Wednesday, October 5, 2011

charolya

विसरू नकोस असे त्याला सांगायचे होते
म्हणून डोळ्यात तो अश्रू देऊन गेला

उसणे फेडायला येईन मी 
दुख  ही च  भेट शेवटची
ठेव  सांभाळून  आठवणी
गाठ बांधून आपल्या पदराशी

कवितेतच ते जगतात
कवितेतच हरवतात 
कळतच नाही ते प्रेम कुणावर करतात..

तूझी चोर नजर मी जाणली
मनात ते माझ्या भिनली
नजरेचे वार झेलताना  
स्पंदने माझी हि वाढली ...

दुखांचे सडे पडले माझ्या दरी
फाटक्या तुझ्या झोळीतून
ओथांबली सारी 

आज काय नवे ??
तेच हृदयाचे गाणे
जीवनातल्या  सुख दुखाचे
तेच रडगाणे ...........

किती हि उन्ह
किती हि  सावली
पण माणसाला नाही
कधी समाधानाने ती पावली .......

उरी दाटे हुंदका
पण कोसळेना अश्रू
कितीही दुख असो
पण जाऊ दे ते आता  विसरू ..
काल पर्यंत होती दुनिया अनोळखी
आज आहे ओळखीची
पण नाते अनोळखी......
दूर दूर जाताना का 
मज वळून बघतेस
एकदा तोडले जे नाते 
का पुन्हा आशेचा किरण जोडतेस   ....

तुटले खेळणे तर पुन्हा जोडता येईल 
पण कसे तुटले हृदय पुन्हा जोडता येईल....

जीव लावला तुझ्या वर
गुन्हा काय केला
प्रेम होण्या आधीच
प्रेमाचा निराधार झाला  ....

आटले सागर नयनातले
पण भिजले नाही पापण्या
दाटून आल्या  भावना तरी
ओठांना वर नाही हुंदका ....

शब्द आहे कि बोल तुझे
कळू दे मज भाव मनातले
श्वास तुटण्या आधी
जोडू दे नाते मनाचे......



रडले पण अश्रूंना वाट मिळाली नाही
हसणाऱ्या डोळ्यांची त्याला वेदना कळाली नाही
दुख नाही असा कि त्याला भाव नाही  दिसले
 मन त्याला बघून पुन्हा का फसले   


हा तूच आहेस पापण्यातून झरणारा
आठवण बनून डोळ्यात सलणारा
पण तुला तुझेच प्रतिबिंब दिसत नाही
नशीबाचा दोष माझ्या 
प्रेम अजून हि तुला कसं कळत नाही ........   

शेवटी उरल्या मोत्याच्या सारी
टीप टीप पडती गालावरी
ओठांवर स्मित अजूनच खुलते
वेदनेची साथ जेव्हा त्याला मिळते  

ते ओझारले तुला पाहून पण तुलाच ते दिसले नाही
पापण्या पाणावल्या जरा पण मी अह्रू ते टिपले नाही .......

जे झरले ते पाणी नाही श्रावणाचे सख्या
मी तुझ्या आठवणीत भिजत होते
दुखांचे ढग पापण्या खाली दाटले
सरी श्रावणाचे ते ओझरत होते 

विरून गेले अश्रू सारे 
वाळवंटी पाऊस जसे
आज ह्या सागरात 
ना लवण ना मोती दिसे

का मग उशी भिजवायची अशी
 मी होते न वेचायला अश्रू त्याचे
का नाही भिजवली हक्काची कुशी 

नको सख्या बाभळीला प्रेम दाखवूस
लाथाडलेल्या झाडाचे काटेच बोचतील तुला 
       

No comments:

Post a Comment