Thursday, October 13, 2011

I wish you loved me

 प्रेम नसेल तर उगाच प्रेमाचे नाटक करू नकोस,
माझा तुझ्या वर आहे म्हणून फक्त माझ्या साठी हे नात जोडू नकोस,
मनात असेल तुझ्या हि होकार तर कबुल कर,
उगाच भावनांशी खेळून मन दुखवू नकोस...
plzzzzzzz, हे खोटे प्रीती चे नाते जोडू नकोस...... 

किती हि प्रेम केल तुझ्या वर पण तुला ते कळणार नाही
माझा मनाचा वेड तुला कधी जडणार नाही 
सख्या सोबती नाही तू म्हणून मी जगन सोडणार नाही
प्रत्येक क्षण तुझी वाट आता बघणार नाही
कळले मला कि तुला कधीच माझे प्रेम कळणार नाही
तुला माझ्या मनाचे वेड जडणार नाही

खूप पर्यंत केले तुझ्या जीवनात येण्याचे
कदाचित तुला हि कळले ते 
पण तुझ्या मनात नहव्ते म्हणून पाऊल नाही वळले
माझे तूला प्रश्न नाही न उत्तारची अपेक्षा आहे
दोष माझ्याच नशीबाचा मग कसे बोलू मी कुणाला,
तू दिलेल्या प्रत्येक क्षणाची साठवण आहे
माझ्या जीवनात आत ती एक गोड आठवण आहे
कधी ओलावल्या पापण्या जरी
ते अश्रू फक्त तुझ्या प्रेमाची आहे  एक तरंग
जे भिजवतात माझे अंतरंग
हाताच्या रेखाचे जोड मी केले
तुझे नाव कधी त्यात नहव्ते च लिहले
अधुरी आखली रेघ त्या दैवाने
म्हणून अर्धेच जगले आयुष्य तुझ्या सोबतीने           
दोष नाही देते तुला फक्त माझ्या मनाची समजूत आहे
तुझ्या विना आयुष्य जगण्या ची एक तडजोड आहे

No comments:

Post a Comment