रुसला सखा माझा
चंद्रा नि केला हासा
त्या चाद्ण्याना पण धीर नाही
लगेच लागल्या कुजबुजायला
अबोल माझा सखा
पाउसाचा आता वाटा
तो हि सरी न सोबत
लागला मला छेडायला
आता सूर्य कसा सोडणार
तो हि आता जळणार
कारण मला सावली द्यायला
आता कुणी नाही
निजले आज पक्षी
फुल हि कोमिजली
आता माझ्या सवे बोलायला
कुणी हि नाही
शब्द हि रुसले
लेखणी वर येऊन बसले
कवितेत हि माझ्या आज
जीव येते नाही
No comments:
Post a Comment