे.. आज पासून valentine week चालू झाला, तुझी काय spcl plan आहेत का ??
तो :- प्लान्स ?? अग , कसले आहेत प्लान्स ... आणि हे बघ ह्या सर्व गोष्टीत मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. सर्व बेकार कल्पना आहेत. उगाच देखावा..
ती :- किती उन रोमान्तिक आहेस रे तू ... तुला प्रेम विषयी खरच काही वाटत नाही. मला तर doubt येत तू माझ्या वर प्रेम करतोस ते.
तो :- मग मला संग हे अस सिलेब्रातीओन केल्या मुले तुला खात्री पटेल का माझ्या प्रेमाची ??
ती :- खात्री चा प्रश्न नाही आहे.. पण अरे हे दिवस सर्व प्रेमी साजरे करतात म्हणून मला पण करायचं आहे.
तो :- बघ तुला काय करायचं ते कर, मला अजिबात जमणार नाही.
(ती थोडी दुखावली जाते कारण खूप काही विचार केल असत तिने ..त्याच्या साठी सुर्प्रीसेस असतात तुच्या कडे.. पण त्याच्या ह्या कल्पनेने सर्व स्वप्न तुटता तिचे म्हणून )
तो :- अग रागावलीस का ??
ती :- नाही रे ..
तो :- मग का गाप झलिओ एकदम ..आणि तुझे डोळे का पाणावलेत..
ती :- काही नाही रे .. बोल तू ..
तो :- अग वेडे, माझा प्रेम आहे तुझ्या वर हे सांगायला मला स्पेसिफिक दिवस लागत नाही.. माझ्या साठी पूर्ण आयुष्य . आयुष्याचा प्रत्येक दिवस,, दिवसाचा प्रत्येक क्षण.. आणि त्या प्रत्येक क्षणात फक्त तू ...आणि फक्त तू आहेस..
ती :- मग त्यातला एक दिवस तू मला तो प्रत्येक क्षण ..तुझा प्रत्येक स्वप्न .. सजवून दाखवला तर.. बोलून दाखवला तर.. हे दिखावा आहे का..मला फक्त एका दिवसाठी ह्या जगातली सर्वात नशीबवान मुलगी म्हणून थोडा गर्व करायचा आहे.. मग कुठे चुकते मी सांग ना...
तो :- तू फक्त एक दिवस म्हणतेस ..मी तुला रोज .. प्रत्येक दिवसा चा प्रत्येक क्षण असाच साजरा करू इच्छितो.. मग कुठे चुकते.
ती :- :) खरच इतक प्रेम करतोस का रे ??
तो :- नाही.. फक्त तुझ्या प्रेमाच्या त्या गहारेला माप्न्याचा पर्यंत करत अहो.. कारण तुझ्या एवड मी तुला कधी च प्रेम करणार नाही..
ती :- तू मला न मागता खूप काही दिलास.. क्षण क्षणात नवा आयुष्य दिलस.. मी खरच खूप नशीबवान आहे..
तो :- अग प्रिये ..मग आता हि तुला वाटत का कि मी वेलेन्तीने सिलेब्राते करत नाही म्हणून माझ प्रेम खोट आहे..
ती :- I M SOORRYY .. मी रागात बोलून गेले रे..
तो :- मला खरच हि वेडी खूप आवडते.. आणि तिचा हा हक्क गाजवणारा लटका राग सुद्धा...
ती :- :)
-------------------------------------------------------------------------------------------
दिवस कसे कोण जाने
येणारे येतात जाणारे जातात
येताना काहीच घेऊन येत नाही प्रेमाशिवाय
पण जाताना मात्र खूप काही घेऊन जाता
आणि मग उरतात त्या फक्त आठवणी ...
मग त्या आठवणी मी कुरवाळत बसते
क्षणांना त्या आठवत बसते
खेळ मांडतो तिथे मन भावनांचा
त्या मनाशी मी एकटीच खेळत बसते
होड लागली असते त्या क्षण मध्ये
कुणाचा डाव प्रथम मी खेळणार
पण मी कधीच जिंकत नाही कारण
प्रेमाचा डाव म्हणजे फक्त हरणे ...
===============================================