Friday, October 14, 2011

charolya

चंद्र चांदण्याच्या  प्रीतीला दृश सूर्याची
झुरतो तो एक एक क्षण दिवसा तिच्या मिलना साठी..
..............................................................................................................
नियतीचे खेळ कुणास उमजले
प्रीतीचे नाते कधी तिला पाहून जुडले
सुखांची सवय कधीच वाईट नाही 
जो पर्यंत पदरात  फुल आहेत 
कसे मग काट्यांचा विचार होईल   
............................................................................................................
क्षणाच का होईना प्रेम तर मिळत 
काही च थेंबांच्या नशिबात ते असत  
...........................................................................................................
भावना सांगायला शब्दांचा आधार का
माझे अबोल बोल हि तुला कळायला हवेत   
...........................................................................................................
तू कितीही अबोला धरलास तरी 
मी तर तुला बोलणारच 
आज नाही उद्या तू हि कंटाळून
तुझ मौन व्रत तोडणारच   
..........................................................................................................
विश्वास च आहे नात्याची साखळी
म्हणून मी नाही ती तोडली
सख्या तो निजला त्याच्या चांदणी साठी
आणि त्याला हि भावते प्रीती अपुली
...........................................................................................................
 ती मदिरा होती सोबतीला म्हणून मी जगलो
नाश तुझा प्रेमाचा होता 
मी नुसता प्याला ओठान वर ओतलो   
..........................................................................................................
क्षणाच्या हिशोबच गणित तू चुकला
अश्रुंचे पलडे इतके भारी का , 
कि हसत हसत जगले क्षण तू विसरलास 
..........................................................................................................
मी हसत्नाना सगळ्यांनीच बघितले
मग फक्त तुला कसे माझे पाणावले डोळे दिसले...
.........................................................................................................
सख्या तुझ्या प्रेमाची तोड नाही
मी सात जनम जरी तुझ्या सोबती असले 
तरी माझ्या प्रेमाची तुझ्याशी जोड नाही .......
.........................................................................................................
मला ठाऊक आहे तू माझा फक्त स्वप्न आहेस
पण वेड्या मनाचे काय करू
त्याच्या कल्पनांचा तू अस्तित्व आहेस
.........................................................................................................
 क्षितिजा पाशी ये म्हणून तो मला स्वप्नात सांगून गेला
त्याला  भेटण्या साठी मी अस्तित्वात सारा अवकाश ओलांडला      
..........................................................................................................
भेट तुझी माझी सख्या फक्त स्वप्नातली कहाणी
अस्तित्वात नाही तुझी मला  सावली  हि पावली 
.........................................................................................................
कसे पाहू तुला मी माझ्या जीवनातला एक क्षण म्हणून
तू तर आहेस माझी कल्पना एक भास एक स्वप्न माझ्या जगण्याचा 
तु माझ्या श्वासात तूच माझ्या हृदयात
कसे सांगू तुला तू राहतोस माझ्या प्रत्येक क्षणात 
..........................................................................................................
आठवणी मनाच्या कपाटात 
कुपूल लावून  ठेवल्या 
तरी क्षणो  क्षणी  त्या 
तडेतून बाहेर पडल्या
..............................................................................................................
स्वप्न तू सत्य तू
तुझ्यात मन हे हरवले आहे
मी आहे तुझ्या सावलीत सख्या
तू मला अंधारात मिरवले आहे       
..............................................................................................................
खरे प्रेम का असते हे सांगशील का मला
प्रेमाच्या भावनेला पण न्यायाचा पलडा 
खरे खोटे काही नसते मनाच्या भावनेत
प्रेम फक्त प्रेम असते प्रेमाच्या भाषेत  
 ..............................................................................................................
श्रवणाने हि साथ सोडले
तूला थांबवायला 
शब्दा एकवजी काळीज रडले 
..............................................................................................................
 मेघ बरसती विरहात हे
मिलनातहि तेच आहे
दुष्काळ नाही सुखाचा
पण वेदनेची त्यावर मात आहे 
..............................................................................................................
नजर तुझी नजरेस होती भिडली 
हसत हसत प्राणाची आहुती मी काबुलली
..............................................................................................................
तुझ्या सवे जगताना माझे प्राण मी तुला दिले
सोडून जाताना मात्र ते सोबत नेण्यास विसरले .........
..............................................................................................................
ओढ मनाची सख्या
मनाला भिनली
तुझ्या अधीर नजरेची 
भाषा हि कळली   
..............................................................................................................
आपलीच आसवं मनाचे भाव सये
पापण्यांच्या पडद्या आडून पाहतात
तुटले जरी बंध प्रेमाचे आयुष्यी
तरी आठवणींचे काटे सलत राहतात

..............................................................................................................
आठवणीचे काटे सख्या
काळजात असे बोचले
त्या गुलाबात म्हणूनच
आहे विरहाचे रंग ओतले   
..............................................................................................................
ओळखीचे नाते सख्या 
नेहमी डोळ्यातून बरसतात
 अनोळखी भावना 
जीवात जीव गुंतवतात
..............................................................................................................
सख्या हि जीवनाची गती
तुझ्याच अवती भवती
हृदयाच्या प्रत्येक कोपऱ्यातून
अर्पित तुला प्रीती
..............................................................................................................
काय प्रीतीच्या नादी लागतोस सख्या
प्रीती नशीब वाहून  नेईल
आज हसऱ्या डोळ्यात उद्या 
दुखाचे काळे ढग राहील
..............................................................................................................
नको रे सख्या तुझ्या प्रेमाचे विश्व महान
भीती वाटते मला जीवाची होते हानहान
आज जरी विश्वास असला तरी नशीबाचे खेळ आहे
हथावरच्या अपूर्ण रेषांवर काळाची मोहर आहे
..............................................................................................................
 मोह आवरता आवरेना
वेडा मन हा सावरता सावरेना
कसा मोह कसा मायाजाळ
मृगजळा सारखे सारे संसार
..............................................................................................................
एकच भावना अनेक मर्म
त्यांचे आहे एकच धर्म
मनाला मनाशी जोडायचे
एक विश्व प्रेमच बांधायचं
..............................................................................................................
 ती वाहत होती
तो धावता होता
गती ला गती मिळवण्याचा
जसा प्रयत्न होता
काल ती शांत होती
तो निवांत होता
..............................................................................................................
कोरड्या शब्दाचे ओलावे तू जाणले
कोरड्या आयुष्याला प्रेमाने बांधले
कोरड्या स्वप्नातल्या ओल्या भावना
सलतील क्षणो क्षणी वेदना
..............................................................................................................
कोरड्या तुझ्या शब्दात
प्रेमाचा ओलावा
वाळवंटात जसा
कमळ उमलावा
..............................................................................................................
शब्दांचे अर्थ शोधताना
जीवनाचे अर्थ बोधले
त्याच क्षणी शब्दांना
जीवन हे  अर्पिले
..............................................................................................................
तू असे निहारताना
लाजला तो क्षण माझा
नजरेला नजर भिडताच
हरवला मन माझा
..............................................................................................................
वाट तुझी सख्या
मी खूप जाहली
हृदयाच्या कप्या कप्यातून
प्रीती तुला वाहिली
..............................................................................................................
वाट एकच  दोघे हि चालत होतो
अनोळखी परिभाषेची
मांडणी करून पाहत होतो 
..............................................................................................................
एक राह के दो मुसाफिर
एक से ही पर अनजान बने
कोई चालता ही अपनी हि परछाई के संग
तो कभी कोई किसी कि रह बने
..............................................................................................................
रात्र दिवसाचे गणित कधी उलगडणार नाही
तुझी वाट पाहताना डोळे हि दिपणार नाही
मी वाट पाहते फक्त त्या क्षणाची
परतीची वाट जिथून मिळणार नाही
..............................................................................................................
तुला मज निहारताना मी जरा लाजली
मला लाजलेल पाहून तुझी मिठी
  ..............................................................................................................
त्या नियतीने लिहले नाते अपुले
तिला हि उमगले प्रेम पाखरांचे
आत फक्त तुझी साथ हवी
सुखी संसाराच्या स्वप्नात मी नाहून जावी
..............................................................................................................
काही लोक उगाच नशीबाला दोष देतात
प्रयत्नाच्या पलड्यात स्वतःच कमी पडतात
स्वप्न तुटले तर रडत बसतात
स्वतः समेत दुसर्याला हि  टीका करतात ....
..............................................................................................................
फुलाचे नाजूक वार झाले
असहनीय मनाला
काट्याचे टोचणे
ठाऊक  आहे  जनाला
..............................................................................................................
वार नजरेचे आता पुरे झाले सजना
भावनांच्या खेळ आता मज जमेना
आहे प्रेम खरा तर असे शब्द का अबोल हे
नाते जोडायला का घाबरतात तुझे बोल हे   
..............................................................................................................
तुझेच शब्द तुला फसतात
लपवतोस भावना शब्दात
पण तरी  डोळ्यात पापण्या
खाली दाटतात त्या
..............................................................................................................
शब्द माझे अबोल सख्या
बघ तुला काळात नाही ?
भाव माझ्या प्रीतीचे
तुझ्या मनाचा झोका झुलतात का  ?
..............................................................................................................
प्रयत्नांना का यश येत नाही
रडतो मन पण अश्रू   वाहत नाही
हसायला सोबत कुणी भेटत नाही
सगळेच असतात सोबिला तरी एकटेपण सोडत नाही
..............................................................................................................
स्वप्नाच्या पलीकडे कधी केली नाही कल्पना हि
पण माझे नसीब तू मला स्वप्नची पलीकडे दिले
..............................................................................................................     
साथ तर सवाली हि अंधारात सोडते
प्रीतीचे गीत दुखतच जास्त आठवते
..............................................................................................................

सुखाचा धावा घेतला
दुखणं मनाशी कवटाळून
रडताना वेचले फुल सुखाची
हसत्ना काटे पडले दाराशी
..............................................................................................................
जेव्हा कळाली दुखाची परिभाषा
डोळ्यातले सागर आटले
पण का परत तुला पाहून
आज परत उरी ते दाटले
..............................................................................................................
सारे काव्य प्रेमाचे मी वाचले
पण अजून नाही
दुखाचे जन्म मज उमजले..
..............................................................................................................
श्रवणाने कधी मला  नाही छेडले

आठवांचे आकाश दाटताच
माझ्या सोबती तो  हि कोसळे
..............................................................................................................
तुझ्या माझ्या नात्यात सत्याचे अस्तित्व नवते
स्वप्नाच्या देशात मी तुला शोधात होते...
..............................................................................................................
वाहताना स्वप्न ते भावना हि वाह्ल्या
आता नाही सत्याठी तुझ्या प्रेमाचा थारा
..............................................................................................................
स्वप्नाचे दिवस चार
वास्तव्यात दुखाची मार
मग का स्वप्न बघावेत
जीवनात दुख साठवावे
  ..............................................................................................................
तुझे तिथे माझे इथे असणेच खेळ आहे
जरी का मनाने जवळ पण नजरेने दूर आहे..
..............................................................................................................
दुखात आनंदाची कल्पना छान आहे
पण अश्रू सोबत हसणे म्हणजे
पान्हाला लावले प्राण आहे
..............................................................................................................
शोध तुझा आहे व्यर्थ आता
कधीच संपली रात्र स्वप्नांची
आता वास्तव्याची सकाळ आहे
आणि स्वप्नात जरी बोललीस तू त्याला
पण सत्यात तो एक स्वप्न आहे..  
..............................................................................................................
रडतना  मात्र अश्रू  गळत नाही
हसताना माझे ओठ बोलत नाही
..............................................................................................................
मनात लपवल्या दुखानचा डोंगर उभा आहे
हास्याला मात्र अजून कारणाची शोध आहे..
..............................................................................................................
तुला आज मी परत आठवून पाहते
कालचे स्वप्न आज परत जागून पाहते  
  ..............................................................................................................
आसवांचे घर आहे आता माझे डोळे
हसणाऱ्या चेहऱ्यावर लागले ग्रहण थोडे...
..............................................................................................................
कधी कधी तुला सोडून जाव असे वाटत
पण पाऊल पुढे टाकताच
मन मागे वळून बघतो...
..............................................................................................................
खेळते  स्वतशीच
स्वतःतच गुंतते
बिनसले कुठे तर
परत तुला शोधते
..............................................................................................................
तुझ्या प्रेमाचे दोन शब्द 
आठवणीसाठी दोन क्षण
अजून नको काही मज
फक्त ठेव माझी हि आठवण..    
..............................................................................................................
केल्या इच्छा तर पूर्ण होते नाही
स्वप्नाचे ढग कधी बरसत नाही
जे येते समोर क्षण जागून घ्यावे
परत ते  क्षण हि फिरून येते नाही..   
..............................................................................................................
संयम असाव जीवनात या बागडणार्या मना वर
नाही तर फुलाच्या मध एवजी होईल विषाचे प्राशन
..............................................................................................................
जातात येतात क्षण जीवनात किती
आज चे आज जगून घ्यावे 
उद्याचा दिवस पाहायला
कदाचित ह्या  जीवाने साथ सोडून द्यावे....
..............................................................................................................
नको रे प्रेमाच्या नादी लागुस
कोणाचे इथे भले झाले
नाही अजून खरचटले तुझे मन
म्हणून तू आज सर्वात सुखी आहेस..
..............................................................................................................
आज तर वेदने हि केली चोरी
हळूच सख्याच्या आठवांची बांधली शिदोरी
..............................................................................................................
एखाद्याला जर अंधार पहायची सवय असेल तर त्याला लख्ख प्रकाशातही अंधारच दिसतो... 
 ..............................................................................................................
डोळेबंद करून परिस्थितीला टाळण्या पेक्षा उघड्या डोळ्याने स्वतःची अधोगती पाहणे कधी हि चांगले ...
 ..............................................................................................................
किती हि दुःख असो पण चेहऱ्या वर नेहमी स्मित असावे म्हणजे दुःख बोध राहात नाही ...
 ..............................................................................................................
राग मनात ठेवून वागल्याने स्वतःला त्रास होतो म्हणून ज्याच्या वेदना त्यालाच द्याव्या.........
..............................................................................................................
आठवण एक आस
नको ते भास
आठवण म्हणजे पुन्हा एकदा
भेटण्याचा प्रयास 
..............................................................................................................
त्याला माहित आहे काय माझ्या मनात लपलय
मला माहित आहे काय त्याच्या मनात रुजलय
मग का शब्दाची करून गुंफण 
साद मनाची घालायची
आहेत भावना बोलक्या तर
का उत्तराची वाट बघायची   
   ..............................................................................................................
मी तुला वाऱ्याच्या स्पर्शात ओळखते
मोगऱ्याच्या गंधात तुझा श्वास दरवडते
चंद्रात  असतो प्रतिबिंब तुझा  
मी तुला चांदण्यान मध्ये हि शोधते 
..............................................................................................................
माझ्या या प्रेमची एव्हडीच कहाणी
तू माझा सख्या मी तुझी राणी.....
..............................................................................................................
स्वप्नात माझा सख्या माझ्या सवे असतो
पण यथार्थ चिंतिता तो स्वप्नाच्या पलीकडे दिसतो
..............................................................................................................
शब्दांचा हा मोह जाळ
भृन्ग्याचा आहे जसा फुलांवर डाव
मनाला हे शब्द भिनत आहेत
कुठे तरी मनात ते रुजत आहेत
   ..............................................................................................................
तू समोर असलास कि शब्द माझे अड्खडतात
का ओठातल्या ओठात ते पुटपुटतात
माझी शोधणारी नजर तुला गवसली
मग का ओठांची चाहूल तुला नाही उमजली  
..............................................................................................................
का रात्र सारून दिवस पुन्हा येतो
दुखाची सवय झाल्या वर का सुखांचा दिवस उगवतो,
दिवस एक से का राहत नाही,
का विचारांसार्खेच आपण जगू शकत नाही     
..............................................................................................................
आज कलम स्याही में नहीं अश्को में डूबी है
कागज़ की जगह ये दामन से लिपटी है
लफ्जों की ओड़कर चुनर ये 
फिर दर्द से सजी मुस्कुराती चली है..........
..............................................................................................................
मै उमर नाही जो कट जाऊ
वो दर्द नाही जो बट जाऊ
मै तो कशिश हु तेरे संसो कि
कैसे महकं से जुदा हो कर जी पाऊ...........

..............................................................................................................
तू सफर होता तो आयाम भी था
पर तू सुनी डगर थी मेरी
न तय कर पाई मंजील मै
मुड़कर देखा तो थी सरहद मेरी ..........

 ..............................................................................................................
तू दे शब्द मज
मी पानावर उतरवते
मिळून रंगवूया सख्या
मेह्फिलीत या अपुली गीते ............

 ..............................................................................................................
चारोळ्यांच्या विश्वात
सख्या मी तुझ्या सोबत
तू कल्पना कर
मी उतरवते ती अलगद .......

 ..............................................................................................................
शब्द लाजला पापण्या खाली बसला
हळूच शब्द तुझ्या शोधात अभिलाषी
शब्द गुंफला मी सरीच्या पदराशी
मेघात लपली बोलली पापण्यांच्या भाषी........

............................................................................................................
चला या विश्वात करू आपले स्वप्न साकार
कधी होकार तर कधी नकार
कधी शब्दावर होऊदे तकरार
शब्दांचे भांडण शब्दांची उधळण
भावना व्यक्त करण्या साठी करू
शब्दांची मंथन
चारोळ्याच्या विश्वात सु स्वागतम
..............................................................................................................
माझी सवत हि चारोळी
माझी नाही पण सख्याला हिची गोळी
मी असते कडेला बसून 
आणि त्याच्या ओठांवर हिचे कौतुक .............. 
 ..............................................................................................................
तुझी माझी कधी जमणार नाही 
बजावते तुला आता परत बोलणार नाही
मी माझे काय ते सांगीन सख्याला शब्दात
नको तुझ्या रूपाचा आधार त्यास............
 
 ..............................................................................................................
कसला गुमान तुला तुझ्या रूपाच 
विसरली का आहे तो अलंकार माझ्या भावांच .........
  ..............................................................................................................
शब्दांचा हा मोह जाळ 
भृन्ग्याचा आहे जसा फुलांवर डाव
मनाला हे शब्द भिनत आहेत
कुठे तरी मनात ते रुजत आहेत...
..............................................................................................................
तू समोर असलास कि शब्द माझे अड्खडतात
का ओठातल्या ओठात ते पुटपुटतात
माझी शोधणारी नजर तुला गवसली
मग का ओठांची चाहूल तुला नाही उमजली ....

 ..............................................................................................................
शब्द ओठांवर दवाप्रमाणे सजले
कापऱ्या ओठांतून ते ओथंबले
अलगद वेच ते ओझरते सडे शब्दांचे
तुझ्या स्पर्शाने कदाचित ते लाजले.. .............
 
 ..............................................................................................................
शब्द आहे जणू पानावरचा शृंगार 
तुझ्या आठवांचा आधार
आणि आठवणीचा अलंकार ............

 ..............................................................................................................
फुलासारखा शब्द तू किती नाजूक आणि कोमल आहे
म्हणून जपते मी तुला तू माझे प्रतिबिंब आहे....... ..........

 ..............................................................................................................
जुडता शब्द तुझे माझे
गीत उपजले प्रेमाचे
कलकल करत वाहणाऱ्या सरीतेचे
जसे गाणे सागराशी मिलनाचे .................

 ..............................................................................................................
जाता जाता प्रेमाची मी साद देऊन गेले
कळले नाही तुला पण शब्द तुझ्या ओठी ठेऊन गेले
आरोप वाटले तुला ते नशीब खोटे अपुले
तुझ्या प्रेम साठी साठवले शब्द आज मी ओसंडून गेले .......

 ..............................................................................................................
काल परत शब्दांनी मला गाठले
तुझ्या नको त्या चौकशीत मला दाटले
भांडले मला ते तुझ्या प्रेमासाठी
म्हणे मारतो आम्ही तुझ्या भवनाच्या ओठी .....
 
 ..............................................................................................................
काय हे शब्दाचे कोडे मला उलगडत नाही 
शब्द नि शब्द मोडला तरी गुंता काही सुटत नाही ..........
 ..............................................................................................................
शब्द डोलते वार्या संगे
शब्द नदीची धार एक
शब्द आहे भाव मनाचे
शब्द निसर्गाचा अलंकर एक ..........

 ..............................................................................................................
शब्द सरिता शब्द समीरण
शब्द अर्णव शब्द महीधर
शब्द अमृत शब्द हलाहल
शब्द चराचर मधे व्याप्त कण कण ........
 
 ..............................................................................................................
शब्द जोडेल शब्द तोडले 
कधी मनतले कधी वर वर बोलले
कधी रडले कधी हसले
मी तुला माझ्या शब्दात फासले .........

 ..............................................................................................................
कधी विसरते मी त्या स्वप्नात
मला माझेच कळत नाही
नाद मला हि नाही शब्दांचा
पण मोह त्यांचा तुटत नाही ..........
  
.............................................................................................................. 
मेल्यावरही फक्त देह मुक्त झाले
तुझ्या आठवणीनी मात्र 
मेल्यावरही जिवंत ठेवले 
.............................................................................................................. 
नको त्या वेदनेचे पुन्हा कारावास
सल नाही आता त्या वर्णास उरली   
फितूर होते  प्रेमाचे शब्द ते 
विष सम आज मज भासते 
.....................................................................................................................
या देहाचा  काय गुन्हा 
जळताना किती यातना
सोसते सर्व घाव वार
पण अंतिम त्यालाच मातीच भाव   
............................................................................................................................
शेवटची इच्छा म्हणून तरी 
माझ्या शय्येशी येशील न
नको प्रेमाचे शब्द देऊस 
पण अश्रू दोन गाळशील का  ??  
...............................................................................................................................
एकांत 
गुदमरलेला जीव हा प्राण शोधतो
श्वास घेण्यास हा राण शोधतो
   गर्दीचा  मारा-मार नको आता
विचलित मना साठी एकांत शोधतो 
......................................................................................................................................

No comments:

Post a Comment