Wednesday, October 19, 2011

एक तर्फी प्रेम

कधी तरी मनाच्या कोपऱ्यातून प्रेम करून बघा
एक तरफ का होईन कुणाच्या तरी स्वप्नात जागून बघा
त्याच्या एका smile ची वाट बघून बघा 
त्याच्या एका शब्द साठी तुम्ही सर्वस अर्पण करून बघा.
===========================================================
प्रेमात पडताना विचार केला नाही
प्रेमच नशीब काय होईल 
मग का आता इतका विचार
जगायला का आता प्रेमाचा आधार
 ===========================================================
प्रेम करताना मी त्याला विचारले नाही 
तू पण माझ्या वर कधी तरी करशील का प्रेम ?
आज जर तो स्वप्न आहे माझ्या जीवनात तर
न माझी न त्याची हे आहे फक्त भूल मनाची...
  ===========================================================
का म्हणून वेदनेची साद त्याला देऊ
मी एक तर्फी प्रेम केला
मग प्रश नाही अपेक्षांचा
क्षण चा साथ जरी मिळाला
तरी सात जन्माचा उधार झाला
 ===========================================================
त्याची आठवण मी नेहमी जपून ठेवेण
पापण्याच्या कडा तून वाहणार नाही
काळजी याची घेण   
फुलां सारखा ओंजळीत
असेल माझा प्रेम
जेव्हा हि तो येईल समोर 
उधडेन त्यावर
फक्त हसणारे दोन नयन
 कारण माझा आहे एक तर्फी प्रेम 

कसे सांगणार मी त्याला भावना मनातली
कसे दाखवू त्याला ओलावली पापणी 
त्याला कधी ते समजणार आहे
प्रेम तर दूर माझा सावली चा हि त्याला स्पर्श नाही
कसे घेऊ मी शब्दाचा आधार
एक तर्फी प्रेमाला फक्त वेदनेची मार

पण आज हि मी खुश आहे
जरी त्याच्या पासून दूर आहे
तो जगायला सांगून गेला 
फक्त त्याच्या साठी जगले
तो हसत राहा बोलून गेला
माझ्या आज हि कडा नाही ओलावल्या
तो जपून राहायला सांगून गेला
मी आज हि एकटीच आहे.............

           
  


No comments:

Post a Comment