Sunday, October 9, 2011

SAVE GIRL CHILD

कोमिजली एक कळी
फुलण्या आधी का??
कोणी तोडले तिला 
सूर्याचा किरणाचा 
अजून स्पर्श हि नव्हता........
रात्री चांदण्यात तिने स्वप्न रंगवली 
काय झाले स्वप्नांचे 
कुठे ती हरवली......
तिच्या या अंताचे दोष कुणी घ्यावे
फुलण्या आधीच का तिचे 
जगणे हिसकावून घ्यावे........
किती गोजिरी किती कोमल हसरी होती ती
सुंदर जग पाहायला आतुर होती ती..
पण कोण जाने काय नशीब घेऊन आली
डोळे उघडण्या पूर्वीच पापणी झापल्या गेली   ......
एक कळी आज होती जरा कोमिजली
जरा घाबरली, जरा गोंधळलेली
कारण माळ्याच्या दृष्टीस ती आता पडली........
हळूच त्याने तिला खुडले
सगळे संपले आता 
स्वप्न इच्छा आशा
फुलण्या आधी तिला
कळली मृत्यूची परिभाषा ....... 


No comments:

Post a Comment