Friday, October 14, 2011

उद्या जेव्हा तू नसशील

जगते आयुष तुझ्या सोबतीने 
क्षणाचा हि विचार नाही
उद्या जेव्हा तू नसशील माझ्या सवे
कसे हे जीवनात सख्या श्वास उरेल

आज हृद्य चे स्पंदन 
तुला साद देतात
पापण्या ओलावल्या तरी हसतात
उद्या या हाकेला कोण होकार देणार 
पापण्यांचे ओझे कसे हलके होणार 
उद्या जेव्हा तू नसशील माझ्या सवे
कसे हे जीवनात सख्या श्वास उरेल

तुझ्या स्पर्श नि मी रोमांचित होते
तुझ्या गोड आठवणीत दिवस रात्र सरते 
उद्या फक्त आठवांचे काळे ढग येतील
मनसोक्त बरसतील तरी उणीव राहील
सरीच्या रुपात तुझे दुख वाहील
प्रत्येक थेंब फक्त तुला पाहिलं
उद्या जेव्हा तू नसशील माझ्या सवे
कसे हे जीवनात सख्या श्वास उरेल
 आजचे जागते तुझ्या सवे
मी गुतले श्वास तुझ्या श्वासात
उद्या कसे कुणाला तो श्वास  मोहरून जाईल
कसे त्या स्पर्शाला माझे मन बरवून घेईल
उद्या जेव्हा तू नसशील माझ्या सवे
कसे हे जीवनात सख्या श्वास उरेल

 

       

No comments:

Post a Comment