Saturday, October 8, 2011

नशीबा वाचून काय झाले ..................

नशीब वाचून काय झाले
सगळेच मिळाले सगळेच गेले
कधी डोळ्यातले स्वप्न फुलले
कधी आस्वान सवे वाहून गेले
शेवटी नशीबा वाचून काय झाले................
 
किती हि इच्छा किती हि आकांक्षा
मनात असो किती हि तुफान भावनेचा
जोश असला तरी 
कधी यश कधी अपयश आले
शेवटी  नशीबा वाचून काय झाले   ..................
 
मूर्खच्या हाती ही कुबेर नगरी
ब्राह्मण आज हि पसरतो झोळी
दर दर भिक्षा हेच नशीब आले
ज्ञानाचे दीपक कुठे विजून गेले
कधी हसले कधी रडले
शेवटी  नशीबा वाचून काय झाले   ..................
 
आज आहे भिकार्याला द्यायला
पण उद्या तुम्हीच भिकारी झाला
आज कुणा वर हसला
उद्या तुमचा हास झाला
कधी मी कधी तू खेळ हे चालायचे
शेवटी  नशीबा वाचून काय झाले   ..................
 
जे घडणार आहे ते घडायचे च
नियती चे खेळ
त्यांनी ते खेळायचे
आम्ह्नी कठपुतली
त्याच्या ताला वर डोलायचे........     
शेवटी  नशीबा वाचून काय झाले   ..................
 जे घडणार आहे ते घडायचे चं.............

No comments:

Post a Comment